कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Monday 5 September 2011

जैन ग्रंथातील हिंदू देवता गणपतीचे महत्व..........

राम राम,

नवीन माहिती नेट वरून तुमच्या साठी ....

जैन धर्मातील मंगलाचरण श्लोकात विघ्नविनाशक गणेशाचे स्मरण केले आहे.
 'गणेश' प्रणाम श्लोकाने आपल्या ग्रंथाची सुरवात केली आहे.
सतराव्या शतकाच्या प्रारंभ काळात कपूरमंजरीरासच्या सुरवातीला खालील चौथाई मिळते.


प्रथम गणपती वर्णव ॐ गवरी-पुत्र उदार ।
लक्ष लाभ जे पुरवई, देव सविहूँ प्रतिहार ।।
सेवंत्रे जस मुगट भर, शेंदूर सोही शिशिर ।
सिद्धी बुद्धी नऊ भरतार, जे बुद्ध‍ी अवतार बडवीर ।।

ही रचना श्वेतांबर जैन संप्रदायाचे पंडित मतिसार यांनी रचलेली आहे.
या प्रकारे समकालीन एका ग्रंथात हमीरेप्रबंधाच्या सुरवातीला एक दोहा मिळतो.

गवर‍ी पुत्र गजवंत विशाल, सिद्धी बुद्धी वर वचन रसाल।
सुर-नर-किनर सारइं सेव, धुरी प्रणमूँल लंबोदर देव।।





(सदर छायाचित्र हे जैन चित्रकाराने रेखाटले आहे)


या ग्रंथाचे रचनाकार अमृत कलश जैन श्वेतांबर संप्रदायाचे आहेत.
तसेच विवाहप्रसंगी 'विनायकयंत्र' पूजेची प्रथा आहे.

मग हिंदू धर्माचा जैन एक पंथ होतो ना.....

गणपती बाप्पा मोरया !!!!!!!!!!!!

1 comment:

  1. अगदी बरोब्बर, जैनच नवे तर बौद्ध सुद्धा हिंदू धर्माचाच एक मतप्रवाह आहे. पण सांगलीकर,येडेकर असे काही आधुनिक राक्षस मात्र याबद्दल भ्रम पसरवित आहेत.

    ReplyDelete