कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Saturday 27 August 2011

       एक वेगळी माहिती ,नेटवरून साभार !

     १४९८ साली वास्को द गामा हा पोर्तुगीज दर्यावदीर् प्रथम भारतात आला. नंतर १५०३ला भारतात आलेल्या अल्बुकर्कने गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य स्थापन केले. नंतर १५९५मध्ये हौटमन हा डच दर्यावदीर् भारतात आला. पाठोपाठ अनेक डच कंपन्या आल्या. फ्रेंच व इंग्रजही हातात हात घालून आले. या साऱ्यांनी भारतीय प्रजेवर जुलूम केले, त्यांचा धर्मछळ केला, गुलामगिरी लादली. गोवा मानवी देहविक्रीची बाजारपेठ बनली. भारतीय जहाजांनाही पोर्तुगीजांची परवानगी मिळवण्या-साठी 'कारटाझ' नावाचा कर भरावा लागत होता. साऱ्या पश्चिम किनाऱ्यावर परकीय सत्ता लूटमार करत हौदोस घालत होत्या.

       पण या जुलूमी सत्तांधांना आव्हान देत एक गरुड पंख पसरून घिरट्या घालीत होता - तो गरुड म्हणजे राजा कृष्णाजी भट. कोकणात जन्माला आलेल्या कुठल्याही मुलाप्रमाणे कृष्णाचं आयुष्य रेताड किनाऱ्यावर गेलं. बापाचा पत्ता नव्हता, आईचा एकीकडे थारा नव्हता. लहान असतानाच दोनदा तो गुलामांच्या बाजारात विकला गेला होता. प्रत्येक माणसाला जसा आपला तळवा ओळखीचा असतो तशी कृष्णाला समुदाची पहेचान होती. जिम स्टुअर्टच्या मस्केट गलबतावर गुलाम म्हणून राबणाऱ्या कृष्णाने जहाजावरील जॉन्सन या सुताराकडून अस्खलित इंग्रजी आत्मसात केलं. शेक्सपियरनं लिहिलेला शब्दन् शब्द त्याला मुखोद्गत होता. जिम स्टुअर्टशी द्वंद करून गुलाम कृष्णाने 'राजा कृष्णाजी भट' हे शब्द अरबी समुदावर कायमचे कोरले. परकीयांनी सारा हिंदू बाटवला होता, कापून काढला होता किंवा लाचार करून पायाशी आणला होता. अशा परिस्थितीत राजा कृष्णाजी भट आपलं गलबत दुर्गा व लाल स्वस्तिकाचं निशाण फडकावत अरबी समुदावर अजिंक्य होता.

      कृष्णाजी रोज सकाळी स्नानानंतर पळी-पंचपात्र-ताम्हण घेऊन संध्या व सूयोर्पासना करत असे. जेवणाआधी प्रत्येकाने आपले हात स्वच्छ धुतले पाहिजेत, तीन दिवसांतून एकदा समुदाच्या पाण्याने आंघोळ केली पाहिजे, १५ दिवसांतून एकदा आपले कपडे धुतले पाहिजेत तसेच घोडली म्हणजे शौचकूपांचा वापर सक्तीचा होता. या साऱ्या आचारसंहितेमुळे दुर्गा गलबतावर कोणतीही रोगाची साथ आली नाही किंवा सहसा कुणी आजारी पडलं नाही. म्हणूनच सरखेल कान्होजी आंग्रे त्याला आपला मानसपुत्र मानत होते.  
रोहित भिडे...
 
(http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-9677893,prtpage-1.cms)

No comments:

Post a Comment