कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Monday 5 September 2011

बुद्ध पंथातील गणपतीची रूपे...

राम राम,

मागच्या पोस्ट मध्ये आपण जैन पंथातील गणपती बद्दल माहिती वाचली......
आता आपण बुद्ध पंथातील गणपतीची रूपे बघू आणि जगभरातील गणपती बद्दल माहित घेऊ......

'कप्पदुमावदानम्' हा एक संस्कृत-महायानी भाषा मिश्रित प्राचीन बौद्ध ग्रंथ आहे.
त्यामध्ये एका प्राचीन कथेचा उल्लेख आहे. श्रावस्तीचा एक व्यापारी बौद्ध धर्माचा उपासक होता.
तो व्यापारासाठी 'रत्नाकर' नावाच्या बेटावर गेला होता. काही दिवसानंतर समुद्रात वादळ आल्याने त्याची नाव बुडाली.
 या संकटवेळी त्याने जिवाच्या रक्षणासाठी आपल्या धर्मातील देवांबरोबर गणपतीची आराधना केली.
यावरून असे दिसून येते प्राचीन काळात बौद्ध धर्मा‍त अन्य देवतांबरोबर 'गणेश' आराधना प्रचलित होती.
अशा प्रकारे बौद्ध साहित्यात अनेक दंतकथेत गणपतीचा उल्लेख मिळतो.
'महायानीत' तर गणपतीविषयी अनेक लहान-मोठ्या दंतकथा आहेत.

बौद्ध मंदिरात बुद्ध मूर्तीबरोबर अनेक गणपतीच्या मूर्ती सापडतात.
नेपाळमध्ये सम्राट अशोकाच्या मुली चारुमतीने अनेक बौद्ध मंदिराची निर्मिती केली आहे.
त्यामध्ये तिने स्वत: श्री गणेशाची मूर्ती स्थापन केली आहे. त्याचे नाव आहे,"सूर्यगणपती "

पाचव्या शतकात चिनी यात्रेकरू फाहीयान भारतात आले होते तेव्हा ते आपल्याबरोबर गणपतीच्या अनेक मूर्ती घेऊन गेले होते.
 गणेश पूजेच्या परंपरेला ते आपल्यासोबत घेऊन गेले. 
वरील छायाचित्रात गणपती च्या सगळी कडे बुद्ध बसलेले आहेत...

पाचव्या आणि आठव्या शतकाच्या मध्यंतरात चिनी बौद्ध साहित्यात भारतीय संस्कृतीचा सविस्तर उल्लेख आहे.
त्यात गणेश पूजेचे वर्णन मिळते. ब्रिटीश संग्राहलयात जावा येथून मिळालेल्या अनेक गणेश मूर्ती आहेत.
या मूर्ती विविध मुद्रा असलेल्या आहेत. जावा बौद्ध धर्म मानणारा देश आहे.
यावरून असे दिसते की महायान संप्रदायात गणेश उपासनेचे एक विशिष्ट स्थान होते.
नेपाळ, लडाख आणि तिबेट येथील वज्रयान संप्रदायातील लोक आपल्या आराध्य देवाबरोबर 'गणेश मूर्तीची' स्थापना करतात.
ते सर्वप्रथम गणेश पूजा करतात. मंत्र सिद्धीसाठी गणेश आराधना आवश्यक आहे असा त्यांचा विश्वास आहे.
नेपाळी बौद्ध साहित्यात 'गणपती उदय' नावाचा एक प्रमुख ग्रंथ आहे.

त्या ग्रंथानुसार तथागत गौतम बुद्ध स्वत: म्हणतात- 'हे आनंद! गणपती उदयाचे वाचन केल्यावर लवकरच आपल्या इच्छा पूर्ण होतात.'

मग "गणपती" फक्त ब्राह्मण लोकांनी तयार केलेला देव आहे का ??
बुद्ध आणि जैन पंथात त्याला अनन्यसाधारण महत्व आहे..

आता आपण गणपतीचे अन्य देशातील स्थान बघू..

१) इराण -हत्तीच्या चेहेरा असणारा आणि मनुष्य देह असलेली मूर्ती लुरीस्तान,पश्चिम इराण मध्ये सापडली,ही पहिली मूर्ती आहे असे मानतात...
२) अफगाणिस्तान- १२०० ख्रिस्त पूर्व मध्ये इथे एक संगमरविरी मूर्ती सापडली आहे,त्यात गणपती एक लढवय्या स्वरुपात आहे.अश्या खूप मूर्ती तिथे होत्या पण त्या नष्ट करण्यात आल्या आहेत,कुणी केल्या असतील हे सांगायला नको.
३) ग्रीक देशात गणपतीला वेगळा देव म्हणून पूजतात,त्याचे नाव आहे "जानुस" त्याला मनुष्य देह आणि हत्ती चे तोंड असते.
४) Mexico मध्ये ही असाच देव पुजला जातो.
५) १३ व्या शतकातील गणपती कांबोडिया इथे गणपती ला "प्रहागणपती" म्हणतात..
६) जपान मध्ये गणपती ला "विनायाकश्र" म्हणतात..
७) जावा मध्ये त्याला "कालांतक" ह्या नावाने ओळखतात...

No comments:

Post a Comment