कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Sunday 7 August 2011

शुन्यातून विश्व

       नमस्कार मावळ्यानो,

       तुमच्यातल्या बऱ्याच लोकांनी 300 हा चित्रपट पहिला असेल.हा चित्रपट थर्मोपिलाईच्या लढाईवर
आधारित् आहे. चित्रपटात थर्मोपिलाई येथे धारातीर्थी पडलेले ३०० सैनिक प्रचंड बहादुरीने २ लाखाहूनही मोठ्या सैन्याला तीन दिवसापर्यंत थोपवून धरतात, शेवटी एका ग्रीक नागरिकाच्या बेईमानी मुळे सर्व सैन्य शत्रूच्या कचाट्यात सापडते व माघार घेणे शक्य असतानाही स्पार्टाचे सैनिक मरण पत्करतात. ही सत्यघटना आहे त्यात राजा लिओनीदास आपल्या तुटपुंज्या पण कणखर सैन्याला मनोधैर्य देतो आणि लढतो.तो राजा तर
मारला जातो आणि ते ३०० बहाद्दूर योद्धे देखील मारले जातात पण ते बलिदान व्यर्थ नाही जात. त्याच ३०० चे
पुढे ३०००० पेक्षा जास्त योद्धे तयार होतात,स्पार्टाचे राज्य अजिंक्य राहते.ही कथा खूप प्रेरणा देते. संख्येपेक्षा कौशल्य,निष्ठा आणि इच्छा यांची युतीच जास्त प्रबळ असते हे समजून येते.
      हे लिहिण्याचे प्रयोजन असे की नुकतेच आपल्या हिंदवी स्वराज्य सेनेत ३००० मावळे दाखल झाले आणि दिवसेंदिवस संख्या वाढत जातेय हे उल्लेखनीय आहे. या सेनेचा पाया घालताना बऱ्याच अडचणी आल्या. हा ग्रुप का निर्माण झाला ह्याची माहिती थोडक्यात सांगतो. मी जेव्हा फेसबुक वर आलो तेव्हा मला संभाजी ब्रिगेड कश्याशी खातात हे देखील माहिती नव्हते. फेसबुकवर होणारा जातीयवाद एवढा पराकोटीला पोहोचलाय ह्याची मला तिळभर देखील कल्पना नसल्याने मी आपला "फार्मविले" वर पडीक असायचो. एकदा समर्थ रामदास स्वामींचा फोटो अपडेट मध्ये पहिला ,"जय जय रघुवीर समर्थ" अशी कमेंट लिहावी म्हणून तिथे गेलो तर त्याखाली देववणार पण नाहीत अश्या शिव्यांचा भडीमार सुरु होता. मी अवाक झालो कारण असे काही होत असेल याची मला काहीच कल्पना नव्हती. त्यानंतर तो फोटो ज्या व्यक्तीने टाकला होता त्याच्या प्रोफाईलवर जाऊन पहिला तर मग समजले की समर्थ रामदास हे तर त्यांच्या द्वेषाच्या हिमनगाचे एक टोक होते ,त्या ब्रीगेडीच्या प्रोफाईलवर अख्खा हिमनग पडून होता. ह्यात संभाजी ब्रिगेड रोज थोडी थोडी भर टाकत होते. त्या हिमनगाचा पाया हा हिंदुद्वेष होता, त्याची शिखरे ही पेशवे,रामदास,टिळक इत्यादी होते. त्यातले सर्वोच्च शिखर हे परकीय बामण होते तर त्या हिमनगाला "जिजाऊ शिवरायांची भयंकर बदनामीची" झळाळी होती. खेडेकर आणि मंडळ त्या हिमनगावर थाप्प्याच्या थप्प्या चढवत आहेत त्या आजतागायत.
       त्यांचा द्वेष इतक्या पराकोटीला पोहोचला की  संत ज्ञानेश्वर या लोण्याहून मऊ हृदय असलेल्या संतश्रेष्ठाला देखील सोडले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्ली जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या आणि आयुष्यभर छत्रपतींच्या चरणी निष्ठा ठेवून असणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर जेव्हा खालच्या पातळीवर टीका होते
तेव्हा पेशवे आज मागे वळून बघतील तर त्यांच्या मनात एकच प्रश्न निनादेल की याचसाठी केला होता का एवढा अट्टाहास ?
ब्रिगेड फेसबुकच्या माध्यमातून एकामागून एक जसे आरोप करत होते तसेच त्याचे खंडण करणारे पण होते. प्रसाद करकरे ,प्रशांत मांदेपे,सतीश शिंदे,अमित जोशी ,जोशी अमित,अनिरुद्ध कुलकर्णी,प्रफुल्ल राजे,राकेश देसाई इत्यादी लोकांशी ओळख झाली.त्यानंतर एक मेसेज थ्रेड उघडण्यात आला ज्यात आम्ही सर्वजण समाविष्ट होतो. कुठे वाद सुरु असतील तर त्याची लिंक त्या मेसेजमधून टाकली जायची,मग सगळे मावळे हात धुवून त्या ब्रीगेडीला सळो की पळो करून सोडायचे. संभाजी ब्रिगेडच्या पेज वर ब्रिगेडवाले कमी आणि आम्हीच जास्त वेळ डेरा टाकून असायचो. त्यांचा एकही असा ग्रुप नव्हता ज्यात आम्ही नव्हतो,एकवेळ ते नसतील पण आम्ही असू याची पूर्ण खात्री ही त्यांना देखील होती. त्यानंतर असा विचार आला की हा मेसेज थ्रेड आपल्या आपल्यात झाला ,इतर लोकांना आपल्याकडे कसे वळवणार.
       तेव्हा पेज काढावे असा सर्वानुमते ठराव झाला.साजेसे नाव असावे म्हणून "हिंदवी स्वराज्य सेना" हे नाव ठरले. "हिंदवी स्वराज्य सेना" ; शिवरायांच्या छत्राखाली सर्व जनता एक होऊन स्वराज्याच्या विरोधकांशी लढतेय ही कल्पनाच किती सुखावून टाकते ना.तेच चित्र आम्हाला नव्याने रेखाटायचे आहे.ह्या सेनेला जात नाही की पात नाही,ना ब्राह्मण,ना मराठा,ना चांभार,ना कोळी,ना कुणबी ना बहुजन.फक्त एकच जात ती म्हणजे हिंदू.महाराजांची जात हिंदू महाराजांचा धर्म हिंदू ,तोच आपला हे मानून ह्या सेनेचे पाईक व्हावे.
       ह्या पेजचे निर्माण झाल्यावर एक प्रॉब्लेम हा आला की पेजच्या माध्यमातून नोटीफिकेशन्स जात नव्हती ,आणि आपला गाफील मराठी हिंदू समाज तसा बऱ्यापैकी झोपाच काढत असतो त्यामुळे तो स्वतः पेज वर येऊन अपडेट्स चेक करणार नाही याची मला खात्री आणि खंतही होती. त्यामुळे मग ग्रुप काढावा जेणेकरून नोटिफिकेशन आपोआप जातात हे पाहून मी पहाटे ३.३० पर्यंत "migration from HSS page to HSS group with all data" हे काम करत होतो. त्यानंतर सुरुवातीला आम्ही ३०० मावळे होते.त्याचे आज ३ सहस्त्र झालेत.आमचा रोख जा समाजातील वाईट प्रवृत्तींवर आहे ज्यात अग्रगण्य स्थान ब्रीगेड्लाच आहे.
         

संभाजी ब्रिगेडच्या लोकांशी वैयक्तिक आकस काहीच नाहीये,पण त्यांच्या विचारसरणीला आणि कार्यपद्धतीला पूर्णपणे ठाम विरोध आहे, ज्या पद्धतीने ते स्वतःच्या वैयक्तिक आणि राजकीय स्वार्थासाठी
जातीजातींमध्ये भांडणे लावत आहेत त्यांना विरोध आहे , ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज,जिजामाता साहेब यांना आपल्या फायद्यासाठी खेळणे करून टाकले आहे त्याला विरोध आहे,धाधांत खोटे बोलताना पदरचे घालून महाराजांच्या आणि इतर महापुरुषांच्या  नावावर खपवणे आणि ते दाखवून लोकांची दिशाभूल कारणे याला विरोध आहे,केवळ "मते" आणि "मदत" मिळावी म्हणून आंबेडकरी जनतेला हाताशी धरून त्यांचा "वापर" करून घेणे ह्याला विरोध आहे,त्यांच्या आक्षेपार्ह विधानांना आणि भडक रक्तरंजित लिखाणाला विरोध आहे,त्यांच्या प्रत्येक कृतीला विरोध आहे कारण त्या कृतीमागचा हेतू कधीच शुद्ध नसतो. ही सेना उभी करताना अनेक अडचणी आल्या ,विरोधही झाला,धमक्या शिवीगाळ देखील देऊन झाल्या पण आम्ही नाही बधलो. पुढे मंदार संत,विकास खरात,योगेश देशपांडे,राहुल काळे सारखे हुशार आणि धडाडीचे मावळे येऊन सेनेला मिळाले. आज मला गृपबद्दल अभिनंदनपर फोन,मेसेजेस येतात. ह्या सेनेच्या यशाचे रहस्य हेच आहे की याच्या उभारणीमागचा हेतू अतिशय शुद्ध आहे.
आणि असंख्य मावळ्यांचा आम्हाला पूर्ण पाठींबा लाभला ज्यांची नावे केवळ विस्तारभयास्तव देत नाहीये ह्याबद्दल क्षमस्व.लवकरच आम्ही ह्या सेनेतर्फे उपक्रम राबवणार आहोत ज्यातलाच एक भाग म्हणजे लोहगड ट्रेक . तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे ही इच्छा आहे. 
या देशात जातीपातींचे,द्वेषाचे राजकारण नसावे ,महापुरुषांवर केवळ जातीमुळे टिका न करणे 
आणि समृद्ध,निष्कपटी हिंदुस्थानाचे निर्माण करून एकमेकांच्या हातात घालून राष्ट्राला प्रगतीपथावर नेणे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे फार अवघड आहे हे माहिती आहे पण जर सर्वांची साथ लाभली तर तो दिवस दूर नाही जेव्हा हे वचन खरे होईल आणि खात्रीने सांगतो की त्या आनंदासारखा दुसरा आनंद नसेल.हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आम्ही सर्व मावळे नतमस्तक आहोत आणि त्यांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी ही सेना शेवटच्या श्वासापर्यंत झटेल,कोणी कितीही विरोध केला तर अंतिम ध्येय गाठ्णारच ही इच्छा मनी धरून योगदान द्यावे हिच सर्वाना  विनंती.
|| श्री श्री श्री आई तुळजाभवानी प्रसन्न ||
-रोहित भिडे (हिंदवी स्वराज्य सेना व्यवस्थापक)

1 comment:

  1. अप्रतीम... हिंदवी स्वराज्य सेनेला लक्ष लक्ष शुभेच्छा...

    ReplyDelete