कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Friday 2 September 2011

स्त्रियांच्या बाबतीत हिंदु धर्मावरील आक्षेप व खंडण..



स्त्री आणि धर्म !!!!

आजपर्यंत वैदीक सनातन्यांमुळे "स्त्री" जात नेहमी उंबरठ्याच्या आत ठेवली गेली आहे...वैदीकानी स्त्रीयांना पुरुषांच्या तुलनेत दुय्यम स्थान दिले आहे... हिंदु धर्मात स्त्री नेहमी उपेक्षितच राहिली आहे.... वगैरे सारखी वाक्य आपल्यासाठी काही नवीन नाहीत...

अंनिसवाले व स्त्री-मुक्ती वाले व आजची समाजसुधारकांची वंशावळ समाजवादी यांच्या तोंडची ही नेहमीची वाक्ये... परंतू इतर धर्मातील स्त्रीय
ांची अवस्था पाहता यांच्या शिडातील हवाच निघून जाते....
हिंदु धर्मात स्त्रीयांची जी अवस्था होती त्याला तथाकथीत धर्माचे मक्तेदार कारणीभूत होते अणि केवळ या कारणामुळे संपुर्ण धर्मालाच वेठीस धरणे किती बरोबर आहे ?
ज्या काही तथाकथित वाईट प्रथा होत्या त्या कालांतराने हिंदु धर्मातुन कालबाह्य झाल्या आहेत.....
सुदैवाने आजच्या काळात अशा काही प्रथा हिंदु धर्मात अस्तित्वात नाहीत तरिही आज काही लोक संपुर्ण धर्मास वेठीस धरतात हे किती बरोबर आहे ?
बरे,असे ही नाही की या लोकांना स्त्रीयां विषयी कळवळा नेहमी असतो......
जेव्हा याठिकाणी हिंदु धर्माचा संबंध येतो नेमका त्याच वेळी या लोकांना हिंदु धर्मातील स्त्रियांचा पुळका येतो.....
हुंडाबळी , स्त्रीयांच्या आत्महत्या , घरगुती मारहाण यांसारख्या प्रकरणांमध्ये हे अंनिसवाले अणि स्त्रीमुक्तीवाले काहीही बोलताना अथवा काही करताना आढळत नाही....
परंतु हेच सुधारणावादी चार स्त्रियांना एकत्र करुन कुंडलिची होळी व स्त्रीयांना शनी शिंगणापूर मंदिर प्रवेशा सारखी आंदोलने घेतात तेव्हा यांना सुधारणेच्या नावाखाली तिसराच काहीतरी हेतू साध्य करायचा नाही ना ? असा दाट संशय आल्याशिवाय राहत नाही .....

असो.
"हिंदू धर्मात जेवढ्या यातना स्त्रियांच्य वाट्याला आल्या असाव्यात तितक्या यातना इतर कोणत्याही धर्मात स्त्रियांच्या बाबतीत आल्या नसाव्यात" ..... अशाप्रकारची काहीशी बेताल व अभ्यासहीन वक्तव्ये ही मंडळी करतात तेव्हा त्यांच्या बुद्धीची किव कराविशी वाटते.

इतर पंथातील स्त्रीयांच्या बाबतीत येण्या-या यातनांवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.

ईस्लाम पंथ
पाकिस्तान व बांग्लादेश हे कट्टर ईस्लामिकतेचा पुरस्कार करणारी राष्ट्रे यांची घटना शरियत नुसार चालते.....
पाकिस्तान मध्ये "होदूद" नावाच्या वटहुकूमानुसार स्त्रियांच्या बाबतीत विवाहबाह्य संबंध म्हणजेच "झिना" हा दाखलपात्र गुन्हा आहे व त्यासाठी त्या स्त्रि ला दगडाने ठेचून मारण्याची अथवा १० वर्ष तुरूंगवासाची किंवा दंडासह फटक्यांची शिक्षा आहे....
पण विवाहबाह्य संबंध नसल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी मात्र त्या स्त्रिची आहे !!!
केवळ हिनासाठी पुरुष साक्षीदार न मिळाल्यामुळे ९० स्त्रिया या झिनासाठी दोषी ठरल्या आहेत!!!
याचमुळे झिना महिलांची तुरुंगातुन संख्या दुप्पट झाली आहे. तुरुंगातील या महिलांवर पोलिस अत्याचार करतात व बलात्कार तर रोजचीच गोष्ट आहे .....
या नंतर "किसास आणि दियात" नावाचे कायदे या कायद्यांमध्ये तर स्त्रियांचे आयुष्य मुल्य पुरुषांच्या तुलनेत अर्ध्ये मानले आहे .
यानंतर बांग्लादेशामध्ये ढाकामध्ये एका घटनेविषयी "द ट्रायब्यून" च्या १२.०१.९४ च्या अंकामध्ये तेथील समाज रचनेवर प्रकाश टाकला आहे ,
"नुरजहान नावाच्या एका १२ वर्षीय तरूणीला दगडानी ठेचण्यात आले त्यामुळे तीने जंतुनाशक औषध प्रशाण करून आत्महत्या केली ."
तिचा गुन्हा फक्त एवढाच होता की आपल्या पतिशी कायदेशीर तलाक न घेता दुसरा निकाह लावला होता .
आणखी एक अशीच घटना
"दुस-या एका नुरजहानला बांबूला बांधण्यात आले आणी तिला जिवंत जाळण्यत आले तिचा हाच गुन्हा होता की तिचे विवाहबाह्य संबंध होते असा ’संशय’ होता !!!! "
दक्षिण बांग्लादेशात ’साथीरा’ जिल्ह्यातील एक घटना. कालिपुर या खेड्यातील फिरोजा खाटून नवाच्या तरूणीचे ’उदय मंडळ’ नावाच्या हिंदु तरूणाशी प्रेम जडले या गुन्ह्यासाठी तीला उघड्या मैदानावर १०१ वेळा दगडाने ठेचण्याची शिक्षा देण्यात आली .
आजही मुस्लिम स्त्रिला मशिदीत मध्ये प्रवेष नाकारला जातो त्यांना बुरख्याखाली ठेवले जाते....

हिंदु महिलांना मंदिरप्रवेशासारख्या आंदोलनाचे आयोजन करणारे
तथाकथीत 'सर्व-धर्म-समभाव'वादी मिश्रीत 'सुधारणावादी' मुस्लिम स्त्रियांच्या मस्जिद प्रवेशासाठी लढा देण्याची हिम्मत करतील का ? हिंदु धर्मामध्ये मुस्लिम धर्मापेक्षा अधिक असमानता आहे का ?

ख्रिश्चन पंथ
ख्रिश्चन धर्मात स्त्रियांना पुर्णपणे स्वातंत्र्य आहे. असा फार मोठा गैरसमज प्रचलित आहे . बायबल हा ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ!!!
यामध्ये स्त्रियांविषयी काय म्हटले आहे ??
'लेपिय १२:४' मध्ये बाबबल म्हणते "स्त्रिने आपल्या रक्तस्रावापासुन शुद्ध होण्यासाठी 33 दिवस घालवावे तिने कोणत्याही शुद्ध पवित्र यास स्पर्श करू नये" ......
म्हणजे तेहतीस दिवस मासिक धर्माच्या दिवसा नंतर घालवावे म्हणजे लगेच पुढचे मासिक धर्माचे दिवस येतात व अशाप्रकारे योजनाबद्ध रितीने आयुष्यभर स्त्रिला अशुद्ध ठेवण्याची तरतूद बायबलने करुन ठेवलेली आहे .

'अनुवाद २१:११' मध्ये बायबल अपल्या अनुयायांना युद्धात हारलेल्या स्त्रियांना बायका करुन घेण्यासाठी त्यांचे शिर मुंडवण्याची व मुळापासुन नखे काढण्याची आज्ञा देते.
याच प्रकरणामध्ये २२:२० मध्ये जर जर एखाद्या स्त्रीच्या ठीकाणी कौमार्यचिन्हे दिसुन आली नाहित तर तिला मरेतोवर दगडानी ठेचूण्न मारण्याचा आदर्श बायबल घालून देते.
२२:०५ मध्ये बायबल म्हणते "कोणा स्त्रिने पुरुषाचा पेहराव करू नये".
'ईयोब १५:१४' मध्ये बायबल "स्त्रि पासुन जन्मलेले निर्दोश कोठून असणार" व २५:४ मध्ये 'स्त्रि पासुन जन्मलेला पुरुष निर्मळ कसा असणार ?'असे तारे तोडले आहेत!!!

बायबल मधील देव स्त्रियांना शाप देताना उत्पत्ती ३:१५ मध्ये म्हणतो "तुला बहूत दु:ख होईल व गर्भधारणेचे क्लेष होतील तु क्लेषाने लेकरे प्रसवशील तुझा नवरा तुझ्यावर स्वामीत्व चालवील" .

बायबल नेहमी 'चेटकिणीला जिवण्त ठेवू नका' याच न्यायाने स्त्रियांशी वागायला सांगते. जो बायबल समर्थक आहे तो कधीच स्त्रियांना मान देणार नाही.

हिंदु धर्म
हिंदुधर्मामध्ये स्त्रीयांना कोणते स्थान आहे ते वेगळे सांगायला नको.
हिंदुधर्माने स्त्रीला "देवी" मानले आहे.
राम-लक्ष्मण व हनुमाना सोबत सीतेला सुद्धा पुजले जाते.
हे खरे स्त्री-पुरूष समानतेचे पतीक नाही काय ?
आपल्या देशाला सुद्धा हिंदु धर्माने सदैव मातेसमान मानले आहे. ईतकेच काय तर १००% उपयोगी असलेला पशू गाय !!!!
या पशूला सुद्धा हिंदू धर्माने कधी पशू न मानता आई मानले आहे .
"परनारिया रखुमाई समान" असा विचार केवळ हिंदु धर्मच देऊ शकतो.
परंतू ज्याप्रमाने मधल्या काळात हिंदु धर्मात रुढी परंपरा निर्माण झाल्या त्याचप्रमाणे याच धर्मातील लोकांनी आज नामशेष केल्या आहेत व उरल्या सुरल्या आहेत त्या सुद्धा मिटून जातील परंतू या रूढींना हिंदुधर्मशास्त्राचा काडीचा सुद्धा आधार नाही ....
जसा इस्लाम मध्ये "शरियत" चा व ख्रिश्चन धर्मा मध्ये "बायबल" चा आहे.

भारतातील मुस्लीम समाजातील महिलांचा "अल्पसंख्यांक" म्हणुन राहण्यात तोटा म्हणजे सामाजिक सुधारणेला ते कायमचे पारके झालेले आहेत.
काही वर्षापुर्वी संसदेत "हिंदु कोड बिल" मंजूर होऊन त्याचा फायदा झाला आहे.
त्यामुळे हिंदु समाजातील सर्व पंथांना कालानुरूप सामाजिक सुधारणांचा लाभ मिळत आहे. अगतीक परस्थितीत स्त्रीयांना पोटगिसह घटस्फोटाचा हक्क मिळाला आहे.
द्विभार्या प्रतिबंध कायद्यामुळे हिंदु स्त्रीयांना सवत होण्याची भिती राहीलेली नही.
याऊलट मुसलमान स्त्रियांना सामाजीक सुधारणेचा फायदा मिळत नाही हे शहाबानो प्रकरणावरून सिद्ध झाले आहे .


                 
                                                    अ‍ॅड.विकास संदीपान खरात
 व्यवस्थापक 
हिंदवी स्वराज्य सेना 

No comments:

Post a Comment