कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Thursday 20 October 2011

आचार्य अत्रे ह्यांचे "समर्थ रामदास" ह्यांचा बद्दलचे मत...

Sunday 16 October 2011

हिंदूंची दिशाभूल करणाऱ्या आध्यात्मिक विचारधारा !!!!


     || धर्म संस्थापक भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण ||
हिंदूंचे शास्त्राचे ज्ञान जगात केव्हाही श्रेष्ठ आहे ...

प्रत्येकाने ते  जसे  आवशयक आहे तसे वापरून स्वतःची सर्वांगीण प्रगती करून घ्यावी असे आपला धर्म सांगतो  !!!
यातूनच आपल्याकडे अनेक प्रकारच्या उपासना पद्धती उदयास आल्या ...
शैव , वैष्णव , शाक्त , अघोरी , तांत्रिक , योग अशा अगणित उपासना पद्धती हिंदूंच्या उपासनेच्या भाग बनल्या ....
कारण 'व्यक्ती  तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग' असे हिंदूंचे तत्वज्ञान सांगते ....

भगवान श्रीकृष्णाने सांख्य तत्वज्ञान सांगितले , भगवान पतंजलींनी योगसूत्रे सांगितली , अनेक दर्शनांच्या माध्यमातून समाजकारण , धर्मकारण , राजकारण , अर्थकारण , कला , संस्कृती यांचे यथोचीत ज्ञान हिंदुना आणि समस्त जगाला उपलब्ध झाले .

ज्याचा वापर आज अनेक संप्रदाय करत आहेत योग, प्राणायाम, ध्यान , नामस्मरण आदी हिंदूंची उपासना पद्धत वापरून आज अनेक संप्रदाय चालत आहेत मात्र त्यांना या सर्वांचा उद्गाता धर्म मान्य नाही काहींना तर देव देवता पण मान्य नाहीत , असे संप्रदाय आजही निधर्मी आहेत आणि स्वतःची ती उपासना पद्धत श्रेष्ठ आणि बाकी सर्व तुच्छ अशा अहंगंडाने पछाडलेले आहेत !!!
निदान  धार्मिक विचारसरणीच्या लोकांनी तरी धर्माला आणि राष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यावे त्यासाठी हा लेखप्रपंच !!!

 
काही दिवसांपूर्वी एका सांप्रदायिक व्यक्तीशी ओळख झाली आचरणात कमालीचा सात्त्विक असणारया त्या व्यक्तीशी सहज बोलता बोलता मी त्यांची उपासना पद्धत विचारली.....
त्यावर त्यांनी, " आम्ही ध्यान मार्गातून साधना करतो .....जगात ध्यान लावून देवाची अनुभूती घेणे सर्वात कठीण !!! त्यामुळे या मार्गातून साधना करणारे लवकर मोक्षाला जातात ..... आमचा मार्गच सर्वश्रेष्ठ आहे ..... आम्ही ज्या मार्गाने साधना करतोय तोच मोक्ष प्राप्ती करून देऊ शकतो ... जगात ध्यान मार्ग हाच खरा साधनामार्ग आहे ..... आम्ही आमची साधना शिकवणारे  वर्ग घेतो त्यात तुम्ही पण या ........"
वगैरे वगैरे बरेच सांगितले !!!!

माझे कुतूहल हळूहळू टोकाला जात होते ....

"पण आपल्या धर्मात तर भक्तीयोग श्रेष्ठ आहे ...."माझे भागवत चिंतन !!!

"धर्म ??? कोणता धर्म ??? आम्ही कोणताही धर्म मानत नाही !!! "
तो  बहुतेक किंचाळायच्या बेतात असावा !!!

"अहो धर्म म्हणजे हिंदू धर्म !!!! तुम्ही सांगितलेली उपासना पद्धत आणि तुमचे आराध्य दैवत दोन्हीही हिंदू धर्माच्या अंतर्गत आहेत !!!"
इति मी .

"अजिबात नाही !!!
आमचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही !!!
आमच्या संप्रदायात सर्व धर्माचे लोक आहेत ....
तुम्ही धर्माची आडकाठी आणू नका !!! "

त्याच्या नसानसातून 'सर्वधर्म समभाव' ओसंडत होता !!!

"अहो! पण ध्यानधारणा , समाधी वगैरे उपासना मुसलमान किंवा ख्रिस्ती किंवा पारशी लोकांची नाही तर हिंदू धर्माची देणगी आहे .... आणि हे जागतिक सत्य आहे ....." माझे हलके फुलके विचार !!!!

"आम्ही फक्त मानवता धर्म मानतो !!! हिंदू-मुसलमान हा भेद हिंसा शिकवतो..... आम्ही हिंसा नाही तर ध्यानसाधना हेच जगातील एकमेव सत्य मानतो बाकी सर्व जग खोटे आहे ....माया आहे ....ब्रह्माची अनुभूती हीच जगातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे ...."
त्याची घोटीव वाक्ये तो आठवून आठवून उगाळत होता ....

"अहो ! पण, माया खोटी असती तर असुरांचे अत्याचार रोखायला देवाने अवतार घेतलेच नसते ..... खोट्या मायेतील अत्याचार पण खोटेच असते तर देव कशाला भक्तांच्या मदतीला धावून आला असता ????
तो म्हणाला असता कि जाऊ दे माझा भक्त पण माया आणि त्याला छळणारा असुर पण माया !!!
मग भक्ताला वाचवून काय फायदा !!!"


माझी गुगली ऐकून तो जरा बावचळला !!! पण माझे बोलणे चालूच होते .....

"अहो साक्षात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे जो मायेत असूनही माझे सदैव स्मरण करतो आणि कर्मकांड आदी कशाचाही आधार न घेता मला भक्तीमार्गातून भजतो तो निसंशय मजपर्यंत येतो.....मात्र त्यासाठी पराकोटीची  भक्ती असावी लागते आणि ती जागृत होणे  तेवढे सोप्पे नाही यासाठी मी प्रत्येक जीवाला त्याच्या  कुवतीनुसार मी वेगवेगळे साधनामार्ग उपलब्ध करून दिले आहेत ...... आणि त्यातही त्याला काही जमत नसेल तर पूजा अर्चा आदी कर्मकांडादि साधने उपलब्ध करून दिली आहेत .....

आणि या सर्वांना एका सुरक्षित कोशात ठेवले आहे ज्याचे नाव म्हणजे धर्म !!!!

आणि हे सर्व ज्ञान सामान्यांना देणाऱ्या ज्ञानेश्वरांनी त्यांची सर्वोच्च अनुभूती सांगितली आणि ती म्हणजे "हे विश्वाची माझे घर !!!"

तुम्ही म्हणता त्या विचारधारेने तुम्ही या अनुभूतीचा कसा अनुभव घेणार ???
कारण तुम्ही इतर उपासना तुच्छ समजता !!!
तुम्ही ज्या धर्माचा आधार घेताय तो धर्म तुम्हाला मान्य नाही, म्हणजे 'मी साखर खातो' पण 'ती गोड आहे' यावर माझा विश्वास नाही असे म्हणण्यासारखे आहे !!!
आणि हिंदू धर्म हा सर्वोच्च प्रतीचे जीवन जगायला शिकवतो !!! यात तर काहीच वाद नाही
 तो संकुचित वृत्तीने मी आणि माझे जीवन या द्वयीत आणि यापलीकडे  दडलेला ईश्वर पाहायला शिकवतो !!!"

त्याची तलवार म्यान झाली होती !!!

"बर असो तुम्ही राष्ट्र आणि त्याची वाईट परिस्थिती बदलावी म्हणून काही प्रयत्न करता कि नाही ???" माझा पुढचा वार !!!

"ते काही आम्हाला शिकवले नाही आणि देशाची वाईट परिस्थिती बदलायला देव समर्थ आहे !!!त्यासाठी आपण का वेळ वाया घालवायचा ??? " त्याचे उत्तर !!!

"पण, त्या ईश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे ती वापरून देश हिताचे काही केले तर देव अजिबात रागावणार नाही !!! विष्णूचा अवतार असलेले भगवान रामचंद्र समर्थ आहेत असे वानरांनी म्हणून ते समुद्राच्या किनाऱ्यावर निवांत खाऱ्या वाऱ्याची मजा घेत बसले असते तर रामसेतू पूर्ण झाला असता का ???
त्यांनी झोकून देऊन रामसेतू तयार केला म्हणून त्यांना पाण्यावर दगड तरंगतात हि अद्भूत अनुभूती साक्षात पाहायला मिळाली !!!"



दोन दिवसापूर्वी तो मला परत भेटला . आणि म्हणाला कि मी हिंदू धर्मातील इतर अनेक बाबींचा अभ्यास केला .... कधी नाही एवढा आनंद मला मिळाला आणि हेही पटले कि नित्यनुतन परमानंद स्वरूपी ईश्वरानेच मला कुपमंडूक स्थितीतून बाहेर काढून हिंदू धर्माच्या विशाल आनंदात सामावून घेतले !!!!

Friday 14 October 2011

हिंदू शब्द हा अंदाजे ४००० वर्ष जुना आहे..

राम राम,

कोण म्हणते हिंदू शब्द हा अरब लोकांनी शिव्या म्हणून दिला.....जो असे म्हणेल त्याला खालील गोष्टी सांगा......

हिंदू शब्द हा अंदाजे ४००० वर्ष जुना आहे..

"
शब्द कल्पद्रुम" जो दुसर्या शतकात रचला आहे,त्यात एक मंत्र आहे..
||"हीनं दुष्यति इतिहिंदू जाती विशेष:"||अर्थात हीन कामाचा त्याग करणार्याला हिंदू म्हणतात.

असाच"अदभुत कोष" मध्ये एक मंत्र येतो .........................
||"हिंदू: हिन्दुश्च प्रसिद्धौ दुशतानाम च विघर्षने"|| अर्थात हिंदू चा अर्थ दृष्टांचा नाश करणारा असा होतो..

"वृद्ध स्म्रति (सहावी शतक)" मध्ये एक मंत्र आहे ,........................... ||हिंसया दूयते यश्च सदाचरण तत्पर: वेद्.........हिंदु मुख शब्द भाक् ||

अर्थात जो सदाचारी वैदिक मार्गावरून चालतो, हिंसे मुळे ज्याला दुख होते, तो हिंदू आहे..

"ब्रहस्पति आगम"(हा कधीच आहे माहित नाही)
||"हिमालय समारभ्य यवाद इंदु सरोवं। तं देव निर्वितं देशम हिंदुस्थानम प्रच्क्षेत ||म्हणजे हिमालय पर्वतापासून इंदू(हिंद) महासागर पर्यंत जो प्रदेश देव-पुरुष ह्यांनी तयार केला त्याला हिंदुस्तान म्हणतात..



इस्लाम चे पैगेम्बर मोहम्मद साहब च्या आधी १७०० वर्ष एक अरब कवी जन्माला आला,
त्याचे नाव "लबि बिन अख्ताब बिना तुर्फा" त्याने एका ग्रंथात लिहिले होते.......
||"अया मुबार्केल अरज यू शैये नोहा मिलन हिन्दे। व अरादाक्ल्लाह मन्योंज्जेल जिकर्तुं ||
म्हणजे ए हिंद ची पुण्या भूमी,तू धन्य आहेस,कारण देवाने आपल्या बुद्धीने तुला निवडले आहे..


असे कित्येक सत्य गोष्टी ओरडून-ओरडून सांगत आहेत की,
हिंदू शब्द आमचा आहे,तो हि हजारो वर्ष जुना आहे..
पण असे खूप सत्य गोष्टी बाहेरील शत्रूंनी नष्ट केली,पण जी शिल्लक आहे
त्याची जबाबदारी आपली आहे... म्हणून,
"गर्वाने म्हणा मी हिंदू आहे...."

Sunday 9 October 2011

तुमचे "चोरलेले" गुरुत्व आम्ही तुम्हाला परत मिळवून देऊ.....

राम राम,

आज कुणाची पुण्यतिथी आहे हे माहित आहे ?????
नसेलच कशाला लक्षात असेल कारण तुम्हाला कुणी सांगितलेच नाही ना कुठल्या "दिनदर्शिका" मध्ये त्यांचे उल्लेख आहे.

असो मी सांगतो आज शिवाजी महाराज ह्यांचे गुरु दादोजी कोंडदेव ह्यांची  ती ही "तिथी" ने........

 !! आश्विन शुक्ल १३ , शके १९२९ भारतीय सौर , कातिर्क २ , शके १९२९

सूर्याचा स्वाती नक्षत्रात प्रवेश - वाहन ' बेडूक ', दादोजी कोंडदेव पुण्यतिथी (शके १६४७) , पंचक.

चंदराशी - मीन , चंदनक्षत्र - उत्तरा भादपदा , सूर्यनक्षत्र - चित्रा,सायं. ४.०३ नंतर स्वाती !!

 

तर त्यांना "हिंदवी स्वराज्य सेने" तर्फे मनाचा मुजरा,
तुमचे स्थान आमच्या "मनात" तर अढळ आहे,
तरी

तर म्हणा........

शिवाजी महाराज ह्यांचे गुरु दादोजी कोंडदेव ह्यांचा विजय असो !!!!!!!!!!!

कसले हे अंधश्रद्धा निर्मुलन ?

अंनिस, दाभोळकर आणि त्यांची संस्था यांचा नेमका काय problem आहे तेच कळत नाही..
एकीकडे ते म्हणतात देव वगैरे काही नसतो.. आणि दुसरीकडे म्हणतात मंदिरात स्रियांना प्रवेश द्या..
शनी महाराजांच्या चौथ-यावर स्त्रियांना प्रवेश द्या..
अरे एक काही तरी ठरवा रे .. देव आहे का नाही याच्याबद्दल यांनाच संभ्रम आहे..
जर देव नाही म्हणता तर आम्ही हिंदु धार्मिक लोकं काही करेनात तुम्हाला काय करायचे आहे?
आणि प्रवेश द्या म्हणता तर मग देव आहे असे मान्य करता.. एवढा साधं कळत नाय का राव? येडपट कुठले..

माझा दुसरा आक्षेप यांच्या संस्थेच्या नावाला आहे..
यांच्या संस्थेचे नाव काय? अंधश्रद्धा निर्मुलन समिती.. बरोबर आहे ना माझे?
हा तर ही संस्था अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करते असे आपण गृहीत धरूया..
( यांचे खरे स्वरूप काय आहे कोण जाणे? )
जर तुमचे काम अंधश्रद्धा निर्मुलन हे आहे तर मग फक्त हिंदु धर्मातील अंधश्रद्धाच कश्या काय निर्मुलन करता तुम्ही लोकं?
म्हणून मी म्हणतो की नाव बदला राव, तुम्ही आमचेच आहात, तुम्ही हिंदूच की आता काय करणार त्याला? तुम्ही आमचेच आहात, आपल्या धर्मातील अंधश्रद्धा निर्मुलनाचे केवढे पवित्र (?) कार्य करता? मग एक काम करा की राव.. तुमच्या समितीचे नाव हिंदु अंधश्रद्धा निर्मुलन समिती असे करा... म्हणजे बघा कसे छान होईल.. माझ्या सारख्या लोकांच्या मनात नको ते प्रश्न येणार नाहीत.

माझे काही प्रश्न..
मशिदी मधे महिलांना प्रवेश नसतो..
मुस्लीम महिलांचा बुरखा ही एक अंधश्रद्धा आहे..
ख्रिश्चन लोकं मुडदे चर्च मधे ठेऊन त्याची पूजा करतात.. ती पण अंधश्रद्धा आहे..
मुसलमान पाच वेळेस नको त्या गोष्टी माईक लाऊन बोम्बलतात ती पण नुसती अंधश्रद्धा नसून त्याचा पर्यावरण वाद्यांना अजिबात त्रास होत नाही हे विशेष..( ते रोज जे बोंबलत असतात त्याचा अर्थ शोधावा )
शिखांचे केस वाढवणे आणि त्या वर पगडी घालणे ही पण अंधश्रद्धा आहे. ( शिखांच्या वाटेला जाऊन नका उगीच.. फुकट मराल कारण ते अजून एक अंधश्रद्धा पाळतात त्यांच्या कंबरेला तलवार असते हो.. नको उगीच..तिकडे नका जाऊ.. - माझा अनाहूत सल्ला समजावा)
तर अश्या ब-याच गोष्टी मी या दाभोळकर ला सांगू शकतो.. ( त्याला अहो जावो बोलण्याची माझी लिमिट संपली आता)
हिंदु धर्माला असल्या संस्था आणि स्वयंघोषित चिकित्सकाची काहीही गरज नाहीये.
तुमचे कार्यच जिथे सर्व समावेशक नाही तिथे तुम्ही कोण आम्हाला शिकवणारे?
आणि तुम्ही जर का स्वतःला फार शहाणे समजत असाल तर माझी आव्हाने पेलायची तयारी ठेवा तर तुम्हाला मानतो,
कारण मी "बाप दाखव नाही तर आमच्या अंधश्रद्धे प्रमाणे श्राद्ध घाल" असे म्हणणारा माणूस आहे.

दम असेल तर मुसलमान धर्मातील आणि इतर धर्मातील अंधश्रद्धा यांच्याबद्दल आंदोलन नाही.. फक्त ' ब्र ' काढून दाखवा मग मानतो तुम्हाला..
मान्य आहे हिंदु धर्मात अंधश्रद्धा आहेत. पण म्हणून तुम्ही कोणी फार शहाणे आहात असेही नाही.
अंधश्रद्धा निर्मुलन आधी तुम्ही सावरकरांच्या कार्यावरून शिका मग लोकांना शहाणपणा सांगा..

धर्माची चिकित्सा धार्मिक माणसाने करावी उगीच उठ सुठ कोण पण काही बक बक केली आणि चार ठिकाणी भाषणे केली म्हणजे लई भारी होत नाही..

अनादी काळापासून हिंदु धर्म काळ वेळे प्रमाणे बदलत आला म्हणून टिकला आहे.. असल्या
आंडू -पांडू नरेंद्र दाभोळकरने काही सांगायची गरज नाहीये.

अश्या सांगण्यासारख्या ब-याच गोष्टी आहेत पण मी या दाभोळकर सारखा रिकाम टेकडा नाहीये.
वेळ आली की कृतीतून यांना समजेल हिंदु काय असतो ते..
जयतु हिंदुराष्ट्रम..
गिरीश लोहारेकर