कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Friday 2 September 2011

मुलनिवासी एक धादांत खोटी संकल्पना.


आज काल संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ,बामसेफ, ह्या संघटना हिंदू धर्मात फुट पडायचा प्रयत्न करताना दिसतात.ह्या साठी त्यांनी सुरवातीला निवडला आहे तुलनेने अल्पसंख्याक असलेला ब्राह्मण समाज.ब्राह्मण समाजाविषयी नको तो अपप्रचार करून ब्राह्मणेतर समजा मध्ये द्वेष पसरवायचे हे कारस्थान आहे.मुळात आर्य ,द्रविड हा वाद ब्रिटीश नि मुद्दामून निर्माण केला...त्यांच्या फोडा  व राज्य करा ह्या नीती ला अनुसरून.स्वकीयांनी एखादी गोष्ट ओरडून सांगितली तरी ती आपण मान्य करत नाही पण बाहेरील लोकांनी कानात सांगितली गोष्ट तरी ती पटते.त्याचाच हे उदाहरण.गोरे लोक वाद पेटवून गेले...बर गेले त्याला ६० वर्ष झाली तरी आम्ही भांडतोय अजून.त्यांनी निर्माण केलेला हा वाद किती खोटा आणि निरर्थक आहे हे पहा.
आर्य नावाच्या गोर्‍या कातडीच्या, नीळसर डोळ्यांच्या, उंच- धिप्पाड अंगकाठीच्या लोकांनी कित्येक वर्षांपुर्वी भारतावर आक्रमण केलं आणि इथल्या मुळ निवासी 'द्रविड़' नावाच्या वंशाच्या लोकांना पराभूत केले. हा सिद्धांत गेली दिडशे वर्षे प्रचलित आहे. या सिद्धांताने भारताचे अतोनात खच्चीकरण करून त्याला न्युनगंडाने पछाडून टाकले. उत्तर-दक्षिण भारतीय असा संघर्ष त्यातून निर्माण झाला. मात्र आता नव्याने झालेल्या जनुकीय संशोधनाच्या निष्कर्षानुसार, आर्य आणि द्रविड़ असे भिन्न वंश अस्थित्वात नाहीत. कथित आर्य अणि द्रविड़, सर्वांचे जीन्स सारखेच आहेत. त्यामुले द्राविडी अस्मितेच्या नावाखाली उभारण्यात आलेल्या दक्षिणेकडील\ राजकीय पक्षांचे अस्थित्वाच धोक्यात येऊ शकेल. 'हार्वर्ड विद्यापीठ' त्याच्याशी संलंग हार्वर्ड मेडिकल स्कूल, हार्वर्ड स्कूल ऑफ़ पब्लिक हेल्थ, ब्रॉड इंस्टिट्यूट ऑफ़ हार्वर्ड अणि एम्. आय. टी या शिक्षणसंस्था आणि भारतातील 'हैदराबाद येथील सेंटर फॉर सेल्युलर एंड मोलिक्यूलर बायोलोजी' यांनी संयुक्तपणे हे जनुकीय संशोधन केले आहे मुळात या शोध प्रकल्पाचा उद्देश आर्य-द्रविड़ वंशाची निश्चिती करणे असा नाहीच. एकंदर भारतीय समाजात काही विशिष्ट जनुकीय व्याधी आढळतात. या जगात अन्यत्र आढळत नाहीत मग त्यामागील कारण काय असावे, हे शोधणे हां प्रकल्पाचा मुख्य उदेश आहे.
परंतु यावर काम करत असताना संशोधकांच्या समोर आर्य-द्रविड़, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय, गौरवर्णीय-कृष्णवर्णीय, उच्चवर्णीय-निम्नवर्णीय, नागरी- वनवासी असे विविध राजकीय सामाजिक भेद आले. याकरीता या संशोधकांनी वरील सर्व गटांमधील व इतरही गटांमधील व्यक्ती निवडल्या. २५ भिन्न गटांमधील १३२ व्यक्तींच्या जनुकंचे नमूने घेऊन त्यांचे तीन लाख जनुकीय कसोट्यांद्वारे विश्लेषण करण्यात आले.
सीसीएमबीचे पूर्व संचालक लालजी सिंग आणि वरिष्ठ वैज्ञानिक कुमारस्वामी दंगराजन यांनी या प्रकल्पाचा निष्कर्ष विशद करताना सांगितले की, विशिष्ट व्याधी फक्त भारतीय समाजाताच का आढळतात ?, यावर या संशोधनातून प्रकाश तर पडलाच आहे; पण आर्य-द्रविड़, उत्तर भारतीय-दक्षिण भारतीय, गौरवर्णीय-कृष्णवर्णीय, उच्चवर्णीय-निम्नवर्णीय, नागरी- वनवासी असे विविध सामाजिक भेद आज आपल्याला दिसून येत आहेत, त्यांना कोणताही शास्त्रीय आधार नाही, हे मात्र जनुकांनी दाखवले आहे कारण परिक्षणासाठी घेतलेल्या सर्व नमुन्यांची जनुकीय वैशिष्ट्ये समान आहेत. म्हणजेच जनुकीय विज्ञानानुसार सर्व भारतीय एकाच वंशाचे आहेत.

1 comment: