कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Tuesday 9 August 2011

शंबूक आणि हिंदू-द्रोह्यांचे षड्यंत्र...

                               शंबूकाची कथा एका वाक्यात सांगायची तर अशी सांगता येईल                                                           "शंबूक नामक एक शूद्र (क्षुद्र नव्हे!) वर्णाची व्यक्ती तपस्या करीत असल्याने प्रभू श्रीरामांनी तिला मारले."
              या एकाच गोष्टीवरून हल्ली एवढा काही गहजब केला जातो कि विचारता सोय नाही.
या एकाच कथेवरून रामाला जातीयवादी ठरविण्याचे अत्यंत नियोजन-बद्ध षड्यंत्र काही हिंदुद्वेष्टी मंडळी राबवीत आहेत. 
              "फेसबुक विद्वान(?)" मंडळी स्वत:ला सुधारक किंवा सध्याच्या भाषेत प्रबोधक समजतात. पण यांची प्रबोधनाची व्याख्या केवळ "हिंदू धर्मावर आधारहीन टीका" एवढीच आहे. स्वत:च्या धर्मात अथवा पंथात काय चालले आहे ते यांच्या गावीही नसते. म्हणतात न, "आपले ठेवायचे झाकून...",पण त्यांच्या या निरर्थक टीकेमुळे कुणा हिंदूचा चुकूनही बुद्धिभेद होऊ नये म्हणून काही गोष्टी स्पष्ट करणे गरजेचे वाटते.
              १. शंबूकाची कथा हि रामायणाच्या उत्तर-कांड मध्ये येते. आणि गम्मत अशी कि उत्तर-कांड हे बहुतांशी विद्वानांकडून (यात अहिंदू विद्वानही येतात) प्रक्षिप्त मानले जात असल्यामुळे, या कथेच्या खारेपानाबाद्दलाच शंका निर्माण होते. तेव्हा कुणाही विचारी (हा शब्द महत्वाचा आहे बरं का!) माणसाच्या मनात प्रश्न असा येईल कि "हि कथा ज्या कांडात आहे, त्याचेच सत्या-सत्यत्व जिथे मुळात संशयास्पद आहे, तिथे हि कथा तरी खरी असेल कशावरून?"
              २. शंकेला थोडीही जागा राहायला नको म्हणून क्षणभर हि कथा खरी आहे असे मानू. इथे एका प्रसंगाची आठवण करून देणे उचित होईल कि रामाच्या तत्कालीन प्रजेपैकी काही (सर्व नव्हे!) व्यक्तींच्या मनात सीतेबद्दल प्रवाद उमटला होता. आणि राम हा मनमोहन सिंग नसल्याने त्याने राजधर्माचे व "राजा लोकरंजनात" या सूत्राचे पालन करीत सीतेचा त्याग केला. एका राजाने आपले कर्तव्य पाळले. एवढा त्यावेळी राजावर ल्जानातेचा अन्क्ष होता. आता मला सांगा, कि जर शंबूक वध अधर्म या सदरात मोडत असेल तर मग तर तत्कालीन जागृत प्रजेने बंडच करायला हवे होते.  
                                             
                                              गेला बाजार संप, मोर्चे तरी? तेही जाऊ द्या,
                                  हो पण निदान रामाला एखादा "घेराओ" तरी? तेही नाही! 
                         म्हणजे त्या कालच्या लोकांना या घटनेचा काही प्रोब्लेमच नव्हता!
                  मग आजच्या काळातली हि हिंदू-द्वेष्टि मंडळी का उगाच उड्या मारतायत?
                                                       किती हा त्यांचा वेडेपणा!
                                           बहुतांश लोकांचा प्रोब्लेम काय होतो माहितीय का?  
                      ते पौराणिक घटनांना आजच्या काळातले नियम लावायला पाहतात.
                                                             हे कितपत योग्य?
              साधा विचार करा. सहस्रो वर्षांपूर्वीचा तो काळ कुठे आणि आजचा काळ कुठे! राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सगळेच संदर्भ बदललेयत. तत्कालीन एखादी साधी घटना हि आजच्या काळात पाप असू शकेल आणि एखादी पापमय गोष्ट हि आजच्या काळात पुण्यही असू शकेल,
                                                    हि साधी गोष्ट लक्षात येऊ नये यांच्या?
              हे जाणून-बुजून काहीतरी षड्यंत्र राबवतायात? तत्कालीन वर्णाश्रम धर्माविरुद्ध तपस्या तो शंबूक करत होता म्हणून राजाने राजधर्म म्हणून त्याला मारले. इतकी हि साधी गोष्ट आहे.
                                                   ती तत्कालीन राजधर्मात पूर्णपणे बसते.
               मग आजच्या काही अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊन हिंदू धर्माची अभ्यास-हीन चिकित्सा करणार्यांना उगाचच पोटशूळ का उठावा? हाच शंबूक जर का आपल्या गुण आणि कर्मांनी योग्य वर्ण प्राप्त करून तप करू लागला असता तर कुणाचीच हरकत नव्हती. या बाबतीत रामायणातीलच "मातंग ऋषी" यांचे उदाहरण पुरेसे बोलके आहे.
                    "शंबूक" गुण आणि कर्म यात पुरेसा बदल न करताच तप करू लागला होता हेच खरे!
 
 
श्री.विक्रम एडके ह्यांचा लेख

1 comment:

  1. शंबूकाची कथा हि रामायणाच्या उत्तर-कांड मध्ये येते. आणि गम्मत अशी कि उत्तर-कांड हे बहुतांशी विद्वानांकडून (यात अहिंदू विद्वानही येतात) प्रक्षिप्त मानले जात असल्यामुळे, या कथेच्या खारेपानाबाद्दलाच शंका निर्माण होते. तेव्हा कुणाही विचारी (हा शब्द महत्वाचा आहे बरं का!) माणसाच्या मनात प्रश्न असा येईल कि "हि कथा ज्या कांडात आहे, त्याचेच सत्या-सत्यत्व जिथे मुळात संशयास्पद आहे, तिथे हि कथा तरी खरी असेल कशावरून?" हे अगदी बरोबर आहे

    ReplyDelete