कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Saturday 3 September 2011

सर्व धर्म आणि त्यांच्या सर्व ग्रंथांचा पायाच मुळी हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता आहे...




शिकागोच्या धर्मपरिषदेत पहिल्यांदा भारतीय संस्कृतीची विजयी पताका स्वामी विवेकानंदांनी फडकवली.

भारतीय संन्यासी म्हणत त्यांची कुचेष्टाही काही जणांनी केली. परंतु, ते शांत होते.
शिकागो धर्मपरिषदेच्या व्यासपीठावर उपस्थित धर्मीयांचे धर्मग्रंथ ठेवण्यात आले होते. पण वरच्या बाजूला असलेली भगवद्गीता कोणीतरी अलगद काढून सर्व धर्मग्रंथांच्या खाली ठेवली. स्वामीजींनी ते हेरलं. ते हसले. आणि बोलण्यास उभे राहिले.

"उपस्थित बंधू-भगिनींनो" अशी सुरवात करताच संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पुढे ते कितीतरी वेळ बोलत होते. आणि उपस्थित ते ऐकत होते.
'' व्यासपीठावर माझ्या धर्माचा ग्रंथ सर्वांत खाली ठेवण्यात आला आहे. ज्यांनी तो तिथे ठेवला त्यांचे मी आभार मानतो. माझी चूक मला त्यांनी उमजवून दिली. सर्व धर्म आणि त्यांच्या सर्व ग्रंथांचा पायाच मुळी हिंदू धर्मग्रंथ भगवद्गीता आहे ".

स्वामीजींच्या या भाषणाने सर्व सभागृह स्तब्ध झाले. अमेरिकेतील सर्वच प्रसारमाध्यमांनी स्वामीजींचे विचार अद्वितीय असल्याचे मान्य केले.

हिंदू धर्माला नवे ठेवणाऱ्या लोकांनी हे वाचावे....

पुढे त्यांनी असे भाषण केले,

मी तुम्हाला एक लहान गोष्ट सांगतो. माझ्या आधीच्या एका उत्तम वक्त्याचे आपण ऐकलेतच जो म्हणाला की, "चला, आपण सर्वजण एकमेकांची निंदानालस्ती, अपशब्द वापरणे थांबवूया," आणि त्याला वाईट वाटत होते की सतत सर्वत्र इतका (variance) फरक आहे.

पण मला आता एक गोष्ट सांगाविशी वाटत आहे जी या फरक (फारकत?) होण्याच्या मूळाबद्दल बोलते. एक बेडूक आपल्या विहीरीत राहत असतो. खूप वर्षे राहत असतो. तो तेथेच जन्माला आलेला असतो आणि तेथेच वाढलेला असतो. त्या विहीरीतच त्याचे जीवन गेलेले असते/चाललेले असते. अर्थात तेथे उत्क्रांतीवादी नव्हते जे सांगू शकले असते की त्या बेडकाचे डोळे शाबूत होते का नाही ते. पण गोष्टीपुरते आपण असे धरून चालूया की त्याचे डोळे चांगले होते आणि तो त्यांची निगा चांगली राखायचा. तिथे (एका ठिकाणी) राहून त्याची त्वचा गुळगुळीत/चकचकीत झाली होती आणि तो जाड झाला होता. एक दिवस अचानक त्या विहीरीत, समुद्रात राहत असलेला बेडूक येउन पडला.
"तू कुठून आलास?"
"समुद्रातून"
"समुद्रातून? केव्हढा मोठा असतो? या विहीरी एव्हढा?" आणि त्याने विहीरीच्या एका बाजूने दुसर्‍या बाजूस उडी मारली.
"माझ्या मित्रा" समुद्रातील बेडूक म्हणाला, " समुद्राच्या भव्यतेची तुलना तू विहीरीशी कशी करतोस?"
मग विहीरीतील बेडकाने अजून एक उडी मारली आणि विचारले (दोन उड्यांच्या अंतराइतकी) की इतका समुद्र मोठा असतो?
"हा काय वेडेपणा आहे? समुद्राची तुलना तू विहीरीशी करूच कशी शकतोस?"
"असे काय!" विहीरीतील बेडूक (तेथील इतर बेडकांना म्हणाला) "म्हणजे हा (समुद्रातील) बेडूक खोटारडा आहे. माझ्या विहीरीपेक्षा काहीही मोठे असू शकत नाही! तेंव्हा हाकलून देउया याला!"

ही आपली नेहमीची अडचण आहे.

मी हिंदू आहे. मी माझ्या विहीरीत बसतो आणि तेच जग समजतो. तेच ख्रिश्चनांचे आणि मुसलमानांचे, आपापल्या विहीरीला जग समजत बसतात. (मला या पुढे जाउन तेच कम्यूनिस्टांचे आणि सेक्युलरवाद्यांचे म्हणावेसे वाटत आहे!) . हे अमेरिके, मी तुझा आभारी आहे, या प्रयत्नामुळे (सर्वधर्मपरीषदेमुळे) हे अडथळे मोडायला मदत होत आहे आणि मी आशा करतो की देवकृपेने येणार्‍या भविष्यात तू हे ध्येय साध्य करशील!


No comments:

Post a Comment