कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Wednesday 21 December 2011

इतिहास म्हणजे काय?

जय भवानी,

आज एक व्यक्ती बरोबर पुस्तकांबद्दल चर्चा झाली,
त्यात मी विचारले की "ऐतेहासिक पुस्तक वाचलीस का..?",
ती म्हणाली "कशाला काय फायदा त्याचा..?,
शिवाजी महाराज ह्यांनी कुठला किल्ला जिंकला?,
काय केले ह्याने काय होणार?,
त्याने काश्मीर प्रश्न सुटणार का..?,किंवा इतर प्रश्न सुटतील का....?"

झाले.....माझे डोके सटकले,

पण त्या व्यक्तीला बोलून काय फायदा असे विचार खूप लोकांचे झालेत,
किती लोकांना आपण हे सांगणार,जे सांगतात त्यांना आपण समजावू पण जे नाही सांगत नाही त्यांचे काय..
ज्यांना ह्याची जाणीवच नाही...

असे लोक इतिहासाला कसे बघतात(म्हणजे आपण कसा बघू नये)....हे बघू

इतिहास म्हणजे जुन्या कथा व गोष्टी..
इतिहास म्हणजे भूतकाळ..
इतिहास म्हणजे झालेल्या चुका.....
इतिहास म्हणजे धूळ..
इतिहास म्हणजे कचरा..
इतिहास म्हणजे पडलेले किल्ले..
इतिहास म्हणजे खून..
इतिहास म्हणजे लढाया..
इतिहास म्हणजे अन्याय..
इतिहास म्हणजे साटलोटं..
इतिहास म्हणजे कारस्थानं..
इतिहास म्हणजे गुंता..
इतिहास म्हणजे वर्तमानाच्या मानगुटीवरचा वेताळ..
इतिहास म्हणजे फक्त "गुण" मिळण्यासाठी "पाठ" करायचा एक विषय...

पण खरा इतिहास ह्यांना कळलाच नाही......

इतिहास म्हणजे कर्तुत्व..
इतिहास म्हणजे पराक्रम..
इतिहास म्हणजे बलिदान..
इतिहास म्हणजे शिकवण..चुकांमधून शिकणे..
इतिहास म्हणजे विजय..
इतिहास म्हणजे जिद्द..
इतिहास म्हणजे अभिमान..
इतिहास म्हणजे भविष्यासाठी केलेले त्याग..

तुम्हाला काय वाटते इतिहास म्हणजे काय..??
सांगा...इथे....