कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Monday 8 August 2011

सावधान !

      ब्रिगेडकडून सध्या गुन्हे दाखल करण्याची स्पर्धा लागली आहे. गुन्हा दाखल करा आणि मिळवा सिटी प्राईड ची तिकिटे मोफत,ग्राहक बाजार मधून २० किलो गहू फुकट,शिवमतींसाठी स्वयंचलित पुरणयंत्र आणि शिवश्रींसाठी पिकदाणी मोफत अश्या काही ऑफर्स ठेवल्या आहेत की काय याचा मला संशय येतोय.  त्यांचा आजपर्यंतचा अजेंडा पाहता आणि गुन्ह्यात "गोवण्यात" आलेल्या मुलांकडे पाहता नक्की काय झाले असेल याचा अंदाज बांधणे हे सुज्ञास अवघड नाही.  मुळात पुरावे काय आहेत ते नीट दाखवलेले नाहीयेत. तसेच सरकारी वकिलांनी "तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी" आरोपीला अजून कोठडी मिळावी अशी याचना केली. 
 
      माझ्या मते जर "cyber forensic investigation and tracing the roots with foot prints" मधून खऱ्या तांत्रिक बाबी लगेच उघड होतील ना . त्यासाठी कस्टडी वाढवून का मागितली ? की दबाव टाकायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून केलंय हे?
          हिंदवी स्वराज्य सेनेचा एक व्यवस्थापक या नात्याने मी सर्व सभासदांना एक सांगू इच्छितो की आपण कायद्याच्या चौकटीत राहूनच लढा द्यायचा आहे, नियमबाह्य वागतात ते गनीम ,सेनेचे मावळे नाहीत. आपल्या संघटनेला एक शिस्त आहे.त्याचे पालन व्हायलाच हवे. उदया कोणीही आपल्याकडे बोट दाखवता कामा नये.  
                         हा ग्रुप म्हणजे हिंदवी स्वराज्याचे फेसबुकवरील एक मंदिर आहे. 
त्याचे पावित्र्य जपणे हे तुम्हा आम्हा सर्वांचेच कर्तव्य आहे .आणि कोणी वावगे वागलात तर मुलाहिजा ठेवला जाणार नाही हेही लक्षात असूद्यात. 
           प्रसंग बाका आहे. सरकार त्यांचे ,कायदे त्यांचे ,त्यामुळे त्यांना सत्याची चाड नाहीये. हे ध्यानी ठेवून त्यासरशी धोरणे ठरविणे हेच इष्ट ठरेल.तुम्हाला काही शंका असल्यास इतर व्यवस्थापक मंडळीना देखील शंका विचारा,त्यांच्याकडून निरसन केले जाईलच.

           आपली फेसबुक अकाउंट hack होऊ शकतात त्यासाठी काही काळजी घ्या .मी networking security चा student आहे त्यामुळे काय काळजी घ्यावी ह्याची माहिती मी खाली देत आहे ती वाचणे.

          १. लॉगिन झालात की ब्राउजर मध्ये अड्रेस बार असतो त्यात https://www.facebook.com ऐवजी http://www.facebook.com असे असेल तर ते account settings मधून बदला. काहीवेळा ह्या पोरीचे फोटो बघा,इथे प्रोफाईल विझिट कोणी केली त्याचे तपशील या लिंक वर मिळतील,इथे पैसे मिळतील ,इथे मुलगी मिळेल ,इथे आपली मराठी अस्मिता मिळेल,इत्यादी लिंक ह्या  अधाश्यासारख्या न बघणेच योग्य ठरेल कारण ह्यात https हा प्रोटोकोल (प्रतिबंधित)deny  केला जातो.त्यामुळे तुम्ही गंडविले जाण्याच्या शक्यता जास्त असतात.


            २.अनोळखी लोकांकडून मेसेजेस लिंक्स आलेल्या ओपन करू नये. ओळखीच्या लोकांकडून आल्या तरी घाई करू नका,एखादी लिंक ओपन नाही केली तर जग मुळीच बुडणार नाही याची खात्री मी स्वतः देतो.

            ३.पासवर्ड खूप क्लिष्ट ठेवा पण एवढा पण नको की तुम्ही तो विसराल.एक उदाहरण:TFa+\$n;7. ह्या पासवर्डना strong and cryptic passwords संबोधले जाते जे hackers ना  मिळवणे अवघड असते.

            ४.कॅफे मध्ये असाल तर निघून जाताना लोंग ऑफ करणे आणि पासवर्ड बदलणे .

             ५. प्रायमरी मेल म्हणजे तुमचा लॉगिन मेल आणि तसेच सेकंडरी मेल देऊन ठेवा जो तुमच्या अडचणीत मदतीला येतो.सर्वाना इमेल आयडी दाखवायची खुमखुमी बाळगू नये.

             ६.इकडे तिकडे क्लिक करताना कुठे करताय त्याचे भान जरूर ठेवा.इमेल आणि फेसबुक लॉगिन करताना url id कटाक्षाने चेक करावा. तसेच तुमचा ANTIVIRUS अपडेट ठेवा. keyloggers through hackers तुमचा पासवर्ड मिळवू शकतात. keyloggers म्हणजे तुम्ही जे कीबोर्ड वर की प्रेस कराल ते सगळे hackers ना समजू शकते अश्यावेळी कॉम्पुटर मधला on screen key board वापरून माउस ने क्लिक करून लॉगिन करा म्हणजे तो धोका टळेल. 

       http://www.f-secure.com/en/web​/home_global/protection/free-o​ nline-tools/free-online-tools 
       ह्या लिंक वरून तुमची सिस्टीम सुरक्षित आहे की नाही याची खात्री करा. हिच लिंक वापरा असा आग्रह नाही.

            ७.ब्रिगेडी hackers हे म्हणजे काय लै भारी hackers नाहीत त्यामुळे त्यांचे attacks हे known common attacks by hackers या सदरात मोडणारे असतात.थोडक्यात सार्वजनिक. त्यामुळे इन जनरल त्यांना कसे थोपवू शकतो याच्या काही सूचना मी तुम्हाला दिल्यात. अडचण आल्यास त्वरित संपर्क साधणे ,समाधान करून मिळेल. धन्यवाद.



                                                    || श्री श्री श्री आई तुळजाभवानी प्रसन्न ||
                                          रोहित भिडे (हिंदवी स्वराज्य सेना व्यवस्थापक मंडळ )

No comments:

Post a Comment