कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Saturday 7 April 2012

शिवाजी म्हणतो...........

शिवाजी म्हणतो.....(शिवाजी महाराज,मी आपला इथे एकेरी उल्लेख केला म्हणून माफी मागतो)
हा खेळ(माफ करा हा खेळ नाही हे आज लक्षात येते आहे) आपण लहानपणी खेळलो होतो.आज तोच खेळ खूप आठवतो आहे.
शिवाजी महाराज हेच आपल्याला आदेश देत आहेत असे वाटायचे,जे सांगितले जायचे ते करायचेच असा हट्ट/निश्चय असायचा.

पण आज शिवाजी महाराज ह्यांचे नाव घेऊन,हिंदू धर्माला संपवायचे षडयंत्र चालू आहे,अखंड देशाचे तुकडे व्हावेत म्हणून काही लोक टपले आहेत.
जातीय तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजून स्वतःचा आर्थिक विकास कसा साधायचा,हेच घाणरडे ध्येय घेऊन काही मंडळी पुस्तके छापत सुटली आहेत.
आपल्या हिंदू बहुल देशात आपल्याच हिंदू धर्माला ही मंडळी हीन ठरवून स्वतःच्या धर्माचे "लाल" करत सुटली आहेत.
हे कृत्य ही मंडळी बिनधास करत आहेत.

ह्याचे मागचे कारण,
आपली हिंदू धर्माला मानणारी लोकच षंढ बनली आहेत.
श्रेष्ठ संत मंडळीचे बदनामी झाली तरी आपली सज्जन(भित्री) भक्त म्हणतात की,"सूर्यावर थुंकले तर सूर्याला काही फरक पडत नाही",असे काही वाक्य मारून स्वतःचे "काम" झटकून देतात..आहो हेच आपली उद्याची पिढी वाचेल तेव्हा त्यांनी प्रश्न केला तर,"काय उत्तर द्याल?"...तेव्हा ते विचारातील तेव्हाच का "मारली" नाही ह्यांची...तेव्हा तोंडावर पडाल...
आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून स्वतःच्या जीवाची बाजी लावणारे पण सुटले नाही ह्यांचा "ढोंगी" वृतीतून.

म्हणून एक खेळ(शिवाजी महाराज ह्यांचा आदेश म्हणून)खेळूया...

शिवाजी म्हणतो,
"ह्या लोकांना आता वाटणीवर आण",
"अश्या कृत्यांना जमेल तसा आणि तेव्हा विरोध कर",
"ह्या बद्दल लोकांना जागृत कर",
"जातीसाठी न राहता धर्म आणि देशासाठी जगा"
"माझ्या नावापेक्षा माझ्या ध्येयाचा जप करा".

जमतील का हे आदेश...?
ऐकाल का त्यांचे..?

Wednesday 28 March 2012

पुन्हा एकदा विशाळगड शिवरायांचा करुया !

हिंदुतेजा जाग रे !

महाराष्ट्र म्हणजे नररत्नांची खाण !!!शिवप्रभू आणि त्यांच्या पराक्रमाने भरलेले सोनेरी पान !!सह्याद्रीची अभेद्य काळी छाती ....
श्री परशुरामांच्या आध्यात्मिक सामर्थ्याने निर्माण झालेली पवित्र परशुराम भूमी अर्थात निसर्गरम्य कोकणची रक्तवर्णी माती !!!
इतिहासाची अशीच एक दिव्य आठवण म्हणजे मराठी भूमीत सह्य्राद्रीच्या हृदयात स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवलेले गड किल्ले !
मला ट्रेकिंगची फारशी आवड नसली तरी एखादी संधी मिळाली तर मात्र मी शक्यतो चुकवत नाही !
अशीच एक संधी मिळाली नि मी इतिहासात “ बाजीप्रभू आणि पावनखिंड” हे शब्द अजरामर करणाऱ्या शिवरायांच्या एका जुन्या मावळ्याला भेट दिली !!!

खेळणा उर्फ विशाळगड !

मी आणि आमचा परममित्र श्री.अमित जोशी बरेच दिवस या गडाला भेट द्यायच्या विचारात होतो पण वेळ जुळून येत नव्हती.
अचानक मुहूर्त साधून आम्ही या वृद्ध मावळ्याला भेट द्यायला निघालो.इथे यष्टी महामंडळ आणि कर्नाटक शासन यांच्या वाहनांचा कायमचा राबता आहे.त्यामुळे गडाचे दुर्गमत्व म्हणून काही शिल्लकच राहिलेले नाही.
आम्ही गडाच्या पायथ्यापर्यंत दुचाकी गाडी नेली ....
गडावर जाताना खोकला देवीचे लहानसे मंदिर आहे ... गडावरच्या रेहान मलिक दर्ग्याला भेट देण्याआधी या देवीचे दर्शन घ्यावे असा नियम आहे !!!
पायऱ्या चढताना हिंदू जनजागृती समितीने गडाचा एक सुंदर नकाशा लावला आहे.कुणीतरी हिंदू द्वेष्ट्याने हा नकाशा एकदा फाडला होता आणि नवीन लावलेल्या फलकावर पुन्हा काळे फासले होते.पण चिकाटी हे वैशिष्ट्य असणाऱ्या समितीच्या सदस्यांनी हा नकाशा तिसर्यांदा पुन्हा लावला.गडाचा योग्य अंदाज यायला हा फलक खूप उपयुक्त आहे.गडावर एक चारपाच फुटाचा पादचारी रस्ता आहे जो तुम्हाला थेट दर्ग्याकडे घेऊन जातो.आमची मोहीम होती ‘गडावरच्या मंदिराची माहिती घेणे.कारण इस्लामी पिराच्या झगमगाटात हिंदूंची मूळ मंदिरे पार दिसेनाशी झाली आहेत.त्यातल्या त्यात विठलाई देवीचे जीर्णोद्धार केल्याने सुस्थितीत असणारे एक मंदिर दिसले.
देवीला नमस्कार करून आम्ही पुढच्या मंदिराकडे निघालो,दर्गा जवळ येत होता .... शेकडो कोंबड्या डांबून भरल्या होत्या ....
त्या पीराला नवस करून तो भागवण्यासाठी या कोंबड्यांची आयात करण्यात आली होती.अतिभव्य बांधकाम करून या दर्ग्याला तीर्थ क्षेत्राचा दर्जा देण्यात आलाय.
एक गड किंवा किल्ला असे याचे ऐतिहासिक महत्व कमी करून दारू आणि मटनाच्या पार्ट्या करायला हा एक झक्कास पोईंट झालाय !
यात इतरांच्या सोबत हिंदूंची संख्या खूप लक्षणीय आहे.पुढे आम्ही श्रीरामाचे मंदिर पाहिले अतिशय जीर्ण अवस्थेत असणाऱ्या या मंदिरावर पावसाळ्यात उगवणाऱ्या तणांची मक्तेदारी आहे,आतल्या मंदिराची पूजा अर्चा जंगम म्हणून एक पुजारी आहेत.

आमच्या जुन्या ओळखीचे एक पुजारी श्री.हर्डीकर यांना भेटायचे एक नियोजन होते !त्यांना भेटायला जाताना कचरा आणि आणि सांडपाणी यांनी भरून वाहणारी एक जागा पाहून वाटले कि शिवरायांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या गडाची ही अवस्था ????

आम्ही हर्डीकरांना भेटलो ...
त्यांच्याशी औपचारिक चर्चा केल्यावर केल्यावर त्यांनी सांगितले कि
“१२ व्या शतकात जैन राजा भोज याने हा किल्ला बांधला .१४ व्या शतकाच्या आसपास किल्ल्याची डागडुजी करण्यात आली ! ही डागडुजी करताना स्वयंभू महादेवाची पिंड सापडली ती म्हणजे भगवंतेश्वर,गडावर १३०० च्या आसपास लोकवस्ती,त्यात हिंदूंची फक्त ३० घरे
आणि आम्ही एकमेव ब्राह्मण पुजारी.बाकीची मंदिरे गुरव आणि जंगम लोकांकडे पूजेसाठी आहेत.
सध्या भगवंतेश्वर देवाच्या जीर्णोद्धाराचे कार्य हातात घेतले आहे.
थोडा थोडा निधी जमत आहे पण गडाच्या दुर्गमत्वामुळे बांधकामाचे साहित्य आणणे पण जिकीरीचे आहे.एकूण कार्य हळू हळू चालू आहे.
मंदिराचा आराखडा तयार आहे ! फक्त आता तो प्रत्यक्षात उतरायचे बाकी आहे !
श्री बंडा भोसले , अधिवक्ता श्री सुधीर जोशी , श्री संभाजी साळुंखे हे फक्त तीन जण पुढाकार घेऊन कार्य करत आहेत. तुमच्यासारख्या धर्मप्रेमी लोकांची मदत अपेक्षित आहे .”

आम्ही ऐकत होतो ते समस्या सांगत होते .....

“आमचे एकच ब्राह्मण कुटुंब शिवरायांच्या काळापासून या गडावर देवाची पूजा करत आहे !
आमच्या पूर्वजांना १९३२ पर्यंत मलकापूर सरकारकडून पगार मिळत मिळत असे !
नंतर तो बंद झाला !
तो आजतागायत चालू नाही !
मी भिक्षुकी करून पोट भरत आहे . दुधाची पाकिटे विकण्याचा छोटा व्यवसाय सध्या करत आहे
गडावर दारू मटण यांच्या पार्ट्या नित्याच्या आहेत !
कित्येकदा आमची देवाच्या आवारात दारू पिणे मटण खाणे यावरून भांडणे पण होतात !”
आम्ही खूप सुन्न झालो !!
आता काहीही करून इथल्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे कार्य धर्म कार्य म्हणून नाही तर एक नैतिक कर्तव्य म्हणून केले पाहिजे ! कोल्हापूर शहरात असणाऱ्या वरील धर्माभिमानी व्यक्तींना भेटून हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करून निदान पुढची महाशिवरात्र तरी जोमाने साजरी करुया यासाठी आम्ही त्यांची माहिती घेतली !

आतापर्यंत विशाळगडावर दिसणारी ही गर्दी पाहून आमच्यासारख्या नव्या माणसाला वाटेल कि शिवरायांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी इतके धर्माभिमानी ???
पण ही गर्दी म्हणजे सुदृढ हिंदू समाज नसून हिंदू समाजाला आलेली शुद्ध अधर्मी सूज आहे !!!
अशी भयाण स्थिती पाहून मन सुन्न झाले !!!
विशाळगड हा शिवरायांचा स्वराज्याचा नाही तर कुठल्यातरी मुसलमान पिराचा अड्डा झालाय !!
जो पूर्वी म्हणे नाथ संप्रदायाच्या जालिंदरनाथांची पादुका असणारी जागा होती मात्र इस्लामी आक्रमकांपासून वाचावी यासाठी काही लोकांनी त्याला दर्ग्याचे रूप दिले !
मात्र तिथले हिंदू अस्तित्व आज काळाच्या ओघात नष्ट होत आहे !!!
पूजनीय संभाजीराव भिडे गुरुजीं, हिंदू जनजागृती समिती आणि कोल्हापूर परिसरातील अनेक हिंदुत्ववाद्यांनी या ठिकाणी हा वारसा टिकवण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत !
कोल्हापुरातील काही मंडळांनीही मंदिर जीर्णोद्धारासाठी चांगले प्रयत्न केले आहेत !!!
मात्र अजूनही काही मंदिरे फार जीर्ण अवस्थेत आहेत !
स्वयंभू भगवंतेश्वर मंदिरच्या जीर्णोद्धाराचे कार्य सध्या चालू आहे !
एक संवेदनशील हिंदू म्हणून आपण हा ऐतिहासिक वारसा जपूया आणि पुन्हा एकदा विशाळगड शिवरायांचा करुया !



· · · Share · Delete