कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Friday 5 August 2011

लोहगड मोहिम

नमस्कार !!!
आपल्या लोहगड मोहिमेचे नियोजन आता पूर्ण झाले आहे....
जे मावळे येणार आहेत त्यांच्यासाठी काही सूचना !!

१. ही मोहीम दिनांक १४ ऑगस्ट रोजी एक दिवस पूर्ण अशा स्वरुपाची आहे...

२.सर्व मावळ्यांनी या दिवशी सकाळी ८ वाजता शिवाजीनगर रेल्वे स्टेशन किंवा पुणे स्टेशन येथून लोकल रेल्वे पकडून माळवली येथे पोहोचायचे आहे ...
यासाठी जे येणार आहेत त्यांनी किमान २० मिनिटे आधी या स्थानकांवर पोहोचावे ..
(@ मुंबई वरून येणाऱ्या मावळ्यांनी मुंबई-लोणावळा लोकल ट्रेन पकडून लोणावळा येथे यावे आणि तिथून माळवली येथे यावे.येथे साडेनऊ पर्यंत पोचणे अपेक्षित आहे. )

४.आपण साधारण साडे नऊ वाजता माळवली येथे पोहोचतो तिथून गड चढायला सुरुवात केली तर दीड तासात साधारण अकरा वाजता आपण गडावर पोहोचू .

५.जाताना गडाच्या डाव्या बाजूला भाजी लेणी येथे जायचे आहे ...

६. गडावर विंचूकाटा नावाचा माची बुरुज आहे तिथे उतरून जाता येते .

७. गडावर लहान आकाराची पाण्याची तळी आहेत तिथे मनसोक्त भिजता येते .

८. गडावर अन्य बरीच प्रेक्षणीय स्थळे आहेत.

९.संध्याकाळी साधारण ४ वाजता तिथून परतीचा प्रवास सुरु होईल .म्हणजे आपण साडेपाच पर्यंत माळवली येथे पोहोचू ...

१०.तिथून परत पुण्यात येऊन मार्गस्थ होऊ.

११.खर्च प्रती व्यक्ती फारतर ५००/- रुपये येईल आपण कोठून येणार आहात त्यावर तो कमी जास्त होऊ शकतो.

१२. आणावयाचे साहित्य : पाण्याची बॉटल, पोट भरेल एवढा खाऊ ,२ लिंबू, आवश्यकता असेल तर ग्लुकॉन डी, भगवा झेंडा (उपलब्ध असेल तर उत्तम !), भिजण्याची हौस असेल तर जादाचे कपडे, बूट (आवश्यक), रेनकोट ,आणि जशी आवश्यकता असेल त्या प्रमाणे साहित्य कमी जास्त करू शकतो ..

खालील admin ना विभागानुसार संपर्क करावा :
मुंबई : श्री. प्रसाद करकरे , श्री.सुनील भूमकर
पुणे : श्री. रोहित भिडे, श्री. मंदार संत
कोल्हापूर,सांगली, सातारा, : श्री. जोशी अमित , श्री. राहुल काळे
मराठवाडा : श्री. सतीश शिंदे.
कोकण विभाग :श्री अमित जोशी.

धन्यवाद.!!!
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!!!!

1 comment:

  1. नम्र सूचना.
    जरी काही कारणामुळे मी येऊ शकत नसलो तरी एक सूचना करावीशी वाटत आहे. लोहगडावर थिल्लर गर्दी अतोनात असते. काही गंभीर बोलायचं असल्यास लोहगडा ऐवजी शेजारच्या विसापूरवर जावं. इथे गर्दी अजिबात नसते. शिवाय थिल्लर उपटसुंभ इथे फिरकतच नाहीत.
    मार्ग -
    1) मळवलीला उतरल्यावर हायवे वरच्या ब्रीज ने उजवी कडे उतरण्या ऐवजी डावीकडे उतरून पाटण गावात पोहोचावे (15 मिनिटे).
    2) हे गाव विसापूरच्या 2 सोंडांच्या बेचक्यात आहे. त्या बेचक्यातून वाहणार्‍या ओढ्यातून चढाईचा शेवटचा टप्पा आहे हे ध्यानात ठेवावं.
    3) गावातून पायवाटेने समोर आपल्याला चालण्याच्या दिशेला छेदत उभ्या असलेल्या कातळकड्याकडे जायला लागावं. एक टेकाड चढून गेलं 4)की उजवीकडे जाणारी वाट धरावी. ती ओढ्याकडे नेऊन सोडते.
    5) या ओढ्यात खरं तर जुन्या पायर्‍या आहेत. सहज चढता येतं.
    6) वर भरपूर रिकामी जागा, प्रवेशद्वाराजवळ हनुमानाच्या मंदिराशेजारीच छोटेखानी धबधबा, पोहायचं असल्यास अनेक विस्तीर्ण टाकी, व सभा-चर्चा करायला भरपूर रिकामी जागा व एकांत !!!

    ReplyDelete