कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Sunday 16 October 2011

हिंदूंची दिशाभूल करणाऱ्या आध्यात्मिक विचारधारा !!!!


     || धर्म संस्थापक भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण ||
हिंदूंचे शास्त्राचे ज्ञान जगात केव्हाही श्रेष्ठ आहे ...

प्रत्येकाने ते  जसे  आवशयक आहे तसे वापरून स्वतःची सर्वांगीण प्रगती करून घ्यावी असे आपला धर्म सांगतो  !!!
यातूनच आपल्याकडे अनेक प्रकारच्या उपासना पद्धती उदयास आल्या ...
शैव , वैष्णव , शाक्त , अघोरी , तांत्रिक , योग अशा अगणित उपासना पद्धती हिंदूंच्या उपासनेच्या भाग बनल्या ....
कारण 'व्यक्ती  तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग' असे हिंदूंचे तत्वज्ञान सांगते ....

भगवान श्रीकृष्णाने सांख्य तत्वज्ञान सांगितले , भगवान पतंजलींनी योगसूत्रे सांगितली , अनेक दर्शनांच्या माध्यमातून समाजकारण , धर्मकारण , राजकारण , अर्थकारण , कला , संस्कृती यांचे यथोचीत ज्ञान हिंदुना आणि समस्त जगाला उपलब्ध झाले .

ज्याचा वापर आज अनेक संप्रदाय करत आहेत योग, प्राणायाम, ध्यान , नामस्मरण आदी हिंदूंची उपासना पद्धत वापरून आज अनेक संप्रदाय चालत आहेत मात्र त्यांना या सर्वांचा उद्गाता धर्म मान्य नाही काहींना तर देव देवता पण मान्य नाहीत , असे संप्रदाय आजही निधर्मी आहेत आणि स्वतःची ती उपासना पद्धत श्रेष्ठ आणि बाकी सर्व तुच्छ अशा अहंगंडाने पछाडलेले आहेत !!!
निदान  धार्मिक विचारसरणीच्या लोकांनी तरी धर्माला आणि राष्ट्राला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यावे त्यासाठी हा लेखप्रपंच !!!

 
काही दिवसांपूर्वी एका सांप्रदायिक व्यक्तीशी ओळख झाली आचरणात कमालीचा सात्त्विक असणारया त्या व्यक्तीशी सहज बोलता बोलता मी त्यांची उपासना पद्धत विचारली.....
त्यावर त्यांनी, " आम्ही ध्यान मार्गातून साधना करतो .....जगात ध्यान लावून देवाची अनुभूती घेणे सर्वात कठीण !!! त्यामुळे या मार्गातून साधना करणारे लवकर मोक्षाला जातात ..... आमचा मार्गच सर्वश्रेष्ठ आहे ..... आम्ही ज्या मार्गाने साधना करतोय तोच मोक्ष प्राप्ती करून देऊ शकतो ... जगात ध्यान मार्ग हाच खरा साधनामार्ग आहे ..... आम्ही आमची साधना शिकवणारे  वर्ग घेतो त्यात तुम्ही पण या ........"
वगैरे वगैरे बरेच सांगितले !!!!

माझे कुतूहल हळूहळू टोकाला जात होते ....

"पण आपल्या धर्मात तर भक्तीयोग श्रेष्ठ आहे ...."माझे भागवत चिंतन !!!

"धर्म ??? कोणता धर्म ??? आम्ही कोणताही धर्म मानत नाही !!! "
तो  बहुतेक किंचाळायच्या बेतात असावा !!!

"अहो धर्म म्हणजे हिंदू धर्म !!!! तुम्ही सांगितलेली उपासना पद्धत आणि तुमचे आराध्य दैवत दोन्हीही हिंदू धर्माच्या अंतर्गत आहेत !!!"
इति मी .

"अजिबात नाही !!!
आमचा आणि हिंदू धर्माचा काहीही संबंध नाही !!!
आमच्या संप्रदायात सर्व धर्माचे लोक आहेत ....
तुम्ही धर्माची आडकाठी आणू नका !!! "

त्याच्या नसानसातून 'सर्वधर्म समभाव' ओसंडत होता !!!

"अहो! पण ध्यानधारणा , समाधी वगैरे उपासना मुसलमान किंवा ख्रिस्ती किंवा पारशी लोकांची नाही तर हिंदू धर्माची देणगी आहे .... आणि हे जागतिक सत्य आहे ....." माझे हलके फुलके विचार !!!!

"आम्ही फक्त मानवता धर्म मानतो !!! हिंदू-मुसलमान हा भेद हिंसा शिकवतो..... आम्ही हिंसा नाही तर ध्यानसाधना हेच जगातील एकमेव सत्य मानतो बाकी सर्व जग खोटे आहे ....माया आहे ....ब्रह्माची अनुभूती हीच जगातील सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे ...."
त्याची घोटीव वाक्ये तो आठवून आठवून उगाळत होता ....

"अहो ! पण, माया खोटी असती तर असुरांचे अत्याचार रोखायला देवाने अवतार घेतलेच नसते ..... खोट्या मायेतील अत्याचार पण खोटेच असते तर देव कशाला भक्तांच्या मदतीला धावून आला असता ????
तो म्हणाला असता कि जाऊ दे माझा भक्त पण माया आणि त्याला छळणारा असुर पण माया !!!
मग भक्ताला वाचवून काय फायदा !!!"


माझी गुगली ऐकून तो जरा बावचळला !!! पण माझे बोलणे चालूच होते .....

"अहो साक्षात भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे जो मायेत असूनही माझे सदैव स्मरण करतो आणि कर्मकांड आदी कशाचाही आधार न घेता मला भक्तीमार्गातून भजतो तो निसंशय मजपर्यंत येतो.....मात्र त्यासाठी पराकोटीची  भक्ती असावी लागते आणि ती जागृत होणे  तेवढे सोप्पे नाही यासाठी मी प्रत्येक जीवाला त्याच्या  कुवतीनुसार मी वेगवेगळे साधनामार्ग उपलब्ध करून दिले आहेत ...... आणि त्यातही त्याला काही जमत नसेल तर पूजा अर्चा आदी कर्मकांडादि साधने उपलब्ध करून दिली आहेत .....

आणि या सर्वांना एका सुरक्षित कोशात ठेवले आहे ज्याचे नाव म्हणजे धर्म !!!!

आणि हे सर्व ज्ञान सामान्यांना देणाऱ्या ज्ञानेश्वरांनी त्यांची सर्वोच्च अनुभूती सांगितली आणि ती म्हणजे "हे विश्वाची माझे घर !!!"

तुम्ही म्हणता त्या विचारधारेने तुम्ही या अनुभूतीचा कसा अनुभव घेणार ???
कारण तुम्ही इतर उपासना तुच्छ समजता !!!
तुम्ही ज्या धर्माचा आधार घेताय तो धर्म तुम्हाला मान्य नाही, म्हणजे 'मी साखर खातो' पण 'ती गोड आहे' यावर माझा विश्वास नाही असे म्हणण्यासारखे आहे !!!
आणि हिंदू धर्म हा सर्वोच्च प्रतीचे जीवन जगायला शिकवतो !!! यात तर काहीच वाद नाही
 तो संकुचित वृत्तीने मी आणि माझे जीवन या द्वयीत आणि यापलीकडे  दडलेला ईश्वर पाहायला शिकवतो !!!"

त्याची तलवार म्यान झाली होती !!!

"बर असो तुम्ही राष्ट्र आणि त्याची वाईट परिस्थिती बदलावी म्हणून काही प्रयत्न करता कि नाही ???" माझा पुढचा वार !!!

"ते काही आम्हाला शिकवले नाही आणि देशाची वाईट परिस्थिती बदलायला देव समर्थ आहे !!!त्यासाठी आपण का वेळ वाया घालवायचा ??? " त्याचे उत्तर !!!

"पण, त्या ईश्वराने आपल्याला बुद्धी दिली आहे ती वापरून देश हिताचे काही केले तर देव अजिबात रागावणार नाही !!! विष्णूचा अवतार असलेले भगवान रामचंद्र समर्थ आहेत असे वानरांनी म्हणून ते समुद्राच्या किनाऱ्यावर निवांत खाऱ्या वाऱ्याची मजा घेत बसले असते तर रामसेतू पूर्ण झाला असता का ???
त्यांनी झोकून देऊन रामसेतू तयार केला म्हणून त्यांना पाण्यावर दगड तरंगतात हि अद्भूत अनुभूती साक्षात पाहायला मिळाली !!!"



दोन दिवसापूर्वी तो मला परत भेटला . आणि म्हणाला कि मी हिंदू धर्मातील इतर अनेक बाबींचा अभ्यास केला .... कधी नाही एवढा आनंद मला मिळाला आणि हेही पटले कि नित्यनुतन परमानंद स्वरूपी ईश्वरानेच मला कुपमंडूक स्थितीतून बाहेर काढून हिंदू धर्माच्या विशाल आनंदात सामावून घेतले !!!!

No comments:

Post a Comment