कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Tuesday 16 August 2011

ध्येय समोर आहे,आता थांबणे शक्य नाही...........

हिंदवी स्वराज्य सेना !

   फेसबुकवर हाताच्या बोटावर मोजता येतील अशा काही ध्येयवेड्या मावळ्यांनी हिंदू धर्मद्रोह्यांना लढा देण्यासाठी उभारलेला विचारमंच !!
रोज online भेटणारे हे मावळे,जेव्हा एकमेकांना प्रत्यक्ष भेटू लागल्यावर त्यांना अजून उत्साह येऊ लागला !!!
त्यातून ग्रुप साठी काहीतरी भरघोस उपक्रम राबवावेत अशी संकल्पना सर्वांच्या डोक्यात आली होती....

    त्यातून प्रचीतगड मोहीम अगदी उत्साहात पार पडली .....
पहिली मोहीम प्रायोगिक तत्वावर पार पडली ज्यात काही मोजके व्यवस्थापक गेलेलं होते ...ती यशस्वी झाली.....

मग काय मावळ्यांना भलताच उत्साह आला ... आणि मनोधैर्यही वाढले ....
सर्वांनी विचारला सुरवात झाली.

पुढची मोहीम कधी आणि कुठे????
    त्यातून या ग्रुपची दुसरी मोहीम काढायची असा बेत आम्ही ठरवला ....
प्रचीतगड ची मोहीम फार अवघड होती,त्यामुळे त्यातल्या त्यात सोपा ट्रेक म्हणून लोहगड ची निवड करण्यात आली ....
ग्रुपवर महिनाभर आधी आम्ही या मोहिमेचा प्रसार पण चालू केला .....

आणि जवळ जवळ पावणे दोनशे जणांनी येऊ असे सांगितले ....
(कृपया पुढील वेळेस जर तुम्ही येऊ शकत असाल तरच "yes " दाबा....)
आम्ही तो आकडा १०% एवढा ग्राह्य धरून १५-२० जण येतील असा अंदाज बांधला ....
आदला दिवस राखी पौर्णिमेचा होता आणि त्यातही दोन सुट्ट्या एकत्र आल्याने किती जण येतील हा प्रश्न तसा बिकट होता ....
पण भवानी मातेच्या कृपेने,
मुंबई,कल्याण, पुणे सोलापूर,कोल्हापूर, सांगली, अशा वेगवेगळ्या व लांबच्या प्रांतातून मोठ्या उत्साहाने हि धर्माभिमानी पिढी आमच्या हाकेला ओ देत आली .....

    दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी आमची फलटण मळवली रेल्वेस्थानकावर सज्ज होती ....
online भेणारे अनेक जण आज प्रत्यक्ष भेटणार या विचाराने आम्ही खूप उत्साही होतो ....
थंडगार वारे, हिरवागार निसर्ग, स्टेशन च्या जवळून दिसणारे हे दृश्य पाहून आपल्याला पृथ्वीवरचा स्वर्ग आज दिसणार हे मनाने आधीच ओळखले होते ....
मावळ्यांनी रेल्वे स्थानकाबाहेर  अल्पाहार घेतला,
    एकत्र जमून तिथेच राष्ट्रप्रेम जागृत करणारी प्रेरणा गीत म्हणालो (शिव प्रतिष्टान चे,ओंकार नांदेडकर ह्यांचा मदतीने)
त्यानंतर आम्ही, 
"श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो!!" ,
"श्री छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो!!",
"जय जय रघुवीर समर्थ"
श्री 'गुरु दादोजी कोंडदेवांचा विजय असो !', 'जय भवानी , जय शिवाजी !' सारख्या घोषणा देऊन तो परिसर दणाणून सोडला.

    आजूबाजूची मंडळी हे काहीतरी वेगळे आहे (पण छान आहे !) अशा आविर्भावात पाहत होते .....

    झाले मावळे सज्ज झाले !!!
    तो दिवस सुट्टीचा असल्याने उगाच टाईमपास करायला आलेले अनेक जण पाहून आम्ही आयत्या वेळी लोहगडच्या ऐवजी विसापुरचा किल्ला पाहूया असे ठरवले आणि त्याला सर्व मावळ्यांनी एकमताने होकार दिला ......
३०० वर्षांपूर्वी शिवरायांनी ज्या गडांवर स्वामित्व गाजवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले त्यातल्या एका जिवंत साक्षीदाराला आम्ही भेट द्यायला निघालो होतो !!!
गगनभेदी घोषणा देत मावळे निघाले....'हिंदवी स्वराज्य सेनेचा विजय असो !!!'

    वाट तशी फारशी अवघड नव्हती ... आमचे अनुभवी व्यवस्थापक मंडळामधले श्री.हर्ष परचुरे आम्हाला वाट दाखवत होते .....
पण काय झाले कुणाच ठाऊक त्यांनी वाट दाखवता दाखवता कुठेतरी काहीतरी चुकले आणि धबधब्यातून वर वाट काढता काढता रस्ता चुकला आणि सर्वाची चांगलीच वाट लागली.......
आल्या वाटेने आम्ही अर्धा रस्ता परत मागे गेलो !!!!
तसे सर्व जण थकले होते .....उत्साहाचे रुपांतर प्रतिक्रियांमध्ये होत होते  .....
 कुणाला वाटत होते आपण परत जाऊ या,कुणाला वाटत होते ती हा ट्रेक पूर्ण करूयाच,अर्धा सोडून नको जायला...

    समोर सह्याद्रीची काळीकुट्ट भरदार छाती हिरवळीने झाकली गेली होती ......
आता या कातळावरून सरळ चालत जायला आपण स्पायडर मानव नक्कीच नाही हे प्रत्येकाला चांगलेच लक्षात आले होते ......
मोजके दोन तीन मावळे घेऊन हर्ष मास्तर रस्ता शोधत होते.....
दोन तीनदा चांगले घसघशीत अपयश पण आले ....
पण कदाचित त्या विसापूरच्या मारुतीरायालाच दया आली कि काय कुणाच ठाऊक !!!
मावळ्यांना रस्ता सापडला !!!!!
ह्यावेळी एकच विचार मनात आला...
ध्येय समोर आहे,आता थांबणे शक्य नाही............

     थकव्याचे रुपांतर पुन्हा एका नव्या उत्साहात झाले .....
भर भर रस्ता पकडून सगळे चालू लागले ...
हळू हळू गडाचा मूळ रस्ता दिसला सर्वांचा उत्साह दांडगा दुणावला !!!
आणि एका झऱ्याजवळ आम्ही अलगद पोहोचलो !!!!तिथे गडाच्या पायऱ्या दिसत होत्या.
निसर्गाचा तो आविष्कार पाहून खरच आपण त्या जग नियंत्यासमोर अजून पिल्लूच आहोत हे सहज जाणवले !!!
त्यातही मज्जा म्हणजे त्या धबधब्यातूनच चालत जायची सोय होती !!!
गडावर जायला जो रस्ता होता त्याचे रुपांतर धबधब्यात झाले होते .....
मात्र असा अप्रतिम अनुभव घ्यायला सर्व जन निश्चितच सहज तयार झाले .....

     एक एक पायरी हळू हळू चढायला सुरवात केली.....
धबधब्याचं ते अनोखं रूप आम्हाला पाहून आम्ही चकित झालो होतो ....
गडाचा बुरुज दृष्टीक्षेपात आला
अचानक समोर दिसली वीर रूपातील सहाफुटी शेंदुरचर्चीत मारुती दिसला ....
आमच्यातली वीरश्री जागृत झाली .....
सर्वांनी मनोभावे 'सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी !' अशी आरती म्हटली.
का कुणाच ठाऊक पण प्रवेशद्वारात असलेला तो मारुती पाहून दैवी शक्ती किती अपरिमित असू शकते हे जाणवले .....
शिवरायांचे आध्यात्मिक गुरु समर्थ रामदासस्वामी यांनी मारुतीरायाला शकी स्थान म्हणून का निवडले आहे हे लक्षात आले ....
कातळात कोरलेला हा मारुती अनेक लढायांमध्ये जशाचा तसा राहिला होता ... हे एक आश्चर्य आहे !!!!
असो !
आम्ही आरती म्हणून दोन तीन पायऱ्या सोडून वर कोसळनाऱ्या छोटेखानी धबधब्यात चांगले मनसोक्त भिजलो ......
आता पुढे साक्षात विसापुरचा किल्ला होता
सह्याद्रीच्या मस्तकावर हा अजून एक मनाचा तुरा खोवणारा अभेद्य वीर!!!
आम्ही गडावर गेलो तर दाट धुके होते आधीच भिजून चिंब झाल्याने थंडी वाजत होती ...
थोडा वेळ गड फिरून पहिला ....

    एका ठिकाणी थांबून एकमेकांचा परिचय करून घेतला ....
आपापले विचार मांडले ....
 आपण ह्या सेनेमध्ये का व कसे सामील झालो,पुढे काय काय करायची इच्छा आहे,हे सर्वांनी मनापासून सांगितले.
थंडी एवढी वाजू लागली कि काही जण अक्षरश: गारठून गेले ....
 सर्वाना आता खूप भूक लागली होती.म्हणून आम्ही परत फिरायचा निर्णय घेऊन
मारुती रायाच्या शेजारी असणार्या मानवनिर्मित गुहेत गेलो ...

सोबत आणलेली शिदोरी सोडून आम्ही अगदी भरपेट जेवलो ...
आपल्या सेनामध्ये भेटलेल्या "नेने काकूंनी" वेळात वेळ काढून शिवाजीनगर च्या स्थानकावर आमच्यासाठी मोहिमेसाठी शुभेच्छा "पेढ्याच्या" स्वरुपात दिल्या,
 त्या पेढ्यांवर मस्त पैकी ताव मारला....(त्या साठी नेने काकुंचे खूप खूप आभार)

    मघाशी जो गड चढायला खूप वेळ लागला होता तो आम्ही अगदी तासाभरात उतरून खाली आलो ....
मोहीम फत्ते झाली ....
सगळ्यांच्या चेहेऱ्यावर जो समाधानाचा भाव उमटला त्यची तुलना कशाशीच करता येत नव्हती ....


    झाले !!
एवढ्या दिवसांपासून आम्हाला ज्या मोहिमेची उत्सुकता होती तो असा मस्तपैकी पार पडला .....

एक नाद प्रत्येकाच्या अंतर्मनात उमटला .....
'जय भवानी जय शिवाजी !!!'
हिंदवी स्वराज्य सेनेचा विजय असो...

(ह्या मोहीम मध्ये काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पुढील वेळेस आम्ही नक्कीच सुधारणा करू,त्यासाठी आपली मते आम्हाला कळवावीत.)

4 comments: