कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Thursday 8 September 2011

तरी ते आमचे "विघ्नहरातच" आहेत !!!!!!!!!!!!!!!!

राम राम,

गणपती बद्दलचे काही ओव्या...
ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील खालील नमनाची ओवी सुप्रसिद्ध आहे -


ओम नमोजी आद्या | वेदप्रतिपाद्या |
जयजय स्वसंवेद्या | आत्मरूपा ||
देवा तुचि गणेशु| सकलमतिप्रकाशु|
म्हणे निवृत्तीदासु | अवधारिजोजी ||

नामदेवांनीही गणेशस्तवनाचा अभंग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात -

लंबोदरा तुझा, शोभे शुंगदंड करितसे खंड दुश्चिन्हांचा ||
चतुर्थ आयुधे शोभतासी हाती भक्ताला रक्षिती निरंतर ||


सर्वात महत्वाची ओवी जी "तुकाराम महाराज" ह्यांनी गणपती बाप्पा साठी लिहिली ती,

गणराया लौकरी येई । भेटी सकलांसी देई ।।
अंगी सिंदूराची उटी । केशरकस्तुरी लल्लाटी ।।
पायी घाग-या वाजती । नाचत आला गणपती ।।
तुका म्हणे पाही । विठ्ठल गणपती दुजा नाही ।।

सांगा सांगा सर्वांना सांगा,
आमचे बाप्पा सर्वांना प्रिय होते,आणि आहेत.........
 
तुम्ही लाख "शोध" लावा,तरी ते आमचे "विघ्नहरातच" आहेत.....

No comments:

Post a Comment