कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Wednesday 31 August 2011

धर्म निरुपद्रवी असतो ..............!!!!

राम राम,

ह्या चुका माणसांच्या चुका आहेत,धर्म निरुपद्रवी असतो...माणूसच उपद्रव करतो....

हे सांगायचे कारण म्हणजे उद्या "गणेश चातृथी" आहे,देशातला/महाराष्ट्रातला खूप मोठा हिंदू सणापैकी एक........
ह्या सणामध्ये पर्यावरण/अंधश्रद्धा वाले ओरडा-ओरड करायला लागतील...
ध्वनी-प्रदूषण,पाणी-प्रदूषण होईल आणि रस्ते उकरले जातील...अडवले जातील....लोकांना त्रास होईल....
पण ह्याचा अर्थ असा नाही,
की "हिंदू" सणामध्ये चुका आहेत किंवा धर्मामध्ये असे सांगितले आहे....

काही लोकांना वाटेल की "हिंदू" धर्माबद्दल टीका करीन,
तर नाही मी आपल्या माणसांच्या वृत्तीबद्दल टीका करणार आहे..

बोला की कुठे असे लिहिले आहे की "डॉल्बी" लावली तरच गणपती आपल्याला "बुद्धी" देईल
(इथे मी नमूद करतो,की मशिदी वर जे भोंगे लावले जातात,ते पण त्यांचा धर्म ग्रंथात सांगितले नसेलच,
मग त्यासाठी आपण आपल्या मंदिरांवर पण लावावेत आणि रोज आरती त्यातूनच म्हणावी,म्हणजे त्याने तिथला परिसर शुद्ध होईल)
त्या पेक्षा जर ह्याचेच पैसे जर एक "शाळेत" वह्या/पुस्तके/कपडे घेऊन दिले तर "गणपती" नक्की प्रसन्न होईल.
त्यातही "दारू" पिऊन नाचणे,अंग विक्षेप करून,मुलींना धक्का मारून,मंडळ मधली इर्षा वाढवणे..

काय साध्य होते ह्याने,ह्याने काय हिंदू धर्माची "भरभराट" होते....नाही उलट ह्या मुळे,त्याची "वाताहत" होते....

हे झाले ध्वनी प्रदूषणाचे,आणि पाण्याचे काय....तर मी सांगतो,
ज्या वेळी गणेश उस्तव चालू झाला,म्हणजे सार्वजनिक उस्तव म्हणजे टिळकांनी तो का केला,तर लोकांना एकत्र यावे,एकी वाढावी...
त्यावेळी किती मंडळे असतील,१०-१०० ह्या पेक्षा जास्त नाहीत,

आता प्रत्येक छोट्या गावात पण १०० मंडळ असतात,कोल्हापुरात तर किमान १००० असतील,
काय साध्य झाले,उलट १००० मंडळांची तोंडे वेगवेगळी कडे झाली..त्यात सगळ्या मूर्ती प्लास्टर च्या...
ज्या विरघळत नाही,ज्यांचा वर रासायनिक रंग वापरले जातात...
अधिक सगळ्या घरातील मुर्त्या ज्याची गणना नसते....मग होणारच ना प्रदूषण.....

त्यासाठी कोण जबाबदार,आपणच ना,लोकसंख्या आणि त्याही फक्त "शहरात" असल्याने त्यावर ताण येतो,
मग काही लोकांना हातात "आयते कोलीत" मिळते,मग हिंदू धर्मावर टीका केली जाते,

कचरा निर्माण करा, रस्ते गटारे तुंबवा,
असे काही कोणताच धर्म सांगत नसतो, पण तरीही या प्रश्नाना धर्म (हिंदु धर्म) जबाबदार मानून ते झोडपत बसतात,
हे असे रोखणे आपल्याच हातात आहे,


एक गाव एक गणपती,
एक वार्ड एक गणपती अश्या संकल्पना का राबवल्या जात नाही.....

विचार करा.......

No comments:

Post a Comment