कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Wednesday 28 September 2011

वर्ण व्यवस्था कर्मावरच अवलंबून होती,ना की जन्मावर....

"चातॄवर्ण्य मय सृष्ट्यं गुणकरम् विभागश:"
याच सरळ-सरळ अर्थ असा की ही वर्णव्यवस्था रामायण-महाभारत काळापासून अस्तित्वात होती.

भगवंताने हे पण स्पष्ट म्हंटले आहे की, वर्णव्यव्यस्था ही कर्मावर आधारित आहे;

ब्राम्हण - ज्याला भौतिक जगाचे काहीएक आकर्षण नाही व जो पूर्णपणे आत उतरला आहे।
क्षत्रिय - ज्याला सत्ता व संपत्ती यांचे आकर्षण असून एकादे राज्य निर्माण करण्याची महत्वाकांक्षा आहे।
वैश्य - ज्याला संपत्तीचा लोभ आहे आणि स्वार्थ आहे असा।
शुद्र् - ज्याच्याकडे गुणवत्ता नसल्यामुळे कुठलीही महत्त्वकांक्षा नाही असा।

गुणकर्मानुसार असलेली वर्णव्यवस्था कुणीही नाकारणार नाही

उदा- कारखाना निर्माण करण्यासाठी ज्याचा मेंदु कार्यरत असतो तो ब्राम्हाण....
व्यवस्थापन सांभाळणारे संचालक म्हणजे क्षत्रिय...
मालाची विक्री करुन नफ़ा मिळवुन देणारे म्हणजे वैश्य....
 

आपली सेवा विकुन अर्थार्जन करणारे सेवकवर्ग म्हणजे शुद्र्...


आज ही व्यवस्था अस्तित्वात नाही...असू ही नये...

Monday 26 September 2011

हिंदू धर्मियांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका...........

**** हिंदू द्वेष्ट्याना एकच सांगणे ****
        गेले काही दिवस आपण सर्व मिळून हिंदू द्वेष्ट्याना हिंदू धर्माची महती समजावण्याचा अथक प्रयत्न करत आहोत. पण मी एका ठिकाणी विक्रमजीनी म्हटल्याप्रमाणे"अंध व्यक्तीस दीप आणि नपुंसक पुरुषास स्त्री यांचा काही उपयोग नसतो. त्याचप्रमाणे आम्ही यांना कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही ते त्यांचेच घोडे पुढे दामटत राहणार. कारण या लोकांचं पोट आणि यांच्या महामानवांच अस्तित्व हिंदू द्वेषावर अवलंबून आहे. हिंदू धर्म श्रेष्ठ आहे हे जर मान्य करायची वेळ यांच्यावर आली तर ह्यांच्या पोटावर पाय येईल आणि ह्यांच्या महामानवाना त्यांच्या ग्रंथासाहित गंगेत विसर्जित करावे लागेल, त्यामुळे जीव गेला तरी हे लोक हि गोष्ट मान्य करणार नाहीत." खर तर एका सर्वसामान्य हिंदू ने आपलं मत मांडताना ह्या लोकांची दखल घ्यावी एवढी देखील ह्यांची पात्रता नाही. तरीही त्यांचेसाठी माझा हा लेखनप्रपंच.


    सर्वप्रथम मी ह्यांचे आम्हा हिंदूंच्या ३३ कोटी देवांबद्दल जे आक्षेप आहेत त्याबद्दल बोलतो. मुळात त्यांना ३३ कोटी देव कोणते हे विक्रमजीनी आपल्या लेखात व्यवस्थित पटवून दिले आहे. पण म्हणतात कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच राहणार त्याप्रमाणे हे लोक विक्रमजीनी दिलेले उत्तर मान्य करतील अशी तिळमात्र आशा नाही. माझे एवढेच सांगणे आहे कि जरी ३३ कोटी देव आमच्या धर्मात असले तरी तुम्हाला त्याच्याशी काय देणे घेणे आहे? प्रत्येक माणूस आणि त्याचे विचार आणि गती वेगळी असते. त्यानुसार प्रत्येक माणसाला त्याच्या पातळीनुसार देवाची भक्ती करता यावी म्हणून आमच्या संस्कृतीने ३३ कोटी देवांची निर्मिती केली असेल तर आपणास त्याचे वावडे का असावे?? तुम्ही आमचा हिंदू धर्म सोडला ना?? मग का मागे वळून बघताय?? कि तुम्हाला परत हिंदू धर्मात यायचंय??


    देवांचा प्रश्न आला कि ह्यांची गाडी गाडी हळूहळू पुरोहित वर्गावर आणि विशेषता ब्राम्हण समाजावर घसरते. मी विचारतो कि "देव आमचे. देवळे आमची. ती उभारली जातात सामान्य हिंदूंच्या पैश्यातून. तिथे दान रूपातून जमा होणारा पैसा सर्वसामान्य हिंदूंचा. त्या देवळांची व्यवस्था बघणारा आमच्याच हिंदू धर्मातला ब्राम्हण समाज. मग तुम्हाला काय करायचे आहे?? सर्वसामान्य हिंदू काय मूर्ख आहे आणि तुम्हीच तेवढे अकलेचे पुढारी?? कि तुम्हाला आता आरक्षणातून मिळणारा पैसा पुरेनासा झालाय?? म्हणून हिंदू समाजाच्या पैश्यावर तुमची काळी नजर आहे?? ब्राम्हणांना नेहमी लक्ष्य करता. तुमचे धर्मोपदेशक आणि भन्ते काय करतात हे काय आम्हाला माहित नाही?? एकीकडे ब्राम्हण समाजाला नपुंसक म्हणता आणि दुसरीकडे बाजीरावांच्या रखेली बद्दल तोंड भरून बोलता... हा तुमचा दुटप्पीपणा नाहीतर काय ?? पूरानांतल्या गोष्टींचा शब्दशः अर्थ काढून त्याचा विपर्यास करता आणि स्वतःच्या धर्मातल्या त्रुटी लपवून ठेवता....शब्दशः अर्थच काढायचा झाला तर ज्या तुकाराम महाराजाची महती गाता तेच एके ठिकाणी म्हणाले आहेत 'येथे पाहिजे जातीचे येरागबाळ्याचे काम नोहे' त्याच प्रमाणे आम्हाला आमच्या समाजाचे पौरोहित्य करायला जातीचेच ब्राम्हण हवेत. कोणी दारू ढोसून गटारात लोळणारा बहुजन नाही.


    नेहमी हिंदू धर्मातल्या श्रदधाना अंधश्रद्धा म्हणता आणि स्वतःच्या धर्मातल्या अंधश्रद्धा लपवून ठेवता. मुळ बौद्ध धर्मग्रंथात कितीतरी चमत्कारांच्या गोष्टी आहेत. जसे 'गौतम बुद्धाच्या आईला वयाच्या ४५व्या वर्षी पुरुषसंपर्काविना गर्भधारणा, जन्माच्या वेळी नाना चमत्कार, राजहंसाबद्दल जो न्यायनिवाडा झाला होता त्यावेळी ज्या साधुपुरुशाने न्याय दिला तो अदृश्य झाला, काही लोकांनी त्याला साप होऊन जाताना पहिले.' जर हिम्मत असेल तर आधी या अंधश्रद्धा दूर करा. मग आमच्या हिंदू धर्माबद्दल बोला. स्वतःचा तो बाब्या आणि दुसऱ्याचा तो कार्ता हि रीत सोडून द्या. मागे एकदा ह्या विशयाबद्दल बहुजन आल इंडियाला छेडले असता, त्याने खालील प्रमाणे अकलेचे तारे तोडले. तो म्हणाला कि "बाबासाहेबांनी आचरणास योग्य असा काही भागच बौद्ध धर्मातून घेतला आहे." मग मला सांगा कि ज्या बाबासाहेबांनी बौद्ध धर्मातल्या अंधश्रद्धा सुधारण्याचा प्रयत्न केला नाही, केवळ स्वतःला हवा तेवढा भागच घेतला त्या बाबासाहेबांना आणि त्याच्या अनुयायांना हिंदू धर्मातल्या अंधश्रद्धांबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार पोहोचतो काय?? स्वतःचे घर आधी साफ करा आणि मग दुसऱ्याच्या घरात डोकावून बघा. पण हे लोक असे करणार नाहीत कारण जागतिक पातळीवर यांना कोण विचारणार आहे?? यांची शाब्दिक गुंडगिरी फक्त भारतात आणि त्यातही महाराष्ट्रातच! हे लोक स्वतः संकुचित मनाचे आहेत आणि 'अवघे विश्वची माझे घर' असा मंत्र देणाऱ्या हिंदू धर्माला नाव ठेवत आहेत. हे म्हणजे डबक्यात पोहणाऱ्या बेडकाने अखंड समुद्र पाठीशी घालणाऱ्या देवमाश्याला उपदेश देन्यासारखे आहे.


    दुसरीकडे तो पुरुषोत्तम खेडेकर आणि भैय्या पाटील नावाचा कोणी तरी बोकड म्हणतो, हिंदू धर्म अस्तित्वातच नव्हता. तो १८व्या शतकात जन्माला आला. छत्रपती शिवाजी महाराज हिंदू नव्हते. मग राजांनी हिंदू पद्धतीनुसार राज्याभिषेक का केला?? तोही दोनदा! जर राजे हिंदू नव्हते तर आई भवानीची कवड्यांची माळ राजांच्या गळ्यात का असायची?? का राजांच्या कपाळावर तीलक असायचा?? राजाचं चित्र काढणारा तर नक्कीच ब्राम्हण नव्हता....मग त्याने असं चित्र का काढलं?? का मालोजी राजांनी वेरुळच्या एका शिव मंदिराचा जीर्णोद्धार केला?? संभाजी राजांना जर ते हिंदू नव्हते तर तर मग औरंगजेबाने का ठार मारला?? मराठ्यांची रणगर्जना 'हर हर महादेव' कोठून आली?? या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतीलच. मग विषय दुसरीकडे वळवण्यासाठी तुम्ही म्हणाल कि, "हिंदू धर्म नाही तर वैदिक धर्म अस्तित्वात होता." मग मी विचारेन, वैदिक धर्माचे नामांतर हिंदू धर्म झाले म्हणून आमच्या धर्माचं तत्वज्ञान बदललं का?? तसे असेल तर पूर्वाश्रमीचे हिंदू दलित आज बौद्ध झाले म्हणून त्यांच्या अंगातले रक्त बदलले का?? परत तुम्ही म्हणाल कि हिंदू हे नाव परकीय आहे. ते मुसलमानांनी दिले मग तसे असेल तर हिंदू धर्म हे नाव १८व्या शतकाच्या पूर्वी कित्येक शतकांपासून अस्तीताव्त असले पाहिजे. कारण मुसलमान काही १८व्या शतकात भारतात नाही आले. स्वतःचे लेख आणि पुस्तके संशोधन म्हणून खपवता पण संशोधन हे सिद्धांतावर अवलंबून असतात आणि सिद्धांतांना अपवाद हा असतोच. पण तुमचे संशोधन अपवाद सोडले तर सिद्धांताच्या पातळीवर सिद्धच होत नाही.


         एकीकडे परशुरामांनी २१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली म्हणून आज कोणी क्षत्रियच उरले नाहीत, सगळे क्षुद्र आहेत असे म्हणता पण तुमच्या या तथाकथित सिद्धांतातल्या "२१ वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली" या वाक्यातूनच तुमच्या सिद्धांतातली हवा निघून जाते कारण जर परशुरामाने १ल्या वेळेस पृथ्वी निक्षत्रिय केली मग दुसऱ्या वेळेस पृथ्वी निक्षत्रिय कशी करू शकेल?? ह्याचाच अर्थ परशुरामांनी पृथ्वीवर जे योद्धे होते त्यांना संपवलं. पण त्यांची पुढची पिढी आणि नव्याने जे कर्माने क्षत्रिय बनले होते त्यांची नवीन फळी तयार झाली. आणि हा क्रम परत परत चालूच राहिला २१ वेळेपर्यंत. म्हणून शिवाजी राजे हे क्षुद्र नसून क्षत्रिय आहेत. आणि ते त्या दिव्य आणि तेजस्वी परंपरेचे एक वारस आहेत जी आज संपूर्ण जगाला वंदनीय आहे.


        तेव्हा आम्हाला आम्ही कोण आहोत हे कोणी शिकवायची गरज नाही. आमच्या धर्मातील तत्वाज्ञानासार जन्माला आल्यावर आम्ही जेव्हा प्रथम रडलो तो आवाज "क्याह " असा होता तोच आमचा प्रथम प्रश्न "को अहं?" म्हणजे जन्मताच आम्हाला आम्ही कोण आहोत हा प्रश्न पडला होता. आणि आमच्या धर्माने आम्हाला "सो अहम" (सोहम! - चराचरात वास करणारा परमात्मा तो मीच) ! हा मंत्र देऊन आम्ही कोण हे आम्हाला जाणवून दिले आहे. तेव्हा हिंदू धर्मासारखा स्वतःच एवढा तेजस्वी गुरु असताना आम्हाला अन्य कोणाच्या चष्म्यातून आम्ही कोण हे बघायची गरज नाही.


     "आम्ही हिंदू त्या दिव्या परंपरेचे पाईक आहोत ज्या परंपरेने कुठलीही भौतिक साधन न वापरता मानवी शरीरातील सूक्ष्म शक्तींचा शोध लावला! आम्ही त्या परंपरेचे वारस आहोत जिथे प्रभू श्रीरामानी माता सीतेस पळवून नेणाऱ्या रावणाचा वध केला आणि नंतर त्याच रावणाकडून बंधू श्रेष्ठ लक्ष्मणास राजनीतीचे धडे घ्यायला लावले! आम्ही त्या दिव्य परंपरेचे पुत्र आहोत जिथे श्रीकृष्णाने राष्ट्र हितासमोर स्वतःचा मामा पहिला नाही, आणि "संभवामि युगे युगे" हा मंत्र देऊन आम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली आणि आम्हास निर्भय बनवले. आम्ही त्या परंपरेचे अनुयायी आहोत जिथे आर्य चाणक्याने भ्रष्ट राजसत्ता उलथवून लावली आणि एका दासिपुत्रास संपूर्ण भारतवर्षाचा सम्राट बनवला. आम्ही त्या तेजस्वी परंपरेचे अंश आहोत ज्या परंपरेने एकदिलाने शिवरायांना साथ दिली. आम्ही त्या दिव्य परंपरेचे शिष्य आहोत जिथे स्वामी विवेकानंदानी "माझ्या बंधुनो आणि भगिनीनो" म्हणत हिंदू धर्म हा कसा विश्वव्यापी आहे हे साऱ्या जगाला पटवून दिले.


     तेव्हा तुम्ही आमचा कितीही बुद्धिभेद केला तरी आम्ही आमचा हिंदू धर्म सोडणार नाही कारण याच हिंदू धर्मासाठी शिवराय उभे आयुष्य झुंजले होते. याच हिंदू धर्मासाठी नरवीर तानाजी लढला होता. याच तेजस्वी परंपरेचा पाईक असलेले कित्येक मावले धारातीर्थी पडले. याच हिंदू धर्मासाठी संभाजी राजांनी मृत्यूलाही लाजवेल असा मृत्य स्वीकारला. याच हिंदू धर्मासाठी आमच्या पूर्वजांनी पानिपतच्या मातीवर लढतालढता देह ठेवला होता. त्यांनी स्वताच्या रक्ताचं शिंपण घालून जतन केलेला हा हिंदू धर्म सोडणं म्हणजे त्या आमच्या पूर्वजांशी बेईमानी करण्यासारखं आहे. त्यांचे जे रक्त आमच्या नसानसांत खेळत आहे त्या रक्ताशी बेईमानी करण्यासारखं आहे. आणि बेईमानी हिंदूंच्या रक्तात नाही.


      आता एकच शेवटचं सांगणं आहे बिग्रेड, बामसेफ, मूलनिवासी सारख्या कचरा संघटनांना. हिंदू धर्मियांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका. हिंदू धर्माच्या त्रिदेवांपैकी भगवान विष्णूचा तिसरा अवतार आहे वराह म्हणजे डुक्कर, भगवान शिव शंकराचं वाहन आहे नंदी म्हणजेच बैल आणि गुरुदेव दत्तात्रेयांना प्रिय प्राण्याचा प्राण्यांपैकी एक होता श्वान म्हणजेच कुत्रा. म्हणून अजून तुमची गाय केली आहे. नाहीतर तुमच्यासारख्या मोकाट सुटलेल्या बैलाना, डुकरांना आणि कुत्र्यांना केव्हाच वठणीवर आणले असते. पण आता जास्त वेळ आम्ही सहन करणार नाही. तुमच्या प्रत्येक क्रियेला आम्ही प्रतिकिया नक्कीच देऊ.


कळावे


प्रसाद राउत(
सदस्य-हिंदवी स्वराज्य सेना)

Thursday 22 September 2011

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर
'हिंदुत्व' हा शब्दच ज्यांनी दिला आणि आधुनिक हिंदुत्व ज्यांनी एका अर्थाने सुरु केलं त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जात्युच्छेदनामध्ये सर्वात मोठे योगदान आहे. ज्या काळात देशात अस्पृश्यता होती, देशावर अनेक अंधश्रध्दा, कालबाह्य रुढी-परंपरांचा प्रभाव होता तेव्हा सावरकरांसारख्या अस्सल बुद्धिवाद्याने, विज्ञानवाद्याने आणि हिंदुत्ववाद्याने त्यावर अखंड प्रहार केले. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल म्हणून त्यांनी ते विचार मांडणे सोडले नाही. त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी भोजनालय ही सुरू केले. या सर्वांमुळे सनातनी ब्राह्मण भडकले व सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला. त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या. सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले. 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी यांना भटास बोलावू नका असे सांगितले. त्याचबरोबर काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहित त्याची खिल्ली उडवली. पण अजूनही अशी 'महासंमेलने' आपल्याकडे आयोजित होत आहेत आणि ती करण्यात अनेकांना 'गर्व' आहे यावरून सावरकरांना अपेक्षित असलेला समाज किती दूर आहे हे लक्षात येते. जाती मोडण्यासाठी ब्राह्मणांनीच पुढे यावे हे ही त्यांनी सांगितले.

सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातीव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ'जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शुद्रात 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजिल भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ह्या सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमधे दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खर्‍या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक. 'सावरकरांनी मनु:स्मृती जाळली नसली तरी तिचे विचार मात्र जाळले असेच म्हणावे लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची 'Annihilate the Caste' हीच शिकवण सावरकरांनी दिली. जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातीभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो.

त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १)वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुध्दा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर}२) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे.सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

अस्पृश्यता हा गुन्हा ठरवण्यात आला त्या दिवसाची नोंद भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी करण्यात यावी असे सावरकर म्हणत. त्यानंतरच्या दहा वर्षात अस्पृश्यता संपवली नाही तर अजून शंभर वर्ष त्याला लागतील असेही सावरकरांनी सांगितले जे बर्‍याच प्रमाणात खरे आहे असे दिसून येते. हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना त्यांनी महासभेच्या कार्यकर्त्यांना व नेत्यांना अस्पृश्यता निवारणासाठी गेल्या २०० वर्षात झाले नाही तितके काम येत्या २ वर्षात करायचे असा आदेश दिला होता. सावरकर प्रखर विज्ञानवादी होते. शुद्धीच्या वेळी गंगामाईचे पाणीही शिंपडायची गरज नाही असे त्यांनी सांगितले. जातीव्यवस्था पाळण्यात दोष सर्वांचा असला तरी गेल्या ८-१० दशकात तरी अस्पृश्यतेसारखी राष्ट्रविघातक रुढी पाळून चातुर्वर्णिक स्पृश्यांनी एक राष्ट्रघातक पाप केले आहेअसे ते म्हणतात. सावरकरांचे विचार स्पष्ट होते. ते सनातनास अपरिवर्तनीय सत्य न मानता सत्यास अपरिवर्तनीय - सनातन मानत. जात्युच्छेदनासाठी त्यांची शिकवण फार महत्वाची आहे. पण हिंदुत्ववाद्यांकडून त्यांच्या विचारांकडे बर्‍याच प्रमाणात दुर्लक्ष झालेले दिसते. नवतरुण वर्ग सावरकरांच्या विचारांनी प्रभावित नक्की होऊ शकेल. गरज आहे फक्त एका सक्षम नेतृत्वाची. हिंदुत्ववाद्यांमधे जात्युच्छेदनाच्या कामातील मानबिंदू म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. शेवटच्या कालखंडात सावरकरांनी सांगितले होते की 'माझी मार्सेलिसची उडी विसरली तरी चालेल पण माझे रत्नागिरीतील कार्य विसरु नका'. हिंदुत्वासाठी, राष्ट्रवादासाठी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माणुसकीसाठी जात्युच्छेदन सर्वात महत्वाचे आहे हे सावरकरांनी बरोबर ओळखले होते. आजकाल आपले समर्थक दूर जातील म्हणून फक्त विरोधकांवरच हल्ला करणारे लोक आहेत. त्यामुळेच ते यशस्वी 'राजकीय' नेते आहेत तर सावरकर 'विचारवंत, प्रबोधक व समाजसुधारक' ठरतात.

Wednesday 21 September 2011

मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम ह्यांचा राजधर्म

    राम राम,

    काही लोक भगवान श्रीरामांना स्त्री-पुरुष भेद करणारा म्हणून ओरडत असतात....
त्यांनी सीतेचा त्याग केला.तिला वाऱ्यावर सोडले म्हणून ते "पुरुष प्रधान" संस्कृतीचे होते असे हि म्हणतात.. 
पण त्यांना हे माहित आहे का ??
त्यांनी स्वतःच्या भावाला म्हणजे "लक्ष्मण' ह्यांना पण स्वतःपासून दूर लोटले होते.

रामायणात मध्ये खालील प्रसंग बघा :-
    त्याची कथा अशा प्रकारची.
एकदा कालपुरुष रामाशी चर्चेसाठी आला असता त्याने त्यास आपल्या एकांतात जर कोणी आला तर मृत्युदंडाची शिक्षा द्यावी असे सांगितले.
रामाने लक्ष्मणालाच कोणी आत येऊ नये म्हणून राखण करायला सांगितले. थोड्याच वेळात संतापी ॠषी दुर्वास तेथे आले असता,
त्यांनी मला आताच्या आता रामाला भेटायचे आहे व अवज्ञ केल्यास अयोध्या भस्मसात करेन असा धाक घातला.
लक्ष्मणाने नाईलाजाने आत प्रवेश केला. राजधर्माप्रमाणे रामाने सीतेप्रमाणेच दंड म्हणून अमात्य व मंत्री मंडळाच्या सल्ल्याप्रमाणे लक्षमणाचा त्याग केला. रामावाचून लक्ष्मण म्हणजे त्याचा मृत्युच. लक्ष्मणाने शरयु त प्राणांचा अवरोध करुन जलसमाधी घेतली.
   हि कथा येथे थोडक्यात देण्याचे कारण की सीता त्याग हा लिंगभेदाचा प्रश्न नसून राजधर्माचा विषय होता,हे या लक्ष्मण त्यागाच्या प्रसंगावरुन स्पष्ट होत आहे. सीतेला ,एका स्त्रीला वेगळा न्याय व लक्ष्मणाला .एका पुरुषाला वेगळा न्याय असा प्रकार नव्हता.

Tuesday 20 September 2011

कोठेतरी ठिणगी पडू दे. वन्ही पेटू दे

   भागवतधर्मी संतांनी सोपा सुटसुटीत नीतीधर्म दिला. जनतेच्या भाषेत दिला. भेदभाव कमी केला. लाखो लोक जमवून ऐक्याचे दर्शन घडविले. उत्कटता निर्माण केली. यात आणखी भर घालण्यासाठी त्या वेळेस समर्थ रामदासस्वामीही उभे राहिले. बाळपणीच “आई, चिंता करितो विश्वाची” असे म्हणून हा मुलगा कोप-यात विचार करीत बसे. घरातून हा बालशुक बाहेर पडला. बारा वर्षे तपश्चर्या करून पुढे बारा वर्षे देशपर्यटन केले. समर्थांनी देशाची स्थिती पाहिली. त्यांचे हृदय विदीर्ण झाले. लोकांत त्राण नव्हते.

    “न मिळे खायला खायला खायला.” असे हृदय पिळवटून समर्थ सांगत आहेत. लोकांच्या पोटात अन्न नाही. डोक्यात विचार नाही. काय करावे?

    समर्थनांनी महाराष्ट्र भूमी कार्यक्षेत्र म्हणून पसंत केली. महाराष्ट्र डोंगराळ प्रदेश. ठायी ठायी उंच किल्ले, खोल द-या. येथे स्वराज्याची शक्यता आहे असे का त्यांना वाटले?

    पडलेल्या जनतेत सुप्त शक्ती असते, पण घर्षणाशिवाय ठिणगी पडत नाही.

“वन्हि तो पेटवावा रे।
पेटविताचि पेटतो।।”

असे समर्थ म्हणाले. कोठेतरी ठिणगी पडू दे. वन्ही पेटू दे. परंतू वन्ही कसा पेटवणार?

समर्थांनी कर्माचा संदेश दिला..........

        भागवतधर्मी संतांनी ऐक्य निर्मिले. उत्कटता निर्मिली, परंतु कर्माचा संदेश द्यायला समर्थ उभे राहिले. त्यांनी एक नवीन दैवत दिले. कोदंडपाणी प्रभू रामचंद्र! रामचंद्रांची उपासना त्यांनी उपदेशिली. यात हेतू होता. रामाचा अवतार कशासाठी? रावणाचे निर्दालन करण्यासाठी. बंदिखान्यात पडलेले कोट्यावधी देव सोडवण्यासाठी राम आला. आजही नाही का येणार? येईल. परंतु जीवन संयमी करा. फोल चर्चा थांबवा. थोडे धारिष्ट करा. देव यायला तयार आहे. परंतु...

“कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे।।”

       तुमच्या धाडसाची तो अपेक्षा करतो. तुम्ही हात, पाय, हलवा. उठा, गोपाळांनी काठ्या लावल्या म्हणजे प्रभूची करांगुळी आहेच.


                                                                                                               साने गुरुजी.......

Thursday 8 September 2011

तरी ते आमचे "विघ्नहरातच" आहेत !!!!!!!!!!!!!!!!

राम राम,

गणपती बद्दलचे काही ओव्या...
ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील खालील नमनाची ओवी सुप्रसिद्ध आहे -


ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या |
जयजय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
देवा तुचि गणेशु| सकलमतिप्रकाशु|
म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजोजी ||

नामदेवांनीही गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात -

लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करितसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ||


सर्वात महत्वाची ओवी जी "तुकाराम महाराज" ह्यांनी गणपती बाप्पा साठी लिहिली ती,

गणराया लौकरी येई । भेटी सकलांसी देई ।।
अंगी सिंदूराची उटी । केशरकस्तुरी लल्लाटी ।।
पायी घाग-या वाजती । नाचत आला गणपती ।।
तुका म्हणे पाही । विठ्ठल गणपती दुजा नाही ।।

सांगा सांगा सर्वांना सांगा,
आमचे बाप्पा सर्वांना प्रिय होते,आणि आहेत.........
 
तुम्ही लाख "शोध" लावा,तरी ते आमचे "विघ्नहरातच" आहेत.....

Monday 5 September 2011

बुद्ध पंथातील गणपतीची रूपे...

राम राम,

मागच्या पोस्ट मध्ये आपण जैन पंथातील गणपती बद्दल माहिती वाचली......
आता आपण बुद्ध पंथातील गणपतीची रूपे बघू आणि जगभरातील गणपती बद्दल माहित घेऊ......

'कप्पदुमावदानम्' हा एक संस्कृत-महायानी भाषा मिश्रित प्राचीन बौद्ध ग्रंथ आहे.
त्यामध्ये एका प्राचीन कथेचा उल्लेख आहे. श्रावस्तीचा एक व्यापारी बौद्ध धर्माचा उपासक होता.
तो व्यापारासाठी 'रत्नाकर' नावाच्या बेटावर गेला होता. काही दिवसानंतर समुद्रात वादळ आल्याने त्याची नाव बुडाली.
 या संकटवेळी त्याने जिवाच्या रक्षणासाठी आपल्या धर्मातील देवांबरोबर गणपतीची आराधना केली.
यावरून असे दिसून येते प्राचीन काळात बौद्ध धर्मा‍त अन्य देवतांबरोबर 'गणेश' आराधना प्रचलित होती.
अशा प्रकारे बौद्ध साहित्यात अनेक दंतकथेत गणपतीचा उल्लेख मिळतो.
'महायानीत' तर गणपतीविषयी अनेक लहान-मोठ्या दंतकथा आहेत.

बौद्ध मंदिरात बुद्ध मूर्तीबरोबर अनेक गणपतीच्या मूर्ती सापडतात.
नेपाळमध्ये सम्राट अशोकाच्या मुली चारुमतीने अनेक बौद्ध मंदिराची निर्मिती केली आहे.
त्यामध्ये तिने स्वत: श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. त्याचे नाव आहे,"सूर्यगणपती "

पाचव्या शतकात चिनी यात्रेकरू फाहीयान भारतात आले होते तेव्हा ते आपल्याबरोबर गणपतीच्या अनेक मूर्ती घेऊन गेले होते.
 गणेश पूजेच्या परंपरेला ते आपल्यासोबत घेऊन गेले. 
वरील छायाचित्रात गणपती च्या सगळी कडे बुद्ध बसलेले आहेत...

पाचव्या आणि आठव्या शतकाच्या मध्यंतरात चिनी बौद्ध साहित्यात भारतीय संस्कृतीचा सविस्तर उल्लेख आहे.
त्यात गणेश पूजेचे वर्णन मिळते. ब्रिटीश संग्राहलयात जावा येथून मिळालेल्या अनेक गणेश मूर्ती आहेत.
या मूर्ती विविध मुद्रा असलेल्या आहेत. जावा बौद्ध धर्म मानणारा देश आहे.
यावरून असे दिसते की महायान संप्रदायात गणेश उपासनेचे एक विशिष्ट स्थान होते.
नेपाळ, लडाख आणि तिबेट येथील वज्रयान संप्रदायातील लोक आपल्या आराध्य देवाबरोबर 'गणेश मूर्तीची' स्थापना करतात.
ते सर्वप्रथम गणेश पूजा करतात. मंत्र सिद्धीसाठी गणेश आराधना आवश्यक आहे असा त्यांचा विश्वास आहे.
नेपाळी बौद्ध साहित्यात 'गणपती उदय' नावाचा एक प्रमुख ग्रंथ आहे.

त्या ग्रंथानुसार तथागत गौतम बुद्ध स्वत: म्हणतात- 'हे आनंद! गणपती उदयाचे वाचन केल्यावर लवकरच आपल्या इच्छा पूर्ण होतात.'

मग "गणपती" फक्त ब्राह्मण लोकांनी तयार केलेला देव आहे का ??
बुद्ध आणि जैन पंथात त्याला अनन्यसाधारण महत्व आहे..

आता आपण गणपतीचे अन्य देशातील स्थान बघू..

१) इराण -हत्तीच्या चेहेरा असणारा आणि मनुष्य देह असलेली मूर्ती लुरीस्तान,पश्चिम इराण मध्ये सापडली,ही पहिली मूर्ती आहे असे मानतात...
२) अफगाणिस्तान- १२०० ख्रिस्त पूर्व मध्ये इथे एक संगमरविरी मूर्ती सापडली आहे,त्यात गणपती एक लढवय्या स्वरुपात आहे.अश्या खूप मूर्ती तिथे होत्या पण त्या नष्ट करण्यात आल्या आहेत,कुणी केल्या असतील हे सांगायला नको.
३) ग्रीक देशात गणपतीला वेगळा देव म्हणून पूजतात,त्याचे नाव आहे "जानुस" त्याला मनुष्य देह आणि हत्ती चे तोंड असते.
४) Mexico मध्ये ही असाच देव पुजला जातो.
५) १३ व्या शतकातील गणपती कांबोडिया इथे गणपती ला "प्रहागणपती" म्हणतात..
६) जपान मध्ये गणपती ला "विनायाकश्र" म्हणतात..
७) जावा मध्ये त्याला "कालांतक" ह्या नावाने ओळखतात...

जैन ग्रंथातील हिंदू देवता गणपतीचे महत्व..........

राम राम,

नवीन माहिती नेट वरून तुमच्या साठी ....

जैन धर्मातील मंगलाचरण श्लोकात विघ्नविनाशक गणेशाचे स्मरण केले आहे.
 'गणेश' प्रणाम श्लोकाने आपल्या ग्रंथाची सुरवात केली आहे.
सतराव्या शतकाच्या प्रारंभ काळात कपूरमंजरीरासच्या सुरवातीला खालील चौथाई मिळते.


प्रथम गणपती वर्णव ॐ गवरी-पुत्र उदार ।
लक्ष लाभ जे पुरवई, देव सविहूँ प्रतिहार ।।
सेवंत्रे जस मुगट भर, शेंदूर सोही शिशिर ।
सिद्धी बुद्धी नऊ भरतार, जे बुद्ध‍ी अवतार बडवीर ।।

ही रचना श्वेतांबर जैन संप्रदायाचे पंडित मतिसार यांनी रचलेली आहे.
या प्रकारे समकालीन एका ग्रंथात हमीरेप्रबंधाच्या सुरवातीला एक दोहा मिळतो.

गवर‍ी पुत्र गजवंत विशाल, सिद्धी बुद्धी वर वचन रसाल।
सुर-नर-किनर सारइं सेव, धुरी प्रणमूँल लंबोदर देव।।





(सदर छायाचित्र हे जैन चित्रकाराने रेखाटले आहे)


या ग्रंथाचे रचनाकार अमृत कलश जैन श्वेतांबर संप्रदायाचे आहेत.
तसेच विवाहप्रसंगी 'विनायकयंत्र' पूजेची प्रथा आहे.

मग हिंदू धर्माचा जैन एक पंथ होतो ना.....

गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!!!!!

Saturday 3 September 2011

सर्व धर्म आणि त्यांच्या सर्व ग्रंथांचा पायाच मुळी हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता आहे...




शिकागोच्या धर्मपरिषदेत पहिल्यांदा भारतीय संस्कृतीची विजयी पताका स्वामी विवेकानंदांनी फडकवली.

भारतीय संन्यासी म्हणत त्यांची कुचेष्टाही काही जणांनी केली. परंतु, ते शांत होते.
शिकागो धर्मपरिषदेच्या व्यासपीठावर उपस्थित धर्मीयांचे धर्मग्रंथ ठेवण्यात आले होते. पण वरच्या बाजूला असलेली भगवद्गीता कोणीतरी अलगद काढून सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवली. स्वामीजींनी ते हेरलं. ते हसले. आणि बोलण्यास उभे राहिले.

"उपस्थित बंधू-भगिनींनो" अशी सुरवात करताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पुढे ते कितीतरी वेळ बोलत होते. आणि उपस्थित ते ऐकत होते.
'' व्यासपीठावर माझ्या धर्माचा ग्रंथ सर्वांत खाली ठेवण्यात आला आहे. ज्यांनी तो तिथे ठेवला त्यांचे मी आभार मानतो. माझी चूक मला त्यांनी उमजवून दिली. सर्व धर्म आणि त्यांच्या सर्व ग्रंथांचा पायाच मुळी हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता आहे ".

स्वामीजींच्या या भाषणाने सर्व सभागृह स्तब्ध झाले. अमेरिकेतील सर्वच प्रसारमाध्यमांनी स्वामीजींचे विचार अद्वितीय असल्याचे मान्य केले.

हिंदू धर्माला नवे ठेवणाऱ्या लोकांनी हे वाचावे....

पुढे त्यांनी असे भाषण केले,

मी तुम्हाला एक लहान गोष्ट सांगतो. माझ्या आधीच्या एका उत्तम वक्त्याचे आपण ऐकलेतच जो म्हणाला की, "चला, आपण सर्वजण एकमेकांची निंदानालस्ती, अपशब्द वापरणे थांबवूया," आणि त्याला वाईट वाटत होते की सतत सर्वत्र इतका (variance) फरक आहे.

पण मला आता एक गोष्ट सांगाविशी वाटत आहे जी या फरक (फारकत?) होण्याच्या मूळाबद्दल बोलते. एक बेडूक आपल्या विहीरीत राहत असतो. खूप वर्षे राहत असतो. तो तेथेच जन्माला आलेला असतो आणि तेथेच वाढलेला असतो. त्या विहीरीतच त्याचे जीवन गेलेले असते/चाललेले असते. अर्थात तेथे उत्क्रांतीवादी नव्हते जे सांगू शकले असते की त्या बेडकाचे डोळे शाबूत होते का नाही ते. पण गोष्टीपुरते आपण असे धरून चालूया की त्याचे डोळे चांगले होते आणि तो त्यांची निगा चांगली राखायचा. तिथे (एका ठिकाणी) राहून त्याची त्वचा गुळगुळीत/चकचकीत झाली होती आणि तो जाड झाला होता. एक दिवस अचानक त्या विहीरीत, समुद्रात राहत असलेला बेडूक येउन पडला.
"तू कुठून आलास?"
"समुद्रातून"
"समुद्रातून? केव्हढा मोठा असतो? या विहीरी एव्हढा?" आणि त्याने विहीरीच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूस उडी मारली.
"माझ्या मित्रा" समुद्रातील बेडूक म्हणाला, " समुद्राच्या भव्यतेची तुलना तू विहीरीशी कशी करतोस?"
मग विहीरीतील बेडकाने अजून एक उडी मारली आणि विचारले (दोन उड्यांच्या अंतराइतकी) की इतका समुद्र मोठा असतो?
"हा काय वेडेपणा आहे? समुद्राची तुलना तू विहीरीशी करूच कशी शकतोस?"
"असे काय!" विहीरीतील बेडूक (तेथील इतर बेडकांना म्हणाला) "म्हणजे हा (समुद्रातील) बेडूक खोटारडा आहे. माझ्या विहीरीपेक्षा काहीही मोठे असू शकत नाही! तेंव्हा हाकलून देउया याला!"

ही आपली नेहमीची अडचण आहे.

मी हिंदू आहे. मी माझ्या विहीरीत बसतो आणि तेच जग समजतो. तेच ख्रिश्चनांचे आणि मुसलमानांचे, आपापल्या विहीरीला जग समजत बसतात. (मला या पुढे जाउन तेच कम्यूनिस्टांचे आणि सेक्युलरवाद्यांचे म्हणावेसे वाटत आहे!) . हे अमेरिके, मी तुझा आभारी आहे, या प्रयत्नामुळे (सर्वधर्मपरीषदेमुळे) हे अडथळे मोडायला मदत होत आहे आणि मी आशा करतो की देवकृपेने येणार्‍या भविष्यात तू हे ध्येय साध्य करशील!


मनुस्मृती बद्दलचे वास्तव...

आजकाल हिंदू धर्माला आणि वैदिक संस्कृतीला मानणाऱ्या लोकांना मनुवादी म्हणायची Fashion आली आहे अशा महाभागांना काही साधे प्रश्न !!!!

१.मनुवादी मनुवादी म्हणून उर बडवून घेणार्यांनी मनु ब्राह्मण नव्हता तर क्षत्रिय होता हे आपणास माहित आहे काय??

२.खर तर जर्मनी सारख्या अनेक देशांनी त्यांची राज्यघटना तयार करताना मनुस्मृतीचा आधार घेतला आहे हे आपणास ठाऊक आहे काय???

३.संस्कृत ग्रंथ हे सूत्ररूपात असतात याचा अर्थ ती सूत्रे समजून देणारा लायक गुरु असला कि त्यांचा खरा अर्थ कळतो, हे महाभाग जी उदाहरणे देतात ती एकूण ग्रंथाच्या १% एवढीही नाहीत पूर्ण मनुस्मृती वाचली कि सहज कळते कि मनुने समाजाच्या प्रत्येक अंगाचा किती सूक्ष्म अभ्यास केला होता ....
आपण मनुस्मृती चा अभ्यास कोणत्या गुरूंकडे घेतलात ते सांगावे...आपण बाजारातली प्रत घेऊन वाचली असेल तर वर्तमानपत्रातले आरोग्य विषयक लेख वाचून एखाद्याने 'मी डॉक्टर आहे ' असे म्हणण्यासारखे आहे....

४.एकाच प्रकारची चूक जर ब्राह्मण आणि शूद्राने केली तर ब्राह्मणाला शुद्रापेक्षा शंभर पटीने अधिक कडक शिक्षा करावी असे सांगितलेले आपण वाचले नाही वाटते...

५.वयोवृद्ध शूद्राला राजाने तसेच ब्राह्मणांनी देखील सन्मान द्यावा असे देखील मनुस्मृतीच सांगते ....

६.मनुने सांगितलेले वर्ण हे जन्मानुरूप नव्हते तर कर्मानुरूप होते म्हणजे शुद्राच्या पोटी जर हुशार मुलगा जन्माला आला तर तो वेदांचे शिक्षण घेऊन ब्राह्मण होत असे तसेच कोणताही व्यक्ती धर्मकार्य करून ऋषी होत असे ..... महर्षी व्यास, वाल्मिकी ऋषी, आचार्य चरक, आचार्य सुश्रुत, आचार्य कान्कायान अशी शेकडो उदाहरणे याबाबत सांगता येतात जे जन्माने ब्राह्मण नव्हते पण त्यांना हिंदू धर्माने निसंकोच ऋषीपद दिले ज्यात कित्येक चांडाळ आदि कनिष्ठोत्तम कनिष्ठ वर्णाचे होते ....
आणि या महान ऋषीनी सांगितलेले महान तत्वज्ञान आज हिंदू संस्कृतीची ओळख आहे ज्यात ब्राह्मण हा शब्द फार अपवादाने येतो....

७.मनुस्मृती हि तत्कालीन शासन पद्धती आहे जिचा काळ शेकडो वर्षांपूर्वीचा आहे आता उन्हाळ्यातले कपडे हिवाळ्यात जसे चालत नाहीत तसेच एवढे जुने शासन आताच्या काळात फक्त संदर्भ म्हणून वापरा एवढेच काय ते अभ्यासकांचे म्हणणे आहे हर जरी कळले तरी पुरेसे आहे ....

ही आहे सर्व "हिंदू" धर्माच्या विरोधींना वास्तववादी थप्पड !!!!!!!


  

राहुल काळे 
व्यवस्थापक,हिंदवी स्वराज्य सेना
राम राम,

"मी शेंगा खाल्या नाहीत,मी टरफले उचलणार नाही"
"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच'"

अशी  सिंह गर्जना करणारे आपले "लोकमान्य गंगाधर टिळक",
पण आज त्यांना काही मंडळी "भटमान्य" म्हणून हिणवत आहे,
का तर त्यांनी "वैदिक" आचरणा बद्दल कडक मत व्यक्त केले.

पण  त्यांनी तर असे म्हंटले आहे,कि ज्यांना
वेदोक्ताचा संस्कार  करावासा वाटतो त्यांनी तो करावा....
ती हि "केसरी" ह्या मुखपत्रात,त्यांनी काय लिहिले बघूया.....


लोकमान्य टिळक लिहीतात  
" कोणास वेदोक्ताचा संस्कार करावयाचा असल्यास तो त्याने खुशाल करावा,उगाच जातीजातीतील तंटे वाढवण्याची आमची इच्छा नाही व या विषयावरील दोन लेखात तशा प्रकारचा मजकूरही आलेला नाही. तेव्हा नसता दोष आमच्या माथी मारुन आम्हास भलत्याच वादात गोवण्याची कोणाची इच्छा असेल तर ती आमच्याकडून सफल होणार नाही..."


                                                                                      केसरी
                                                                                                           ५-११-१९०१

Friday 2 September 2011

बहुजनांनो उघडा डोळे बघा नीट..

      बाबासाहेब असे कधीच बोलले नाहीत कि हिंदू धर्म संपवा,ब्राह्मणाला देशाबाहेर काढा.....
त्यांना हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था खटकत होती....त्या धर्मातील काही गोष्टी बदलण्यासाठी त्यांनी हिंदू कोड बिल आणले पण पुढे त्यांना विरोध होत राहिला म्हणून त्यांना नाईलाजाने धर्म परिवर्तनाचा निर्णय घ्यावा लागला....

     हे त्यांनी कित्येकदा बोलूनही दाखवले, कि त्यांचा लढा 'ब्राह्मण विरुद्ध बहुजन' असा नव्हता ! तर समाजातील 'उपेक्षित वर्ग विरुद्ध प्रस्थापित वर्ग' असा होता, पण ते असे कधी बोलले नाहीत कि 'प्रस्थापितांना देशातून हाकलले पाहिजे!'

    पण आज काल हे बामसेफ आणि बी ग्रेड सारख्या संघटना यांनी हे नवीन फंडे काढलेत,ईथे एक गोष्ट लक्षात घ्या कि बी ग्रेड हि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे पिल्लू नाही,बामसेफ या संघटनेने त्यांची व्याप्ती वाढवण्यासाठी मराठा सेवा संघ व ओबीसी सेवा संघ अश्या संघटना जन्माला घातल्या....

     त्यातील मराठा सेवा संघाने संभाजी बिग्रेड हि लढाऊ संघटना उभारली कि ज्या अंतर्गत मराठा युवकांना भडकावणे सोपे जाईल...
दलितांवर अन्याय झाला असल्याने दलित युवक भडकावणे सोपे असते पण मराठा युवकांना भडकावयाचे कसे तर त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या शिवाजी महाराजांचे नाव वापरून...
ब्राह्मणाच शिवाजी महाराजांची बदनामी करतात हे कोणत्याही प्रकारे मराठा युवकांवर बिम्बवयाचे आणि त्यांची टाळकी भडकावयाची हा एककलमी कार्यक्रम बी ग्रेड ने राबवलेला दिसतोय....

    बहुजनांनी योग्य विचार केला नाही तर नंतर या देशातून बाहेर जाण्यात त्यांचा नंबर लागेल,आणि मुख्य षड्यंत्र इस्लामी आणि ख्रिस्ती ह्यांचे आहेत....

    हिंदू धर्म फोडण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणवर यांना पैसा पुरवला जातो,हे ह्यांचे संघटनांचे हिशोब लोकांसमोर का ठेवत नाहीत,ह्यांच्या अधिवेशनाला कोट्यावधी रुपये खर्च केले जातात कुठून येतो हा पैसा ?
    बामसेफ चे २ भागात विभाजन झाले त्यातील १ बामसेफ (बोरकर) २ बामसेफ (मेश्राम) असे का झाले ? कश्यावरून वाद झाले असणार साहजिकच आहे,पैसा कारण राजकीय संघटना नसल्याने सत्तेचा प्रश्नच येत नाही....

    मित्रांनो उघडा डोळे बघा नीट,
    दलितांचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर चालू आहे त्यावर का हे लोक काही बोलत नाहीत,कसे बोलणार उनकी बिल्ली उनको म्याव नही करेगी....
उत्तर पूर्व भागात असणारी बौद्धांची ८०% लोकसंख्या ५० वर्षात ४/५% आली, ख्रिस्ती मिशनरी कडून प्रदेश सोडून जायच्या धमक्या त्यांना येत आहेत....
    बौद्ध मठांच्या जागा ख्रीस्तींकडून हडप करण्यात आल्या आहेत,शासन धर्मनिरपेक्ष असल्याने ख्रीस्तींचे लाड करते,आणि सत्तेवर पण ख्रिस्तीच आहेत,लडाख सारख्या भागात बौद्ध मुलींचे अपहरण त्यांचे धर्मांतरण,पुरुष्यांच्या हत्या अश्या अनेक प्रकारे मुस्लिमांकडून अन्याय चालू आहे,का नही हे बामसेफ वाले तोंड उघडत कारण साफ आहे,जनतेने ह्यांच्या पासून सावध राहावे,

   जय भीमराय ! जय शिवराय

   -विकास खरात

स्त्रियांच्या बाबतीत हिंदु धर्मावरील आक्षेप व खंडण..



स्त्री आणि धर्म !!!!

आजपर्यंत वैदीक सनातन्यांमुळे "स्त्री" जात नेहमी उंबरठ्याच्या आत ठेवली गेली आहे...वैदीकानी स्त्रीयांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले आहे... हिंदु धर्मात स्त्री नेहमी उपेक्षितच राहिली आहे.... वगैरे सारखी वाक्य आपल्यासाठी काही नवीन नाहीत...

अंनिसवाले व स्त्री-मुक्ती वाले व आजची समाजसुधारकांची वंशावळ समाजवादी यांच्या तोंडची ही नेहमीची वाक्ये... परंतू इतर धर्मातील स्त्रीय
ांची अवस्था पाहता यांच्या शिडातील हवाच निघून जाते....
हिंदु धर्मात स्त्रीयांची जी अवस्था होती त्याला तथाकथीत धर्माचे मक्तेदार कारणीभूत होते अणि केवळ या कारणामुळे संपुर्ण धर्मालाच वेठीस धरणे किती बरोबर आहे ?
ज्या काही तथाकथित वाईट प्रथा होत्या त्या कालांतराने हिंदु धर्मातुन कालबाह्य झाल्या आहेत.....
सुदैवाने आजच्या काळात अशा काही प्रथा हिंदु धर्मात अस्तित्वात नाहीत तरिही आज काही लोक संपुर्ण धर्मास वेठीस धरतात हे किती बरोबर आहे ?
बरे,असे ही नाही की या लोकांना स्त्रीयां विषयी कळवळा नेहमी असतो......
जेव्हा याठिकाणी हिंदु धर्माचा संबंध येतो नेमका त्याच वेळी या लोकांना हिंदु धर्मातील स्त्रियांचा पुळका येतो.....
हुंडाबळी , स्त्रीयांच्या आत्महत्या , घरगुती मारहाण यांसारख्या प्रकरणांमध्ये हे अंनिसवाले अणि स्त्रीमुक्तीवाले काहीही बोलताना अथवा काही करताना आढळत नाही....
परंतु हेच सुधारणावादी चार स्त्रियांना एकत्र करुन कुंडलिची होळी व स्त्रीयांना शनी शिंगणापूर मंदिर प्रवेशा सारखी आंदोलने घेतात तेव्हा यांना सुधारणेच्या नावाखाली तिसराच काहीतरी हेतू साध्य करायचा नाही ना ? असा दाट संशय आल्याशिवाय राहत नाही .....

असो.
"हिंदू धर्मात जेवढ्या यातना स्त्रियांच्य वाट्याला आल्या असाव्यात तितक्या यातना इतर कोणत्याही धर्मात स्त्रियांच्या बाबतीत आल्या नसाव्यात" ..... अशाप्रकारची काहीशी बेताल व अभ्यासहीन वक्तव्ये ही मंडळी करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची किव कराविशी वाटते.

इतर पंथातील स्त्रीयांच्या बाबतीत येण्या-या यातनांवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

ईस्लाम पंथ
पाकिस्तान व बांग्लादेश हे कट्टर ईस्लामिकतेचा पुरस्कार करणारी राष्ट्रे यांची घटना शरियत नुसार चालते.....
पाकिस्तान मध्ये "होदूद" नावाच्या वटहुकूमानुसार स्त्रियांच्या बाबतीत विवाहबाह्य संबंध म्हणजेच "झिना" हा दाखलपात्र गुन्हा आहे व त्यासाठी त्या स्त्रि ला दगडाने ठेचून मारण्याची अथवा १० वर्ष तुरूंगवासाची किंवा दंडासह फटक्यांची शिक्षा आहे....
पण विवाहबाह्य संबंध नसल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी मात्र त्या स्त्रिची आहे !!!
केवळ हिनासाठी पुरुष साक्षीदार न मिळाल्यामुळे ९० स्त्रिया या झिनासाठी दोषी ठरल्या आहेत!!!
याचमुळे झिना महिलांची तुरुंगातुन संख्या दुप्पट झाली आहे. तुरुंगातील या महिलांवर पोलिस अत्याचार करतात व बलात्कार तर रोजचीच गोष्ट आहे .....
या नंतर "किसास आणि दियात" नावाचे कायदे या कायद्यांमध्ये तर स्त्रियांचे आयुष्य मुल्य पुरुषांच्या तुलनेत अर्ध्ये मानले आहे .
यानंतर बांग्लादेशामध्ये ढाकामध्ये एका घटनेविषयी "द ट्रायब्यून" च्या १२.०१.९४ च्या अंकामध्ये तेथील समाज रचनेवर प्रकाश टाकला आहे ,
"नुरजहान नावाच्या एका १२ वर्षीय तरूणीला दगडानी ठेचण्यात आले त्यामुळे तीने जंतुनाशक औषध प्रशाण करून आत्महत्या केली ."
तिचा गुन्हा फक्त एवढाच होता की आपल्या पतिशी कायदेशीर तलाक न घेता दुसरा निकाह लावला होता .
आणखी एक अशीच घटना
"दुस-या एका नुरजहानला बांबूला बांधण्यात आले आणी तिला जिवंत जाळण्यत आले तिचा हाच गुन्हा होता की तिचे विवाहबाह्य संबंध होते असा ’संशय’ होता !!!! "
दक्षिण बांग्लादेशात ’साथीरा’ जिल्ह्यातील एक घटना. कालिपुर या खेड्यातील फिरोजा खाटून नवाच्या तरूणीचे ’उदय मंडळ’ नावाच्या हिंदु तरूणाशी प्रेम जडले या गुन्ह्यासाठी तीला उघड्या मैदानावर १०१ वेळा दगडाने ठेचण्याची शिक्षा देण्यात आली .
आजही मुस्लिम स्त्रिला मशिदीत मध्ये प्रवेष नाकारला जातो त्यांना बुरख्याखाली ठेवले जाते....

हिंदु महिलांना मंदिरप्रवेशासारख्या आंदोलनाचे आयोजन करणारे
तथाकथीत 'सर्व-धर्म-समभाव'वादी मिश्रीत 'सुधारणावादी' मुस्लिम स्त्रियांच्या मस्जिद प्रवेशासाठी लढा देण्याची हिम्मत करतील का ? हिंदु धर्मामध्ये मुस्लिम धर्मापेक्षा अधिक असमानता आहे का ?

ख्रिश्चन पंथ
ख्रिश्चन धर्मात स्त्रियांना पुर्णपणे स्वातंत्र्य आहे. असा फार मोठा गैरसमज प्रचलित आहे . बायबल हा ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ!!!
यामध्ये स्त्रियांविषयी काय म्हटले आहे ??
'लेपिय १२:४' मध्ये बाबबल म्हणते "स्त्रिने आपल्या रक्तस्रावापासुन शुद्ध होण्यासाठी 33 दिवस घालवावे तिने कोणत्याही शुद्ध पवित्र यास स्पर्श करू नये" ......
म्हणजे तेहतीस दिवस मासिक धर्माच्या दिवसा नंतर घालवावे म्हणजे लगेच पुढचे मासिक धर्माचे दिवस येतात व अशाप्रकारे योजनाबद्ध रितीने आयुष्यभर स्त्रिला अशुद्ध ठेवण्याची तरतूद बायबलने करुन ठेवलेली आहे .

'अनुवाद २१:११' मध्ये बायबल अपल्या अनुयायांना युद्धात हारलेल्या स्त्रियांना बायका करुन घेण्यासाठी त्यांचे शिर मुंडवण्याची व मुळापासुन नखे काढण्याची आज्ञा देते.
याच प्रकरणामध्ये २२:२० मध्ये जर जर एखाद्या स्त्रीच्या ठीकाणी कौमार्यचिन्हे दिसुन आली नाहित तर तिला मरेतोवर दगडानी ठेचूण्न मारण्याचा आदर्श बायबल घालून देते.
२२:०५ मध्ये बायबल म्हणते "कोणा स्त्रिने पुरुषाचा पेहराव करू नये".
'ईयोब १५:१४' मध्ये बायबल "स्त्रि पासुन जन्मलेले निर्दोश कोठून असणार" व २५:४ मध्ये 'स्त्रि पासुन जन्मलेला पुरुष निर्मळ कसा असणार ?'असे तारे तोडले आहेत!!!

बायबल मधील देव स्त्रियांना शाप देताना उत्पत्ती ३:१५ मध्ये म्हणतो "तुला बहूत दु:ख होईल व गर्भधारणेचे क्लेष होतील तु क्लेषाने लेकरे प्रसवशील तुझा नवरा तुझ्यावर स्वामीत्व चालवील" .

बायबल नेहमी 'चेटकिणीला जिवण्त ठेवू नका' याच न्यायाने स्त्रियांशी वागायला सांगते. जो बायबल समर्थक आहे तो कधीच स्त्रियांना मान देणार नाही.

हिंदु धर्म
हिंदुधर्मामध्ये स्त्रीयांना कोणते स्थान आहे ते वेगळे सांगायला नको.
हिंदुधर्माने स्त्रीला "देवी" मानले आहे.
राम-लक्ष्मण व हनुमाना सोबत सीतेला सुद्धा पुजले जाते.
हे खरे स्त्री-पुरूष समानतेचे पतीक नाही काय ?
आपल्या देशाला सुद्धा हिंदु धर्माने सदैव मातेसमान मानले आहे. ईतकेच काय तर १००% उपयोगी असलेला पशू गाय !!!!
या पशूला सुद्धा हिंदू धर्माने कधी पशू न मानता आई मानले आहे .
"परनारिया रखुमाई समान" असा विचार केवळ हिंदु धर्मच देऊ शकतो.
परंतू ज्याप्रमाने मधल्या काळात हिंदु धर्मात रुढी परंपरा निर्माण झाल्या त्याचप्रमाणे याच धर्मातील लोकांनी आज नामशेष केल्या आहेत व उरल्या सुरल्या आहेत त्या सुद्धा मिटून जातील परंतू या रूढींना हिंदुधर्मशास्त्राचा काडीचा सुद्धा आधार नाही ....
जसा इस्लाम मध्ये "शरियत" चा व ख्रिश्चन धर्मा मध्ये "बायबल" चा आहे.

भारतातील मुस्लीम समाजातील महिलांचा "अल्पसंख्यांक" म्हणुन राहण्यात तोटा म्हणजे सामाजिक सुधारणेला ते कायमचे पारके झालेले आहेत.
काही वर्षापुर्वी संसदेत "हिंदु कोड बिल" मंजूर होऊन त्याचा फायदा झाला आहे.
त्यामुळे हिंदु समाजातील सर्व पंथांना कालानुरूप सामाजिक सुधारणांचा लाभ मिळत आहे. अगतीक परस्थितीत स्त्रीयांना पोटगिसह घटस्फोटाचा हक्क मिळाला आहे.
द्विभार्या प्रतिबंध कायद्यामुळे हिंदु स्त्रीयांना सवत होण्याची भिती राहीलेली नही.
याऊलट मुसलमान स्त्रियांना सामाजीक सुधारणेचा फायदा मिळत नाही हे शहाबानो प्रकरणावरून सिद्ध झाले आहे .


                 
                                                    अ‍ॅड.विकास संदीपान खरात
 व्यवस्थापक 
हिंदवी स्वराज्य सेना 

आपला महान हिंदू धर्म.


हिंदू धर्म हा विश्वातील अतिप्राचीन , अत्यंत सहिष्णु , वैश्विक चिंतन करणारा , विश्वाला कुटुंब मानणारा असा अत्यंत उदार आणि श्रेष्ठ धर्म आहे. हिंदू धर्म-संस्कृतीने मानवाच्या लौकिक-पारलौकिक सर्वाभ्युदयाचा सर्वांगीण विचार केला आहे. व्यष्टी-समष्टी-परमेष्टी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हिंदू धर्म होय. व्यावहारिक उत्तमता आणि पारमाथिर्क श्रेष्ठता यांचा उत्तम समन्वय हिंदू धर्मात असून , मानवाला द्वैताकडून अद्वैताकडे- अर्थात मानवी विकासाच्या अत्युच्च शिखरावर सुप्रतिष्ठित करण्यावरच हिंदू धर्म-संस्कृतीचा भर आहे. आधिभौतिक , आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा उत्क्रान्त क्रमाने मानवाला जीवनाच्या अंतिम लक्ष्याचा पूर्वानुभव देण्याचे उद्दिष्ट केवळ हिंदू धर्मातच आहे. हिंदू धर्म हा सर्वकल्याणकारी आहे.

' सवेर्पि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:।
सवेर् भदाणि पश्यन्तु मा कश्चित् दु:खमाप्नुयात्।। '
ही हिंदू धर्माची प्रार्थना अलौकिक आहे.

हिंदू धर्मातील चार आश्रम म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अभूतपूर्व संगम आहे. चार वर्ण हे अनुक्रमे ज्ञान- सत्ता- संपत्ती- कला यांची प्रतिके आहेत. हिंदू धर्मातील पुनर्जन्म आणि कर्मविपाक अत्यंत तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ आहेत. वृद्धांची पूजा आणि स्त्रीला मातृरूपात पाहणे ही हिंदू धर्माची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये आहेत. ' मातृवत् परदारेषु ' हीच हिंदू धर्माची शिकवण आहे. माता- पिता-आचार्य यांच्याबरोबर हिंदू धर्म अतिथीलाही देवासमान मानतो , पूजतो. अंत:करणशुद्धीचे सर्वाधिक प्रबळ साधन म्हणजे संस्कार. या संस्कारांना हिंदू धर्मात अत्यंत श्रेष्ठ स्थान आहे. म्हणूनच सर्व हिंदू जीवन सोळा संस्कारांत निबद्ध आहे. कर्मातील भिन्नता पण स्नेहातील एकता हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे. सांस्कृतिक विविधतेत एकात्मतेचा प्रत्यय हिंदू धर्मच देतो. अवघ्या विश्वाला एक कुटुंब- एक घर मानण्याची वैश्विक अनुभूती हिंदू धर्मात आहे. सगुण-निर्गुणाचा अद्भुत समन्वय हिंदू धर्मात आहे. सगुण अवतारात हिंदू धर्माचा गौरव सामावला आहे. हिंदू धर्म केवळ स्वराज्यापुरता मर्यादित नाही.. स्वराज्याचे सुराज्य करून तो रामराज्याकडेही झेपावतो. हिंदू विचाराचं अंतर्यामी सूत्र आहे ' एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति। ' धामिर्क- राजकीय- आथिर्क- सामाजिक- व्यक्तिगत स्वातंत्र्याचा उद्घोष हिंदू धर्म करतो. पण या सर्वांचा उपयोग सत्यदर्शनासाठी , एकात्मतेसाठी आणि परमार्थासाठी झाला पाहिजे , हा हिंदू धर्माचा आग्रह आहे. हिंदू धर्मातील ऋत- अर्थात वैश्विक सत्याची संकल्पना दिव्य आहे. त्यावर आधारित व्यक्तिगत जीवन नि:स्वार्थ , तपोमय , त्यागमय , निष्ठामय , श्रद्धामय करण्याचा आदेश हिंदू धर्म देतो. हिंदूंची तृप्ती लौकिक वा भौतिक विजयाने होत नाही. आध्यात्मिक अनुभूतीच हिंदूला सर्वश्रेष्ठ वाटते. कुटुंब संस्था म्हणजे हिंदू धर्माचे सारसर्वस्व! अथर्व वेदातील ऐक्यवृद्धी या सूक्तात म्हटले आहे-

' हे बांधवांनो , तुमच्यातील द्वेष नाहीसा होऊन तुमची हृदये आणि मने एक होवोत. धेनुवत्सादृश्य सौहार्द तुमच्या ठायी वृद्धिंगत होवो. पुत्र पित्याची अवज्ञा न करो. माता-पुत्रांमध्ये एकोपा असो. पती-पत्नी परस्परांशी मधुर आणि मृदू भाषण करोत. बंधू-भगिनी परस्परांचा विद्वेष न करोत. समस्त जन सामंजस्याने आणि एकोप्याने मधुर भाषण करोत. (हे बांधवांनो) , तुमच्या घरातील देवविरोध (नास्तिकता) नाहीसा करून द्वेषराहित्य आणि एकोपा निर्माण करणारी कृत्ये आम्ही प्रारंभितो. हे बांधवांनो , कनिष्ठांनी , आपले स्थान ओळखून , तसेच थोरांना मान देऊन ऐक्य कायम ठेवावे. तुमच्या कार्यात आणि मनात सदैव एकजूट असो. हे बांधवांनो , रथचक्राच्या आऱ्यांप्रमाणे तुमची जलगृहे , भोजनगृहे , धर्मनियम तसेच तुमचे वर्तन एकात्म असावे. एकत्रपणे तुम्ही अग्न्युपासना करा. (हे बांधवांनो) , तुम्हास मी एकहेतूचे आणि एकमनाचे बनवितो. अमृताचे एकमताने रक्षण करणाऱ्या देवगणाप्रमाणे तुम्ही परस्परांना आपलेसे करून सर्वकाळ ऐक्य प्रस्थापित करा. ' ( अ. वे. 3.30.1-7)

द्वंद्वात्मक सृष्टीत निर्द्वंद्व होण्यातच मानवी पुरुषार्थ आहे. अर्थ व काम यांनाही हिंदू धर्माने पुरुषार्थ मानले , पण त्यांचे स्थान दुय्यम ठेवले. प्रधान पुरुषार्थ आहेत धर्म आणि मोक्ष!

अन्य देशांत ईश्वराचे , भगवंताचे प्रेषित येतात. आपण असे भाग्यवंत आहोत आणि आपला देश असा महान आहे की , इथे प्रत्यक्ष भगवंतच अवतरत असतो. संपूर्ण पृथ्वी हे जर मोठे घर मानले , तर बाकीचे देश हे या घरातील मोठी दालने असतील. पण भारतवर्ष म्हणजे ' देवघर ' आहे.

आपल्याकडे बार्हस्पत्य संहितेत एक अतिशय सुंदर श्लोक आलेला आहे. तो श्लोक असा आहे-

' हिमालयं समारभ्य यावदिन्दुसरोवरम्।
तं देवनिमिर्तं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते।। '

' ज्याचा प्रारंभ हिमालयापासून झालेला आहे आणि ज्याची सीमारेषा हिंदू महासागरापर्यंत आहे , तो हा देश प्रत्यक्ष देवांनी निर्माण केलेला आहे अन् त्या देशाचे नाव हिंदुस्थान आहे. '

हिंदू धर्म आणि हिंदुस्थान यांची अलौकिकता निविर्वाद आहे.

अ‍ॅड.विकास संदीपान खरात
    व्यवस्थापक 
हिंदवी स्वराज्य सेना                                                             

मुलनिवासी एक धादांत खोटी संकल्पना.


आज काल संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ,बामसेफ, ह्या संघटना हिंदू धर्मात फुट पडायचा प्रयत्न करताना दिसतात.ह्या साठी त्यांनी सुरवातीला निवडला आहे तुलनेने अल्पसंख्याक असलेला ब्राह्मण समाज.ब्राह्मण समाजाविषयी नको तो अपप्रचार करून ब्राह्मणेतर समजा मध्ये द्वेष पसरवायचे हे कारस्थान आहे.मुळात आर्य ,द्रविड हा वाद ब्रिटीश नि मुद्दामून निर्माण केला...त्यांच्या फोडा  व राज्य करा ह्या नीती ला अनुसरून.स्वकीयांनी एखादी गोष्ट ओरडून सांगितली तरी ती आपण मान्य करत नाही पण बाहेरील लोकांनी कानात सांगितली गोष्ट तरी ती पटते.त्याचाच हे उदाहरण.गोरे लोक वाद पेटवून गेले...बर गेले त्याला ६० वर्ष झाली तरी आम्ही भांडतोय अजून.त्यांनी निर्माण केलेला हा वाद किती खोटा आणि निरर्थक आहे हे पहा.
आर्य नावाच्या गोर्‍या कातडीच्या, नीळसर डोळ्यांच्या, उंच- धिप्पाड अंगकाठीच्या लोकांनी कित्येक वर्षांपुर्वी भारतावर आक्रमण केलं आणि इथल्या मुळ निवासी 'द्रविड़' नावाच्या वंशाच्या लोकांना पराभूत केले. हा सिद्धांत गेली दिडशे वर्षे प्रचलित आहे. या सिद्धांताने भारताचे अतोनात खच्चीकरण करून त्याला न्युनगंडाने पछाडून टाकले. उत्तर-दक्षिण भारतीय असा संघर्ष त्यातून निर्माण झाला. मात्र आता नव्याने झालेल्या जनुकीय संशोधनाच्या निष्कर्षानुसार, आर्य आणि द्रविड़ असे भिन्न वंश अस्थित्वात नाहीत. कथित आर्य अणि द्रविड़, सर्वांचे जीन्स सारखेच आहेत. त्यामुले द्राविडी अस्मितेच्या नावाखाली उभारण्यात आलेल्या दक्षिणेकडील\ राजकीय पक्षांचे अस्थित्वाच धोक्यात येऊ शकेल. 'हार्वर्ड विद्यापीठ' त्याच्याशी संलंग हार्वर्ड मेडिकल स्कूल, हार्वर्ड स्कूल ऑफ़ पब्लिक हेल्थ, ब्रॉड इंस्टिट्यूट ऑफ़ हार्वर्ड अणि एम्. आय. टी या शिक्षणसंस्था आणि भारतातील 'हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर एंड मोलिक्यूलर बायोलोजी' यांनी संयुक्तपणे हे जनुकीय संशोधन केले आहे मुळात या शोध प्रकल्पाचा उद्देश आर्य-द्रविड़ वंशाची निश्चिती करणे असा नाहीच. एकंदर भारतीय समाजात काही विशिष्ट जनुकीय व्याधी आढळतात. या जगात अन्यत्र आढळत नाहीत मग त्यामागील कारण काय असावे, हे शोधणे हां प्रकल्पाचा मुख्य उदेश आहे.
परंतु यावर काम करत असताना संशोधकांच्या समोर आर्य-द्रविड़, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय, गौरवर्णीय-कृष्णवर्णीय, उच्चवर्णीय-निम्नवर्णीय, नागरी- वनवासी असे विविध राजकीय सामाजिक भेद आले. याकरीता या संशोधकांनी वरील सर्व गटांमधील व इतरही गटांमधील व्यक्ती निवडल्या. २५ भिन्न गटांमधील १३२ व्यक्तींच्या जनुकंचे नमूने घेऊन त्यांचे तीन लाख जनुकीय कसोट्यांद्वारे विश्लेषण करण्यात आले.
सीसीएमबीचे पूर्व संचालक लालजी सिंग आणि वरिष्ठ वैज्ञानिक कुमारस्वामी दंगराजन यांनी या प्रकल्पाचा निष्कर्ष विशद करताना सांगितले की, विशिष्ट व्याधी फक्त भारतीय समाजाताच का आढळतात ?, यावर या संशोधनातून प्रकाश तर पडलाच आहे; पण आर्य-द्रविड़, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय, गौरवर्णीय-कृष्णवर्णीय, उच्चवर्णीय-निम्नवर्णीय, नागरी- वनवासी असे विविध सामाजिक भेद आज आपल्याला दिसून येत आहेत, त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही, हे मात्र जनुकांनी दाखवले आहे कारण परिक्षणासाठी घेतलेल्या सर्व नमुन्यांची जनुकीय वैशिष्ट्ये समान आहेत. म्हणजेच जनुकीय विज्ञानानुसार सर्व भारतीय एकाच वंशाचे आहेत.

उद्या ते म्हणतील कि "मी तुमचा बाप आहे",त्यावर पण विश्वास ठेवाल ?

राम राम,

काही फुटकळ इतिहासकार/समाजसुधारक,
नाही नाही,
काही नवीन "शोध" लावणारी जमात आपल्या महाराष्ट्रात जन्मली आली आहे.
ते नवं-नवीन शोध लावण्यात गुंतली आहे,
ह्यांनी म्हणजे सर्व "वैज्ञानिक" लोकांना पण मागे टाकले आहे.

त्यातील एक शोध म्हणजे,
छत्रपती शिवाजी राजेंचे गुरु "रामदास स्वामी" हे म्हणे आदिलशाहचे हेर होते.
ते "हिरव्या" रंगाचे कपडे/उपरणे/लंगोटी तत्सम काही घालायचे.

ह्याच्या डोक्याची "कीव" करावी तितकी कमीच आहे,
पण ह्यांचे ऐकणार्यांना एक सांगावेसे वाटते,
उद्या ते म्हणतील कि "मी तुमचा बाप आहे",त्यावर पण विश्वास ठेवाल ?

ऐका,
उद्या तुम्हाला हे कुणी सांगितले तर त्यांना एकाच प्रश्न विचार....
विचाराल ना??

ज्यांनी,हिंदू देवतांच्या आरत्या लिहिल्या,उदाहरण १) गणपतीची २) श्रीखंडोबाची,
शिवाजी राजे ह्यांचा बद्दल हे काव्य रचले,
"शिवरायांचे आठवावे स्वरुप । शिवरायांचा आठवावा साक्षेप । शिवरायांचा आठवावा प्रताप । भूमंडळी ॥"

मला इथे हा एक प्रश्न पडला आहे,
म्हणजे सर्वांनाच पडला असेल.........

मग त्यांनी "अल्लाह" ची आरती/अजान,किंवा आदिलशाह बद्दल गोडवे का गाईले नाहीत...?

हिंदू धर्माला अवैज्ञानिक म्हणाऱ्या लोकांना सणसणीत चपराक....

श्रीगणेश विज्ञान

   खूप दिवसांपासून या विषयावर लिहायचे मनात होते. आजचा मुहूर्त अगदी योग्य आहे.
   श्रीगणेश-जन्माची कथा आपणा सर्वांना माहितीच आहे. तरीही संदर्भासाठी थोडक्यात देतो.
"पार्वतीने आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार केली. त्यात प्राण फुंकून त्याला स्वत:चा मुलगाच मानले. पुढे या मुलाचे शिर श्रीशंकराच्या हातून उडवले जाते. पार्वतीचा विलाप पाहून शिवशंकर एखाद्या दुसर्या बालकाचे शिर आणण्याची आज्ञा ...देतात. शिवगण चुकून एका हत्तीच्या पिल्लाचे शिर घेऊन येतात. मानवी शिर शोधण्याइतका वेळ उरला नसल्याने अखेरीस तेच शिर लावले जाते, आणि अश्याप्रकारे गणेशाचा जन्म होतो."
आता या कथेत खालील गोष्टी महत्वाच्या आहेत.

१) देवी पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करतात. ही मूर्ती सजीव होते.
२) कोणतेच दुसरे शिर न मिळाल्याने शिवगण एका हत्तीच्या पिल्लाचे शिर आणतात. अखेरीस तेच शिर लावले जाते.

          आता या कथेकडे व्यवस्थित पाहिल्यास कळते की ही कथा म्हणजे "क्लोनिंग" आणि "अवयावारोपण" करण्याचा जगातील पहिला प्रयोग असू शकतो. कसे ते पहा. पार्वती आपल्या शरीरावरील मळापासून एक मूर्ती तयार करते, जी सजीव होते. जीवशास्त्राच्या दृष्टीने पाहिल्यास, आपण जेव्हा एक साधी चुटकी वाजवतो, तेव्हाही सहस्रावधी पेशी शरीरापासून विलग होतात. पार्वतीने जाणून-बुजून अंगावरील मळ खरवडला होता. तिला जिवंत उति (tissues) मिळवावयाच्या असाव्यात ही शक्यता नाकारता येत नाही. तात्विक दृष्ट्या हे सहज-शक्य आहे. तसेच शंकराने गणेशाचे शिर उडवल्यावर घाईने दुसरे शिर हवे असते, कारण त्या बालकाचा प्राण गेला होता पण मध्ये फार काळ गेला नसल्याने "वैद्यकीय मृत्यू (Clinical Death)" झाला नसावा. शिवगणांनी वेंधळेपणा केल्यावर पुन्हा मानवी शिर शोधण्यात आणखी कालापव्यय झाला असता. म्हणून हत्तीचेच शिर बसवले गेले. हा तत्कालीन अवयावारोपणाचा प्रकार असण्यात अशक्य काय आहे? आजही विज्ञान मानवी अवयवांचे रोपण करू शकते. अजून थोडी प्रगती झाल्यावर प्राण्यांच्या अवयवांचे रोपण होऊ शकेलच ना? म्हणजे ही देखील गोष्ट तात्विक-दृष्ट्या अशक्य नाही.
      आता हे सगळे वाचल्यावर काही लोक एक ठेवणीतला प्रश्न विचारतील, "एवढी प्रगती इतक्या प्राचीन काळी झाली असणे कसे शक्य आहे?" त्यांना मी विचारतो की, का अशक्य आहे? केवळ काळ फार प्राचीन आहे, हे काही कारण नाही होऊ शकत. या प्रश्नकर्त्या मंडळींचे खरे दुखणे काय असते माहितीय का? ते आहे "न्यूनगंड". हो, न्यूनगंड. एखादी गोष्ट हिंदू म्हणजेच भारतीय म्हटली की ती वाईटच असली पाहिजे, हा तो न्यूनगंड होय. हीच गोष्ट जर कुणा युरोपीय अथवा अमेरिकन संशोधकाने (विशेषत: बायबलमध्ये) शोधली असती तर मात्र आम्ही ती मानानार्यांत अग्रभागी असलो असतो! कारण "साहेबं वाक्यं प्रमाणं!" आपण गोऱ्या कातडीच्या मानसिक गुलामीतून बाहेर यायला आजही तयार नाही हेच खरे! बरे, हिंदू संस्कृती आणि धर्म हा जगात सर्वाधिक विज्ञान-निष्ठ असल्याचे हिंदू सोडून जगातील सगळ्याच संशोधकांचे मत आहे. पण आमचा न्यूनगंड आणि आपसातील भांडण मात्र आपल्याला हे सत्य स्वीकारण्यापासून रोखतेय!
       हिंदूंच्या विज्ञान-निष्ठेचे आजवर शेकडो पुरावे सापडले आहेत, पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतलेय त्यांच्या नजरेला ही गोष्ट कशी पडणार? त्यांना मुळात आपले वेद-पुराणे हेच खोटे वाटतात. चला, क्षणभर वादासाठी तेही गृहीत धरू. आता पुन्हा वरील कथा पहा. याही परिस्थितीत वरील कथा पाहिल्यास ती वैद्यकीय-दृष्ट्या १००% योग्य असल्याचेच आढळेल! मग निदान व्यासांनी "विज्ञान-कथा" लिहिली एवढे तरी मान्य कराल? आणि कुठेतरी या गोष्टी खरोखर असल्याशिवाय इतकी "सुयोग्य" विज्ञान-कथा तरी कशी सुचेल? या कथेपेक्षाही कितीतरी प्राचीन काळात "ऋभू" नावाच्या ३ बंधूंनी विविध शस्त्रक्रिया केल्याचे पुरावे ऋग्वेदात आहेत. "चरक" हा "सर्जन" शस्त्रक्रियेपूर्वी आपली हत्यारे उकळून घेत असल्याचे त्यानेच लिहून ठेवलेय. याचा अर्थ त्याला इतक्या प्राचीन काळातही सूक्ष्मजीवांचे ज्ञान होते असाच होतो ना? विमान बनवण्याची प्राचीन भारतीय विधी मीच पूर्वी प्रसिद्ध केली होती. राजा भोज याच्या "समरांगण सूत्रधार" नामक ग्रंथात तर "यंत्रमानव" बनविण्याचीही विधी दिलीय. मग इतके सगळे विज्ञान असणार्या संस्कृतीत मी म्हणतो त्याच प्रमाणे गणेश-जन्म झाला नसेल कशावरून? पहा, विचार करा. "सूज्ञांना" पटेल.
"गणपती बाप्पा मोरया"
      सर्व "सूज्ञांना" गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा, आणि "अज्ञांसाठी" बुद्धिदात्या गणेशाकडून बुद्धीची मागणी!
आपलाच,
विक्रम श्रीराम एडके.
(संपर्क : edkevikram@gmail.com)

सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...

होय दोस्तांनो...
  हे खुद्द आपल्या महाराजांनी म्हटले आहे...
छत्रपति शिवरायांनी २८ जानेवारी १६७७ रोजी सामान्य रयतेस उद्देशून लिहिलेले पत्र समाजातील प्रत्येक व्यक्तीला आजही लागू पडते. आपापल्या आचारधर्माचे पालन करावे, सर्वांनी एकदिल होउन शत्रुचा पराभव करावा असे आवाहन त्यांनी ह्या पत्रात केले आहे. सध्या सर्वत्र जे सुरू आहे ते बघता आपण त्यांची आज्ञा आजही पाळणार आहोत का ?




       स्वस्ति श्री राज्याभिषेक शके ३ नल नाम संवत्सरे माघ शुद्ध ५ क्षत्रिय कुलावत्वंस श्री राजा शिवाजी छत्रपती स्वामी यांणी समस्त ब्राह्मण वेदपाठी व ग्रहस्थान व क्षत्रिय मंडळी तथा प्रभू ग्रह्स्थान व वैश्यजाती व शुद्रादी लोकान तथा जमेदार व वतनदार व रयेत वगैरे सर्व जाती हिंदू महाराष्ट्रान तथा महालांनी (सुभा) व देश व तालुके व प्रांतानिहाय वगैरे यास आज्ञा केली ऐसीजे.
हिंदू जातीत अनादी परंपरागत धर्मशास्त्राप्रमाणे धर्म चालत आले असता अलीकडे काही दिवसात येवनी अंमल जाहल्यामुळे काही जातीतील लोकांस बलात्कारे धरून भ्रष्ट केले व कित्येक जागीची दैवते जबरीने छीन्न-भिन्न केली. हिंदू जातीत हाहाकार जाहला. गाय ब्राह्मणसह धर्म उच्छल होण्याचा समय प्राप्त जाहला.त्याजवरून श्रीईश्वरी कृपेने आमचेहोत श्री शिवाजीने यवन वगैरे दृष्टास शासन करवून पराभवाते नेले व राहिले ते शत्रू पादाक्रांत होतील.
परंतु लिहिण्याचे कारण की या सरकारात राज्याभिषेक समयी क्षेत्रक्षेत्रादि क्षेत्रस्थ ब्राह्मण बहुत ग्रंथ अनादी सर्व जमा करून धर्म स्थापना जाहली. त्यास श्रीकाशी क्षेत्ररथ ब्राह्मणात काही तट पडून हाली ग्रंथ पाहता भटजीकडून तफावत झाली आहे असे ठरले. त्याजवरून हल्ली पुन्हा शास्त्रीपंडित व मुत्सद्दी व कारकून यास आज्ञा होऊन ज्ञाति विवेक व स्कंद पुराणांतर्गत श्याद्रीग्रंथ ((सह्याद्रीग्रंथ?) आदी महानग्रंथी निर्णय सर्व झातीविशी जाहले आहेत ते वगैरे सर्व ग्रंथानुमते व जसे ज्याचे धर्म अनादी चालत आले त्याप्रमाणे निरवेध चालावे आगर ज्या ज्या ज्ञातीस वेदकर्मास अधिकार असून येवनी जाहल्यामुळे अथवा ब्राह्मणांनी काही द्वेषबुद्धीने शास्त्रानुरूप काही कर्मे न चालविता मलीन झाली असतील ती त्या ज्ञातीच्या मंडळींनी पुरी पाहून ज्याची त्याची नीट वहिवाट आचाराने. ज्या ज्ञातीत जशी परंपरा चालत आली ती त्याप्रमाणे चालविणे. जो कोणी द्रवे लोभास्तव ब्राह्मण शास्त्रविरहित नवीन तंटे करून खलेल करील येविसो त्याज्ञाती यानिवाले सरकारात अर्ज करावा म्हणजे शास्त्राचे समते व रूढीपरंपरा व ग्रंथ पाहून निरंतर निरमत्छ्रपणे धर्मस्थापना कोणाचा उजूर न धरिता पर्निष्ट जेंव्हाचे तेंव्हाच त्वरित बंदोबस्त होईल.
   हल्ली यवन उत्तर देशीहून येत आहे.
तरी सर्व ज्ञातिने एकदिल राहून कस्त मेहनत करून सेवा करून शत्रू पराभावाते न्यावा. यात कल्याण तुमचे सरकारचे ईश्वर करील. जाणेजे.


    सध्या महाराष्ट्रात जाणीवपूर्वक सुरू असलेल्या घाणेरड्या आणि जातीविषयक इतिहास बदलाचा आम्ही त्रिवार निषेध करत आहे. जे लोक हे करत आहेत त्यांना समजत नाही आहे की प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ते थेट शिवरायांचा अपमान करीत आहेत...

"जे जे होईल ते ते पाहावे.. हे कैसे ऐसे आयुष्य जाहले..."

(http://www.maayboli.com/node/22281)