कृपया ह्या सेनेमध्ये सामील होण्यासाठी खाली "लिंक" वर आपली माहिती भरा....

https://spreadsheets.google.com/spreadsheet/viewform?formkey=dEVjc0Y0VzdWNlU3U2wxa1ZHY1A5b1E6MQ

Monday 21 November 2011

“अखंड हिंदूराष्ट्र करके रहेंगे”.


“पतीव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार” हेच सरकारचे धोरण आहे हे सरकार निरंतर निरनिराळ्या मार्गांनी सिद्ध करीत आहे. सामान्य जनतेला पेट्रोल दरवाढ, रोजची वाढती महागाई तर विजय मल्ल्याला “पॅकेज”. रामदेव बाबांना मारहाण तर अफझल गुरुला बिर्याणी. अजमल कसाबला ३२ कोटींची सुरक्षा, तर सामान्य जनतेला ३२ रुपड्यांमध्ये दिवस चालविण्याचे आदेश.

याच सरकारने काही काळापूर्वी दिल्लीत गिलानी आणि अरुंधती रॉय सारख्या देशद्रोह्यांना संपूर्ण संरक्षणामध्ये देश तोडण्याची मागणी करू दिली. मात्र १६ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे “अखंड भारत करके रहेंगे” अशी शपथ घेण्यास जमलेल्या देशभक्त नागरिकांना अटक केली.

दरवर्षी पं. नथुराम गोडसे आणि नाना आपटे यांच्या बलिदान दिनाच्या निमित्ताने काही देशभक्त एकत्र येऊन अखंड भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ घेतात. ज्या निकम्म्या सरकारने आजपर्यंत भारताची फाळणी केली आणि फाळणीनंतरही आपला हजारो चौरस किलोमीटर परिसर शत्रूला बहाल केला त्यांना “अखंड भारत” या शब्दांचे सुद्धा अजीर्ण असावे हे सहाजिकच आहे.  आपण पाकिस्तानबरोबरच्या सर्व लढाया जिंकूनही “पाकव्याप्त काश्मीर” का आहे? “भारतव्याप्त पाक” का नाही? संसदेत गेलेला भूभाग परत मिळविण्याचा ठराव अनेकदा पास होऊनही त्यावर काहीही ठोस पावले आजपर्यंत का उचलली गेली नाहीत हे सरकारने स्पष्ट करावे.

कॉन्ग्रेस सरकारने निरंतर स्वा. सावरकरांना दूर करून गांधीवादाची भलामण केली. त्या गांधीवादाचा फोलपणा आज स्वातंत्र्योत्तर ६५ वर्षांमध्ये येथील आबालवृद्धांच्या लक्षात आला आहे. गांधीवादाच्या अतिरेकामुळे पाकिस्तानची निर्मिती झाली, येथील मुसलमान समाज “अल्पसंख्यांक” या गोंडस नावाखाली सर्व सोयी-सुविधा लूटूनही पुन्हा अत्याचाराची बोंब ठोकत आहे, जिहादचे नारे देत आहे. काश्मीर भारतात विलीन झालेले असताना तो “विवादास्पद” ठरवून संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याची नेहरूंची चूक आज इतकी वर्षे हजारो-लाखो कोटी रुपये काश्मीरवर उधळूनही सुधारता आलेली नाही.

या सर्व काळात कट्टर सावरकरवाद म्हणजे राष्ट्रवादच या राष्ट्राला सावरू शकतो हे आता सूज्ञ जनतेला कळायला लागले आहे. गांधीवधाच्या नंतर कॉन्ग्रेस सरकारने सावरकरवादाला कलंकित करण्याचा प्रयत्न केला, पण खरे सोने जितकी कठीण परिक्षा तितके जास्त उजळते हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

पं. नथुराम गोडसेंनाही हिंदू “माथेफिरू” म्हणून इतकी वर्षे अंधारात ठेवले, सत्य बाहेर येऊ नये म्हणून नथुराम गोडसेंचे न्यायालयीन वक्तव्य गेली अनेक वर्षे बंदीत ठेउन प्रकाशित होऊ दिले नाही. ते न्यायालयीन वक्तव्य वाचल्यावर त्यावेळच्या न्यायमूर्तींनीही नथुरामजींची स्तुती केली, ‘माथेफिरू’ म्हंटले नाही. ते वक्तव्य आता लिखित स्वरूपात तसेच श्राव्य स्वरूपात उपलब्ध आहे. त्यानंतर लोक जागे झाले नाहीत तरच नवल. शाहरूख खानच्या चित्रपटासाठी संपूर्ण पोलीसदलाला संरक्षणासाठी वेठीस धरणा-या सरकारने “मी नथुराम गोडसे बोलतोय” या नाटकाला संरक्षण नाकारले. परंतु जनाधारावर ते नाटक उभे राहिले.

पं. नथुराम गोडसेंनी केलेले गांधीवधाचे कृत्य हे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थापोटी अथवा आकसापोटी केलेले नव्हते. परंतु शालेय मुलांच्या ‘आहार योजनेतही’ स्वार्थ पाहणा-या राज्यकर्त्यांना नथुराम गोडसेंचे स्वार्थविरहीत विचार आणि कृत्य कळणारच नाहीत. गांधींनी त्यांचे महात्मापद टिकविण्यासाठी सतत हिंदूहिताचा आणि राष्ट्रहिताचा बळी दिला. लहानसहान गोष्टींसाठी उपोषणाला बसणारे गांधीबाबा देशाची फाळणी टाळण्यासाठी उपोषणाला बसले नाहीत. “देशाच्या फाळणीआधी माझ्या देहाचे तुकडे होतील” असे वचन देशाला  देणारे सत्यवादी गांधी फाळणीला मान्यता देऊन मोकळे झाले. हजारो-लाखो निर्वासितांवर अनन्वित अत्याचार झालेले असताना गांधीने त्यांना इथे येण्यापेक्षा हे पाकिस्तानातच का सत्याग्रह करून मेले नाहीत असा प्रश्न करून त्यांचे घाव अधिक नासूर केले. मंदिरामध्ये कुराणाचे वाचले परंतु कधीही मशिदीमध्ये भगवद्गीतेचे वाचन केले नाही. त्यातच पाकिस्तानने आपल्यावर हल्ला केलेला असताना आणि सगळे मंत्रीमंडळ विरोधात असतानाही गांधींनी पाकिस्तानला ५५ कोटी देण्यासाठी उपोषण सुरू केले. आपल्यावर हल्ला      करणा-या देशाला अशी रसद पुरवणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे (आणि राहिलही, कारण असा आत्मघातकी मूर्खपणा कोणीच करू शकत नाही).

या गांधींच्या सद्गुणविकृतीला आणि एकांगी निर्णयप्रक्रियेला खीळ घालणे आवश्यक होते. आणि त्यासाठीच  नथुराम गोडसेंनी शस्त्र हाती घेतले. एक व्यासंगी पत्रकार, संपूर्ण निर्व्यसनी आणि चारित्र्यवान अशा व्यक्तीने केवळ राष्ट्रहित नजरेसमोर ठेऊन गांधींचे शरीर संपवले आणि स्वत: फाशी गेले. आपली राष्ट्रद्रोही सत्ता अबाधित, अनिर्बंध ठेवण्याकरिता या घटनेचा राजकिय लाभ नेहरू सरकारने देशभक्तांवर बडगा उगारून करून घेतला. सत्य बाहेर यऊ नये म्हणून नथुराम गोडसेंच्या न्यायालयीन निवेदनातील एकही शब्द वृत्तपत्रातही प्रकाशित होऊ दिला नाही. आज अनेक गांधी आणि गांधीवादी या राष्ट्राचे लचके तोडत आहेत, बहुसंख्यांकांच्या जीवावर अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करीत आहेत. त्यामुळेच आजही या आधुनिक गांधींना “नथुराम गोडसे” हे नाव उच्चारताच घाम फुटतो. मग ते कुठे दगडफेक करून तर कुठे बस जाळून आपला विरोध दर्शवितात. यातील एकही जण जर खरोखर गांधीवादी असेल तर त्याने सर्वप्रथम गांधींना प्रिय अशी दारूबंदी  देशभरात  लागू करावी.

नथुराम गोडसेंनी त्यांच्या इच्छापत्रात (ज्याचे वाचन दरवर्षी केले जाते) असे नमूद केले आहे की त्यांच्या अस्थी या सिंधू नदी जेव्हा या देशात स्वतंत्र होऊन वहायला लागेल तेव्हाच त्यात विसर्जित कराव्यात, तोवर त्या पिढ्यानपिढ्या हस्तांतरीत कराव्यात. नथुरामजींच्याबरोबर त्यात नाना आपटेंच्याही अस्थी आहेत. तसेच फारच कमी जणांना माहित असलेली गोष्ट म्हणजे त्यामध्ये अजून ३ जणांच्या अस्थी आहेत त्या म्हणजे कै. गोपाळ गोडसे, कै. मदनलाल पहावा आणि कै. विष्णूपंत करकरे. या पाचही हुतात्म्यांच्या अस्थी सिंधूची वाट पहात आहेत.

चला तर मग, आपण सर्वांनी त्या पावन अस्थींना, त्यांच्या जाज्वल्य राष्ट्रभक्तीला वंदन करून शपथ घेऊया – “अखंड हिंदूराष्ट्र करके रहेंगे”.

No comments:

Post a Comment