कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Friday 2 September 2011

आपला महान हिंदू धर्म.


हिंदू धर्म हा विश्वातील अतिप्राचीन , अत्यंत सहिष्णु , वैश्विक चिंतन करणारा , विश्वाला कुटुंब मानणारा असा अत्यंत उदार आणि श्रेष्ठ धर्म आहे. हिंदू धर्म-संस्कृतीने मानवाच्या लौकिक-पारलौकिक सर्वाभ्युदयाचा सर्वांगीण विचार केला आहे. व्यष्टी-समष्टी-परमेष्टी यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हिंदू धर्म होय. व्यावहारिक उत्तमता आणि पारमाथिर्क श्रेष्ठता यांचा उत्तम समन्वय हिंदू धर्मात असून , मानवाला द्वैताकडून अद्वैताकडे- अर्थात मानवी विकासाच्या अत्युच्च शिखरावर सुप्रतिष्ठित करण्यावरच हिंदू धर्म-संस्कृतीचा भर आहे. आधिभौतिक , आधिदैविक आणि आध्यात्मिक अशा उत्क्रान्त क्रमाने मानवाला जीवनाच्या अंतिम लक्ष्याचा पूर्वानुभव देण्याचे उद्दिष्ट केवळ हिंदू धर्मातच आहे. हिंदू धर्म हा सर्वकल्याणकारी आहे.

' सवेर्पि सुखिन: सन्तु सर्वे सन्तु निरामया:।
सवेर् भदाणि पश्यन्तु मा कश्चित् दु:खमाप्नुयात्।। '
ही हिंदू धर्माची प्रार्थना अलौकिक आहे.

हिंदू धर्मातील चार आश्रम म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा अभूतपूर्व संगम आहे. चार वर्ण हे अनुक्रमे ज्ञान- सत्ता- संपत्ती- कला यांची प्रतिके आहेत. हिंदू धर्मातील पुनर्जन्म आणि कर्मविपाक अत्यंत तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ आहेत. वृद्धांची पूजा आणि स्त्रीला मातृरूपात पाहणे ही हिंदू धर्माची अनन्यसाधारण वैशिष्ट्ये आहेत. ' मातृवत् परदारेषु ' हीच हिंदू धर्माची शिकवण आहे. माता- पिता-आचार्य यांच्याबरोबर हिंदू धर्म अतिथीलाही देवासमान मानतो , पूजतो. अंत:करणशुद्धीचे सर्वाधिक प्रबळ साधन म्हणजे संस्कार. या संस्कारांना हिंदू धर्मात अत्यंत श्रेष्ठ स्थान आहे. म्हणूनच सर्व हिंदू जीवन सोळा संस्कारांत निबद्ध आहे. कर्मातील भिन्नता पण स्नेहातील एकता हे हिंदू धर्माचे वैशिष्ट्य आहे. सांस्कृतिक विविधतेत एकात्मतेचा प्रत्यय हिंदू धर्मच देतो. अवघ्या विश्वाला एक कुटुंब- एक घर मानण्याची वैश्विक अनुभूती हिंदू धर्मात आहे. सगुण-निर्गुणाचा अद्भुत समन्वय हिंदू धर्मात आहे. सगुण अवतारात हिंदू धर्माचा गौरव सामावला आहे. हिंदू धर्म केवळ स्वराज्यापुरता मर्यादित नाही.. स्वराज्याचे सुराज्य करून तो रामराज्याकडेही झेपावतो. हिंदू विचाराचं अंतर्यामी सूत्र आहे ' एकं सत् विप्रा बहुधा वदन्ति। ' धामिर्क- राजकीय- आथिर्क- सामाजिक- व्यक्तिगत स्वातंत्र्याचा उद्घोष हिंदू धर्म करतो. पण या सर्वांचा उपयोग सत्यदर्शनासाठी , एकात्मतेसाठी आणि परमार्थासाठी झाला पाहिजे , हा हिंदू धर्माचा आग्रह आहे. हिंदू धर्मातील ऋत- अर्थात वैश्विक सत्याची संकल्पना दिव्य आहे. त्यावर आधारित व्यक्तिगत जीवन नि:स्वार्थ , तपोमय , त्यागमय , निष्ठामय , श्रद्धामय करण्याचा आदेश हिंदू धर्म देतो. हिंदूंची तृप्ती लौकिक वा भौतिक विजयाने होत नाही. आध्यात्मिक अनुभूतीच हिंदूला सर्वश्रेष्ठ वाटते. कुटुंब संस्था म्हणजे हिंदू धर्माचे सारसर्वस्व! अथर्व वेदातील ऐक्यवृद्धी या सूक्तात म्हटले आहे-

' हे बांधवांनो , तुमच्यातील द्वेष नाहीसा होऊन तुमची हृदये आणि मने एक होवोत. धेनुवत्सादृश्य सौहार्द तुमच्या ठायी वृद्धिंगत होवो. पुत्र पित्याची अवज्ञा न करो. माता-पुत्रांमध्ये एकोपा असो. पती-पत्नी परस्परांशी मधुर आणि मृदू भाषण करोत. बंधू-भगिनी परस्परांचा विद्वेष न करोत. समस्त जन सामंजस्याने आणि एकोप्याने मधुर भाषण करोत. (हे बांधवांनो) , तुमच्या घरातील देवविरोध (नास्तिकता) नाहीसा करून द्वेषराहित्य आणि एकोपा निर्माण करणारी कृत्ये आम्ही प्रारंभितो. हे बांधवांनो , कनिष्ठांनी , आपले स्थान ओळखून , तसेच थोरांना मान देऊन ऐक्य कायम ठेवावे. तुमच्या कार्यात आणि मनात सदैव एकजूट असो. हे बांधवांनो , रथचक्राच्या आऱ्यांप्रमाणे तुमची जलगृहे , भोजनगृहे , धर्मनियम तसेच तुमचे वर्तन एकात्म असावे. एकत्रपणे तुम्ही अग्न्युपासना करा. (हे बांधवांनो) , तुम्हास मी एकहेतूचे आणि एकमनाचे बनवितो. अमृताचे एकमताने रक्षण करणाऱ्या देवगणाप्रमाणे तुम्ही परस्परांना आपलेसे करून सर्वकाळ ऐक्य प्रस्थापित करा. ' ( अ. वे. 3.30.1-7)

द्वंद्वात्मक सृष्टीत निर्द्वंद्व होण्यातच मानवी पुरुषार्थ आहे. अर्थ व काम यांनाही हिंदू धर्माने पुरुषार्थ मानले , पण त्यांचे स्थान दुय्यम ठेवले. प्रधान पुरुषार्थ आहेत धर्म आणि मोक्ष!

अन्य देशांत ईश्वराचे , भगवंताचे प्रेषित येतात. आपण असे भाग्यवंत आहोत आणि आपला देश असा महान आहे की , इथे प्रत्यक्ष भगवंतच अवतरत असतो. संपूर्ण पृथ्वी हे जर मोठे घर मानले , तर बाकीचे देश हे या घरातील मोठी दालने असतील. पण भारतवर्ष म्हणजे ' देवघर ' आहे.

आपल्याकडे बार्हस्पत्य संहितेत एक अतिशय सुंदर श्लोक आलेला आहे. तो श्लोक असा आहे-

' हिमालयं समारभ्य यावदिन्दुसरोवरम्।
तं देवनिमिर्तं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते।। '

' ज्याचा प्रारंभ हिमालयापासून झालेला आहे आणि ज्याची सीमारेषा हिंदू महासागरापर्यंत आहे , तो हा देश प्रत्यक्ष देवांनी निर्माण केलेला आहे अन् त्या देशाचे नाव हिंदुस्थान आहे. '

हिंदू धर्म आणि हिंदुस्थान यांची अलौकिकता निविर्वाद आहे.

अ‍ॅड.विकास संदीपान खरात
    व्यवस्थापक 
हिंदवी स्वराज्य सेना                                                             

No comments:

Post a Comment