कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Sunday 28 August 2011

मी आज सुरक्षित आहे कारण मी 'ब्राह्मण' नाही !!!!

      मित्रांनो ,
     गेली अनेक वर्षे आपला समाज अकारण ब्राह्मणांना लक्ष्य करून प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचे खापर त्यांच्यावर फोडत आहे ...

...  मी शाळेत असतानापासून एका आध्यात्मिक संस्थेत जात आहे , ज्यावेळी मी या संस्थेत जायला सुरवात केली तेव्हा माझ्या अनेक नातेवाईकांनी हि ब्राह्मणांची संस्था आहे आणि आपल्या सारख्या बहुजनांना ते राबवून घेत आहेत असे सांगितले ....तसा काहीही अनुभव मला अजूनही आलेला नही ....

     ब्राह्मण लोक इतरांना पुढे जाऊ देत नाहीत असा काहीसा विचित्र समज आज समाजात आहे
माझ्या आयुष्यात मला शालेय जीवनापासून ते आता डॉक्टर होईपर्यंत अनेक ब्राह्मण व्यक्तींनी भरघोस मदत केली आहे ...
माझे वैद्यकीय शिक्षण घेताना तर बहुतांशी प्राध्यापक हे ब्राह्मण होते आणि त्यांनी जे ज्ञान भांडार मला उपलब्ध करून दिले त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही .....

     माझा ब्राह्मण समाजाशी खूप संपर्क आला आणि त्यातून एक गोष्ट जाणवली ती म्हणजे हिंदू संस्कृती आज या समाजाने जेवढी टिकवली आहे आणि हिंदू संघटनासाठी जे प्रयत्न हा समाज करत आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे ....

     इतिहासात ब्राह्मण म्हणजे अत्याचार करणारे सनातनी लोक अशी काहीतरी प्रतिमा आहे ...
पण आता काळ बदलला आहे जातिभेदाच्या भिंती तुटून हिंदू धर्माचे निरभ्र स्वरूप आज जगासमोर येत आहे .....

     आणि हिंदू समाज वेगाने पुढे जात आहे ....

     पण काही विघ्न संतोषी लोकांना हे अजिबात मान्य नाही ....बहुजन समाज जुन्या गोष्टी विसरू इच्छित आहे आणि हे नालायक जुन्या गोष्टी उकरून हिंदू धर्मात फुट पाडत आहेत...
ब्राह्मण बदलले तरी इतर उच्चजातीय लोकांना मात्र खालच्या जातीतील लोकांनी पायापाशीच राहावे त्यांनी प्रगती करू नये असे वाटत असावे.....

     बघतोस काय मुजरा कर !!!
अशी दटावणी देणारे आज इतरांना काय सामावून घेणार ????

     त्यात आयते टार्गेट म्हणजे ब्राह्मण !!!
यांनी बहुजनांवर अत्याचार केले आणि म्हणून हा समाज मागास राहिला असे काही स्वयंघोषित विद्वानांचे मत आहे ....
पण ब्राह्मणांबरोबर इतरांनीही कट्टर जातीयता पाळली आहे.... आणि हे निर्विवाद सत्य आहे ...

    माझे गाव जिथे आहे त्या भागात ब्राह्मण समाज जवळ जवळ नाहीच ...
पण तरीही आर्थिक शोषणापासून ते लैंगिक शोषणापर्यंत जेवढे शोषण करता येईल तेवढे बहुजन समाजाचे शोषण झाले आहे ....
पण हा समाज तसा भोळाभाबडा आणि गरीब असल्याने अशा श्रीमंती अत्याचारांना वाचा फोडण्याचे प्रकार झालेच नाहीत ....

    आज बहुजनांच्या या दोषाचा फायदा घेऊन त्यांना सोबत घेऊन काही संघटना ब्राह्मण आणि हिंदू धर्म विरोधी वातावरण तयार करत आहेत ....
   प्रभू श्री रामचंद्राचे नाव पुरुषोत्तम !!!
पण या नावाला काळिमा फासत पुरुषोत्तम खेडेकरने ब्राह्मण समाजाचा वंशनाश करावा असा संदेश देणारे एक पुस्तक लिहिले ....
त्यात ब्राह्मणांना किती प्रकारे छळ करून मारू शकतो याच्या असंख्य युक्त्या दिल्या आहेत ....
वाचणार्याला अगदी शिसारी यावी अशी भाषा ब्राह्मण स्त्रियांबद्दल केली आहे ......

   काही दिवसांपूर्वी हे पुस्तक माझ्या वाचनात आले ...
आणि काही दिवसांनी असेही कळले कि संभाजी आणि जिजाउंच्या नावाने हिंदूंच्या डोळ्यात धूळ फेकणार्या या लोकांनी 'शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेड' अशी एक शाखा पुण्यात काढली आहे ....
ब्राह्मणाची अलर्जी असणार्यांना अफजलचे वंशज जवळचे वाटतात ......हे काहीतरी चुकीचे आहे ..

   म्हणजेच आज वेळ शांत असलेल्या ब्राह्मणांची आहे तर उद्या सर्व असंघटीत जाती आणि शेवटी अखंड हिंदू समाज या राक्षसी विचारसरणीचा बळी ठरू शकतो ...
यथावकाश हेच होणार आहे ......

   पण सध्या तरी मी सुरक्षित आहे कारण मी 'ब्राह्मण' नाही !!!
                                                                               -डॉ,राहुल काळे (व्यवस्थापक-हिंदवी स्वराज्य सेना)
 

2 comments:

  1. सर्वांनी लक्षात घ्यावे.....

    बाहेरचे शत्रू कायम शत्रूच असतात,
    पण जेव्हा आपलीच माणसे आपले शत्रू होतात........तेव्हा जास्त त्रास होतो......
    आपल्यात "मत-भेद" असले तरी,
    जेव्हा बाहेरील शत्रू चालून येतो,तेव्हा आपण काय घरातल्या माणसाला मारतो....?
    पण आमची भीती हीच आहे,
    कि हि "घरातील" लोकच आम्हाला संपवायला कमी करणार नाहीत...
    नंतर असे सगळेच संपेल.....मग बसा तुम्ही द्वेष घेऊन....एकटेच रडत.....

    मग धर्म कसला देशच संपून जाईल.....आत्ताच ठरावा....

    ReplyDelete
  2. सर्व स्त्री-पुरूषांना पूर्णपणे व्यक्तीगत स्वातंत्र्य द्या म्हणजे कोणी कोणाचा शत्रू होणार नाही.

    ReplyDelete